जरी सगळीकडे दिवाळीची धांदल सुरू होती तरी ती शांतपणे त्या पुस्तकांच्या ढिगाऱ्यात बसून नोट्स वाचत होती.
दोन वर्षांपासून घरच्यांना आणि तिलाही ह्याची आता सवय झाली होती दिवाळीची सुट्टी आणि PL एकदम असण्याची.
सुट्टीत मावशीकडे आलेल्या तिच्या मावसभावाने तिला हटकले,
“ मी कालपासून बघतोय, तु हे कोरे पेपर घेऊन तासनतास वाचत का बसत्येस..? “
ते ऐकले आणि तिने विस्मयचकित नजरेने त्याच्याकडे पाहीले.
कपाळावर सूक्ष्मशी आठी चढली. तिने त्याला जवळ बोलावले.
“बघ,नीट, हे कागद कोरे नाहीयेत, ह्या नोट्सच्या झेरॉक्स कॉपी आहेत, मोठ्या मुश्किलीने मिळविल्यात. जा आता, त्रास नको देऊस. आज हे पूर्ण करायचंय.“
त्याच्या वासलेल्या ‘आ’कडे दुर्लक्ष करून तिने परत त्या २५ पैसे पेजवाल्या (रॉकेलच्या) कॉपीच्या बाडात तोंड खुपसले…
#PreGoogleDays
तळटीप -
२५ पैसेवाल्या फोटोकॉपी अगदीच यथातथा असत. काही दिवसांनी ते प्रिंट हळू हळू फेड होत असे.
छान! तुम्ही सगळ्या
छान! तुम्ही सगळ्या इंजिनिअरिंगच्या आठवणी एकेक शशकमध्ये घुसवत आहात
त्या 25 पैसे रॉकेल प्रिंट आउटचा आणखी एक त्रास म्हणजे वास यायचा.
पण बरेच प्रिंट असतील तर नाईलाज असायचा, आईवडिलांचे पैसे तरी किती घालवणार.
माझी पूर्ण इंजीनियरिंग ग्रूप स्टडीवरच झाल्याने मी कधी फार प्रिंटआउटच मारल्या नाही..मित्रांच्याच वापरायचो. याबाबतीत पूर्ण पैसे वाचवायचो
मस्तच. आवडली. ट्विस्ट भारीच
मस्तच. आवडली. ट्विस्ट भारीच आहे. लिहिली सुद्धा छान आहे. प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला आणि एकदम हसू आले.
जुने दिवस आठवले. मीही यातून गेलोय. पुस्तकांपेक्षा झेरॉक्सवरच जास्त अभ्यास केला असेल. बऱ्याचदा झेरॉक्स वरून झेरॉक्स अशी साखळी केल्यामुळे पण प्रिंट खूप धूसर व्हायची, पण इलाज नसायचा. कधी कधी पुस्तकाच्या बायंडिंग मुळे दोन पानांच्या मधला भाग झेरॉक्स मध्ये यायचा नाही आणि अंदाजाने काय असेल याचा अर्थ लावावा लागायचा. #असेझालोआम्हीइंजिनियर
बऱ्याचदा झेरॉक्स वरून झेरॉक्स
जुन्या आठवणीना उजाला दिल्या बद्दल धन्यवाद
-------------
बऱ्याचदा झेरॉक्स वरून झेरॉक्स अशी साखळी केल्यामुळे पण प्रिंट खूप धूसर व्हायची, पण इलाज नसायचा. +1
तेव्हा मुळ मुद्दा पैसे वाचवणे हा अग्रक्रमाने असायचाच पण सेमिस्टर पुरता केलेली तयारी परिक्षेआधी आठवड्याभरापुरताही वाचनीय राहिली तरी बास असायचे. नंतर तसेही त्यांची दयनीय स्थिती व्हायची.
झेरॉक्स होत म्हणून पदवीधर
झेरॉक्स होत म्हणून पदवीधर झालो.
ज्या महान व्यक्तीने ह्याचा शोध लावला त्याला शतशः प्रणाम.
झेरॉक्स वरून झेरॉक्स अशी
झेरॉक्स वरून झेरॉक्स अशी साखळी पण प्रिंट खूप धूसर व्हायची + साखळीतील सगळ्याच २५ पैसे वाल्या >>> ही बहुदा त्यातलीच असावी.
तेव्हा मुळ मुद्दा पैसे वाचवणे हा अग्रक्रमाने असायचाच पण सेमिस्टर पुरता केलेली तयारी परिक्षेआधी आठवड्याभरापुरताही वाचनीय राहिली तरी बास असायचे>>> +१
इंजिनिअरिंगच्या आठवणी एकेक शशकमध्ये घुसवत आहात >>>
मी घुसवत नाहीये. त्या चपखल बसतायत
केशवकुल, अNi, माबो वाचक,
केशवकुल, अNi, माबो वाचक, ऋन्मेऽऽष प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
अगदी छान!
अगदी छान!
खरेच, स्वस्तात स्वस्त झेरॉक्स वर इंजिनिअरिंगचा अभ्यास करायचा असायचा. पुस्तके घेणे परवडायचे नाहीच.
रॉकेलचे झेरॉक्स...आठवून खूप हसायला आले!!
त्यासोबत मग अदलाबदली केलेले जर्नल्स, टोपो , प्रॉक्सी अटेंडंस , व्हायवा मध्ये लागलेली वाट...अशा सगळ्या गमती आठवल्या!!
धन्यवाद छल्ला!
धन्यवाद छल्ला!
प्रॉक्सी अटेंडंस >>
मास बंकिंग..?
व्हायवा मध्ये लागलेली वाट >> तो आणखीनच वेगळा मुद्दा आहे.
मला (आता विशेष ) जाणवतं की आपण सगळेच त्याकाळी कमीत कमी पैसे (आईबाबांचे/ पालकांचे ) खर्च होतील ह्याची काळजी घ्यायचो नाही.
गुणी मुलं
छल्ला,https://www.maayboli
छल्ला,कंटेनर वाचा , कॉलेजमधील अजून काही आठवणी ताज्या होतील
हो, वाचली.
हो, वाचली.
छान लिहिले आहे.
ड्राफ्टर आठवले.
आवडली. खरच कसे काढायचो ना
आवडली. खरच कसे काढायचो ना आपण झेरॉक्स.
छान!
छान!
छल्ला, सामो आणि देवकी धन्यवाद
छल्ला, सामो आणि देवकी धन्यवाद!
ड्राफ्टर आठवले>> हो ती जोडगोळीच!