बडबडगीत

पिसापिसांचा कोंबडा

Submitted by पुरंदरे शशांक on 14 November, 2018 - 01:10

पिसापिसांचा कोंबडा

पिसापिसांचा कोंबडा
रंगबिरंगी केवढा

तुरा सुरेख लालेल्लाल
दिमाखदार मस्त चाल

दाणे टिपतो निवडून निवडून
किडे खातो जमिन उकरुन

ओरडतो कुकच् कु
कोंबडेभाऊ कुक्कुड कू

शब्दखुणा: 

कोण, कोण, कोण ??

Submitted by पुरंदरे शशांक on 29 September, 2017 - 00:08

कोण, कोण, कोण ??

टक्मका टक्मका
बघतंय कोण ?

चळवळ चळवळ
करतंय कोण ?

मंम्मम् मंम्मम् हवीये मला
रडून रडून सांगतंय कोण ?

अाईचा हात लागता जरा
बोळकं वासून हस्तंय कोण ??

शब्दखुणा: 

बडबडगीत-शाळेला निघाली

Submitted by विद्या भुतकर on 23 March, 2016 - 09:26

खूप वर्षांची इच्छा आहे , एखादं बडबडगीत लिहावं, अगदी सान्वी झाली तेव्हापासून. पण ते जितकं वाटतं तितकं सोप्पं नव्हतं माझ्यासाठी. आज पहिला प्रयत्न.

पाखरांची किलबिल,
पापण्यांची किलकिल,
डोळ्यावरची झोप
भुर्रर्र उडाली.

सकाळची गडबड,
डब्यांची खडखड,
सोमवार सकाळ
सुरु झाली.

आईची धुसपूस,
बाबांची खुसपूस,
तयारी माझी
काहीच नाही.

पाठीवर दप्तर,
दप्तरात बस्कर,
ड्रेसला इस्त्री
मुळीच नाही.

हातात दूध,
पायात बूट,
करतात सगळे
तैनात माझी.

विषय: 
शब्दखुणा: 

बाळ उभा र्‍हायला .....

Submitted by पुरंदरे शशांक on 25 September, 2013 - 00:30

बाळ उभा र्‍हायला .....

उभा उभा र्‍हाय र्‍हाय
आधाराला काय काय

टाका टाका एकेक पाय
मज्जा मज्जा येते काय

डुगु डुगु चाले कसा
छान छोटा बदकु जसा

पडे कसा बुदकन
हसु येई खुदकन

विट्टीदांडू

Submitted by सुरेखा कुलकर्णी on 8 May, 2011 - 10:25

बंडू पांडू आणि खंडू
खेळायला निघायले विट्टीदांडू,

आई म्हणाली जपून जा
कुणीकुणाशी भांडू नका,

तिघांनी मिळून केले चितपट
पहिला खंडू आला झटपट,

बंडूने जोरात मारली शिट्टी
खंडूने उडवली दांडूने विट्टी,

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

''आजी''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 14 August, 2010 - 03:17

एक होती आजी
चिरत होती भाजी

भाजीतून निघाली आळी
आजी होती आंधळी

आळीने घेतला चावा
आजी म्हणाली धावा

मुले आली धावून
आळी काढली पाहून

आळी फेकली लांब
आजीचे झाले काम

मुले म्हणाली ''जाऊ''?
आजीने दिला खाउ

डॉ. कैलास गायकवाड

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - बडबडगीत