Submitted by पुरंदरे शशांक on 10 November, 2013 - 22:02
तीर्थ क्षेत्र
सद्गुरु दाविती | मार्ग तो नेमका | नेतसे जो निका | मोक्षालागी ||
करिता सत्कर्मे | टाकूनि अहंता | गोडी ती चाखिता | सगुणाची ||
द्वेष मत्सरादि | जातसे जळून | येतसे भरुन | सद्भावना ||
मनाचा आरिसा | होताचि निर्मळ | प्रगटे तत्काळ | आत्मबिंब ||
प्रकाशात त्याच्या | उजळे जीवन | कृतार्थ पावन | पुण्यरुप ||
तीर्थ क्षेत्र ऐसे | सहज लाभता | धावाधाव वृथा | सांडावी गा ||
व्हावे आपणचि | पावन ऐसेच | कळो आले साच | गुरुकृपे ||
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाचून खूप छान
वाचून खूप छान वाटलं...मस्त...
पण मला तंत्राची माहिती नाही..काही दुवा द्याल का अभ्यास करायला..
छान आहे.. या छंदात मस्तच
छान आहे.. या छंदात मस्तच लिहता.. पु.ले.शु!
सुंदर खूपच.... मनाचा आरिसा |
सुंदर
खूपच....
मनाचा आरिसा | होताचि निर्मळ | प्रगटे तत्काळ | आत्मबिंब ||<< निव्वळ ग्रेट !!!
छान आहे.. या छंदात मस्तच
छान आहे.. या छंदात मस्तच लिहता..>>शामजींशी सहमत
सर्वांचे मनापासून आभार ......
सर्वांचे मनापासून आभार ......
खूपच सुंदर
खूपच सुंदर
सुरेख ....छान...आवडली
सुरेख ....छान...आवडली
चांगल्या ओवी !
चांगल्या ओवी !
वा, सुंदर लिहिलय
वा, सुंदर लिहिलय
आहा... मनाचा आरिसा | होताचि
आहा... मनाचा आरिसा | होताचि निर्मळ | प्रगटे तत्काळ | आत्मबिंब ||
खूप सुरेख, शशांक. खरच रसाळ आहे.
<<चांगल्या ओवी !>> ? माझ्या
<<चांगल्या ओवी !>> ?
माझ्या मते हे तर अभंग आहेत! छान आहेत.
अगदी प्रासादिक आहेत ह्या
अगदी प्रासादिक आहेत ह्या ओव्या
माझ्या मते ह्या ओव्याच असाव्या.
ओवी आणि अभंग यातील मूलभूत फरक
ओवी आणि अभंग यातील मूलभूत फरक म्हणजे ओवीच्या पहिल्या तीनही ओळींमध्ये यमक असते. अभंगात दुसर्या आणि तिसर्या ओळीत यमक असते.
<<चांगल्या ओवी !>> ? माझ्या
<<चांगल्या ओवी !>> ?
माझ्या मते हे तर अभंग आहेत! छान आहेत.
धन्यवाद शरद दोहोतील फरक दाखदिल्या बद्दल !
फार सुरेख , मनाचा आरिसा |
फार सुरेख ,
मनाचा आरिसा | होताचि निर्मळ | प्रगटे तत्काळ | आत्मबिंब ||
सर्वांगसुंदर रचना... शाम +१
सर्वांगसुंदर रचना...
शाम +१
ओवी असो की अभंग मुळात ओवी हा
ओवी असो की अभंग
मुळात ओवी हा काव्यप्रकार आहे तो अक्षरछंदात असतो अश्या काही ओव्या योजून एकसंध ..एकाच आशयाविषयास कॅरी करणारी कविता केली की तिला अभंग म्हणतात
मला एकच सोप्पं समीकरण समजतं
अभंग = जणू एखादी मुसल्सल गझल
त्यातली एक ओवी = जणू एक स्वतंत्र शेर
व्वा ! खासच जमून आलेय.
व्वा ! खासच जमून आलेय.