माकडाची मज्जा

माकडाची मज्जा

Submitted by पुरंदरे शशांक on 29 November, 2013 - 00:24

माकडाची मज्जा

माकडभाऊ हूप हूप हूप
झाडावर बसले जाऊन चुप

बघायला जमली गर्दी खूप
मुले ओरडली शेपटीला तूप

वेफर्स वाजता कुर कुर कुर
उतरले खाली सुर सुर सुर

वेफर्स घेतले हातातून ओढून
ठेवले गालात नीट दडवून

पहातात नीट निरखून निरखून
ठेवलाय का खाऊ कोणी लपवून

गंमत एक झाली अशी
फुटला फुगा फटदिशी

आवाज ऐकून मोठासा
घेतला झाडाचा आडोसा

फुटता फुगे फटाफाट
पळाले भाऊ धूम चकाट

मुले ओरडली थांबा ओ.. भाऊ
अजून थोडे वेफर्स देऊ ????

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - माकडाची मज्जा