Submitted by मीस्वच्छंदी on 3 September, 2025 - 22:58
ढोलताशाच्या कार्यक्रमावरून मंडळी घरी परतताना:
त्या नादातच ती पुटपुटली, “मलाही जावसं वाटतं, पण नाही जमणार..”
लेकाच्या तीक्ष्ण कानांनी ते ऐकलेच,”पुढच्या वर्षी तू पण ये. जमेल तुला. तुझ्यापेक्षा म्हातारी लोकही येतात..”
विचारशृंखला तुटली आणि विस्मयाचकित नजरेने तिने त्याच्याकडे बघितले,
“म्हातारी..?? माझ्यापेक्षा??”
चाणाक्षपणे नवरा पुटपुटला,” अरे, असं नाही बोलू.”
“अगं म्हणजे people older than you.. तुमच्यापेक्षा वयाने मोठे लोकंही येतात..” तत्काळ दुसऱ्याने बाबाची टिप ऐकून सुधारणा केली.
“मराठी बोलायचय ना? आता घे, Older than च शब्दशः भाषांतर केलं त्यांनी ‘अजून म्हातारे’. तरी बरं त्यांनी ‘वयोवृध्द’ अजून ऐकला नाहीये” तिचं स्वगत. “पण खरंच, तो भाषांतराचा घोळ होता की वास्तवाची जाणीव.. ?“
#parentingteenagers
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान.
छान.
हाहा… मस्त जमलीय. आवडली.
हाहा… मस्त जमलीय. आवडली.
आमच्याकडे आता मुले मला अबे
आमच्याकडे आता मुले मला अबे चालीस साल के बुढ्ढे असे चिडवतात

तारुण्याचा फार अहंकार असतो त्यांना
छान जमलेय. Age is just a
छान जमलेय. Age is just a number. Life begins at 40 हे आपल्या सारख्यांनी आपल्या सारख्यांसाठीच लिहून ठेवलय
छान.
छान.
काल माझ्या एका विद्यार्थ्याची आई त्याला माझ्यासमोर रागावत होती. म्हणाली, ‘अरे.. त्या तुझ्याकरता एवढी मेहनत घेताहेत.. ह्या वयात सुद्धा..’
मेहनत घ्यायचे थांबवायचे डोक्यात आले..
छान , आवडली.
छान , आवडली.
छान!
छान!
तरी बरं थेरडी वगैरे भाषांतर
तरी बरं थेरडी वगैरे भाषांतर नाही केलं.
>>>>>>>>पण खरंच तो भाषांतराचा
>>>>>>>>पण खरंच तो भाषांतराचा घोळ होता की वास्तवाची जाणीव..
खतरनाक!!
>>>>>>>>तरी बरं थेरडी वगैरे भाषांतर नाही केलं. Happy
हाहाहा
छान जमलीये.
छान जमलीये.
तारुण्याचा फार अहंकार असतो त्यांना Proud>> अगदी अगदी. किंवा अज्ञानी जीव असतात असं म्हणायचं झालं!
सगळ्यांना प्रतिसादाबद्दल
सगळ्यांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
तारुण्याचा फार अहंकार असतो त्यांना >>> अहंकार असं नाही. पण
तेव्हढा पोच नसतो.
अज्ञानी जीव असतात असं म्हणायचं झालं >>
मेहनत घ्यायचे थांबवायचे डोक्यात आले >>> मुलगा तरी लहान / अजाण म्हणता येईल.. आईचं पण असं :|
Age is just a number. Life begins at 40 हे आपल्या सारख्यांनी आपल्या सारख्यांसाठीच लिहून ठेवलय
>>
तरी बरं थेरडी वगैरे भाषांतर नाही केलं >>> ती प्रतिभा / शब्दसंपत्ती त्यांच्याकडे नाहीये
आपण कधी असं कुणाचे वय /
आपण कधी असं कुणाचे वय / त्यावरून गट पाडलेत वगैरे मला आठवत नाही , म्हणजे मोठे होत असताना.
ती एक फक्त गोदरेज डाय ची जाहिरात असायची " आंटी/ अंकल " वाली तेव्हढीच आठवतेय.
आजकाल Gen z, millennials, Gen x / y वगैरे चर्चा/ वाद सोमि मुळे वाढलय का?