लेखनसुविधा

म्मं म्मं, म्मं म्मं

Submitted by पुरंदरे शशांक on 22 February, 2013 - 23:33

दोनदा कशी काय प्रकाशित झालीये ??? कृपया याच शीर्षकाखालील दुसरी कविता पहा.

शब्दखुणा: 

म्मं म्मं, म्मं म्मं

Submitted by पुरंदरे शशांक on 22 February, 2013 - 23:32

म्मं म्मं, म्मं म्मं

वरण-भाताची शिट्टी झाली
बाळाची कळी खुलली खुलली

फोडणी खमंग तडतडली
आणा आणा सोनूची ताटली

आमटी-भात तुपाची धार
मधून आंबट टमाटु सार

चिऊचे घास काऊचे घास
म्मं म्मं होईल खासम खास

पापा थोडा घुटुक घुटुक
चूळ भरा खुळुक खुळुक

एक येता ढेकर मस्त
ढाराढुर्र गुडुप सुस्त....

hugry.JPG

शब्दखुणा: 

अजून एक चिऊतै...

Submitted by पुरंदरे शशांक on 17 February, 2013 - 23:19

अजून एक चिऊतै...

चिऊतै चिऊतै
....नाचतात थुई थुई

चिव चिव किती बाई
....अंगणभर बाग्डत जाई

दाणा खाई पाणी पिई
....गोड गोड गाणे गाई

घरटे छान छोटे सही
....पिल्लू इव्लू ओरडत राही

अंधार जरा होताच
.....पंखाखाली गाईगाई ....
.....(आई-कुशीत गाईगाई)

सदिच्छा ..

Submitted by पुरंदरे शशांक on 17 February, 2013 - 06:22

सदिच्छा ..

असे उजाडावे | मनाच्या क्षितीजी |
नुरावी काळजी | नावालाही ||

लख्ख व्हावे सारे | हृदय गाभारी |
प्रकाशाची झारी | बरसावी ||

मोकळे मोकळे | होताच आकाश |
कुठला आवेश | नसो तेथे ||

स्वैर वारा वाहे | किंवा झरा मुक्त |
व्हावे बंधमुक्त | चित्त तसे ||

असावा तयात | प्रेमाचा ओलावा |
सुखाचा गारवा | सदोदित ||

हीच एक आस | मनी तोचि ध्यास |
न करी उदास | जगदीशा ||

शब्दखुणा: 

काव काव..

Submitted by पुरंदरे शशांक on 12 February, 2013 - 23:29

काव काव..

काव काव करतं कोण ?
कावळेदादा आण्खी कोण

तेलबिल लावलंय का
चकाचक कस्ले वॉव

तिरकी करतात मान अशी
झेप घेतात झटदिशी

डोळे फिरती गरागरा
कावकावचा एकच नारा

भातपोळी अग्दी नको
शेव जरा टाका म्हण्तो

(इथे आई-बाबा इ. मंडळींनी आपापल्या सोईनुसार "हवे नको" ते टाकावे -जसे
भात भरवायचा असल्यास

शब्दखुणा: 

गझल विभाग व गझलेवरचे प्रतिसाद

Submitted by एक प्रतिसादक on 29 December, 2012 - 04:12

हे मनोगत बरेच दिवसांपासून लिहायचे होते. मायबोलीमधे काय सुधारणा करता येतील या बाफवर लिहायचे निश्चित केले होते. पण गझलविषयक असल्याने विचारांती स्वतंत्र लेख म्हणून पेश करत आहे.

सोप्या पद्धतीने मराठीत लेखन

Submitted by shantanuo on 19 December, 2012 - 23:10

मायबोलीसारख्या संकेतस्थळावर बहुतेक सर्व लोक ब्राऊजरमध्येच ऑनलाईन लेखन करत असावेत. पण जर आपल्याला ऑफलाईन लेखन करायचे असेल तर त्यासाठी बरीच डोकेफोड करावी लागते. ऑफलाईन लेखनाचे फायदेही बरेच आहेत. आपण आपले लेखन नीट सेव्ह करू शकतो, स्पेल चेक करू शकतो. अ‍ॅटो करेक्ट, अ‍ॅटो टेक्स्ट वापरू शकतो. पानेच्या पाने लिखाण करायचे असेल तर ऑफलाईनला पर्याय नाही. खाली दिलेली सॉफ्टवेअर वापरून मराठीत टंकलेखन करणे अगदी सुलभ आहे. हे सॉफ्टवेअर उतरवून घ्यायला काही मिनिटांपासून ते काही तासांपर्यंत वेळ लागू शकतो. (इंटरनेटच्या स्पीडवर अवलंबून) पण एकदा का डाऊनलोड झाले, की इन्स्टॉल मात्र काही मिनिटांत होईल.

ओढणी.. साजणी..

Submitted by पुरंदरे शशांक on 17 December, 2012 - 23:56

ओढणी.. साजणी..

माथा गळ्यास झाकते
एक ओढणी सजून
काय कवतिक तिचे
घे गं जरा समजून

उन्हा तान्हात साजणी
येते सावली बनून
कोणी नवखा दिसता
घेते अंगही झाकून

सार्‍या अंगा-खांद्यावर
कशी दिसते शोभून
एकटीने जाता येता
धीर देई उमजून

भंवताल दिसे नवा
जेव्हा ओढणी आडून
निरख तू वास्तवाला
नको जाऊस भुलून

किती जणी सख्या तुझ्या
देती ओढणी फेकून
क्षणिकाच्या सुखाला त्या
गेल्या भुलून फसून

ओढ लागते जीवाला
निसर्गाचे सारे देणे
घेई पारखून नीट
दान पदरात घेणे

शब्दखुणा: 

ज्ञानोबा माऊली

Submitted by पुरंदरे शशांक on 9 December, 2012 - 22:19

ज्ञानोबा माऊली.

अगा जी उदारा | ज्ञानाच्या सागरा | संत योगेश्वरा | तुज नमो ||

विश्वाची माऊली | भक्तांसी साउली | तुझीच पाऊली | हृदी वसो ||
(प्रगटे करुणा | ऐसा गा महिमा | परब्रह्मरुपा | तुज नमो ||)

ग्रंथ ज्ञानेश्वरी | काय वानू थोरी | बरवी साजिरी | दिली आम्हा ||

तूच उकलवी | त्यातील भावासी | कवळ भरवी | माता जैशी ||

लागोनी चरणा | प्रार्थी पुन्हा पुन्हा | द्यावे कृपादाना | इतुकेच ||

नको योगज्ञान | निरंजनस्थान | भक्तिचे निधान | देई माये ||

वैखरी वसावी | ओवी ज्ञानदेवी | हरिपाठी गोडी | वाढो नित्य ||

गुरुकृपे साच | कळो आले हेच | ठसा भक्तिचाच | श्रेष्ठ ऐसा ||

शब्दखुणा: 

कथालेखन - चर्चा आणि संवाद.

Submitted by नंदिनी on 27 November, 2012 - 04:36

सर्वच कथालेखक आणि लेखिकांना चर्चा करण्यासाठी व्यासपीठ. इथे कथा/कादंबरी या लेखन प्रकारावरची तांत्रिक अथवा सर्जनशील चर्चा आणि संवाद साधू शकता. रायटर्स ब्लॉक असल्यास इथे मदत घेऊ शकता, कथेसाठी पार्श्वभूमी बनवण्यासाठी आपण इथे एकमेकांची मदत करू शकतो.

कृपया, इथे चर्चा करत असताना संसदीय भाषेमधे चर्चा करा. तसेच, कुठल्याही होतकरू अथवा नविन कथालेखकांची इथे टिंगल करू नका. (कथांमधील चुका दाखवणे अथवा हलकीफुलकी मस्करी अवश्य चालू द्यात पण मुद्द्यांवरून गुद्द्यांवर येणे टाळा.

इथे आपले मुद्दे मांडण्याआधी आजवर झालेली चर्चा एकदा वाचून अवश्य घ्या म्हणजे पुन्हा तेच मुद्दे रीपीट होणार नाहीत.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - लेखनसुविधा