मायबोली गणेशोत्सव २०२२

कथाशंभरी २ - 'जन्म-मरणांचा फेरा' - अ'निरु'द्ध

Submitted by अ'निरु'द्ध on 11 September, 2022 - 07:02

कथाशंभरी २ - 'जन्म-मरणांचा फेरा' - अ'निरु'द्ध

अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि .....

तेच दृश्य त्याला वारंवार दिसत होतं.
गरगरणाऱ्या आकाश-पाळण्यासारख्या भोवळ आणणाऱ्या गतीने तर कधी संथ.

सभोवताल वारंवार बदलत होता आणि त्याचा देहही.

कोणकोण आणि कायकाय होता तो, कोण जाणे.

मानव, पशु, पक्षी.. अगदी पिशाच्चयोनीही.

त्यातही सलणारी बाब म्हणजे परिसरातले भोचक लोक वारंवार डोकावून उघडपणे टिकाटिप्पणी करत होते.

मर्मबंधातील एखादे नाते - साक्षी

Submitted by साक्षी on 11 September, 2022 - 06:20

'जगायला ना नाहीये ग माझी, पण हे असं अंथरुणात पडून जगायची इच्छा नाहीये.' आईचं बोलता येत असतानाचं माझ्याशी बोललेलं शेवटचं वाक्य! नंतरचे तीन दिवस फार अवघड होते. वेदनांमुळे तिच्यासाठी आणि ती जाणार हे कळलं होतं त्यामुळे आमच्यासाठी. त्यानंतर तिचा आवाजही गेला. एकेक गात्र शिथिल होत गेली. ती आता फार दिवसांची सोबती नाही हे कसं कोण जाणे तिलाही जाणवलं होतं.

विषय: 

कॉलेजचे ते मोरपिशी दिवस - ऋन्मेऽऽष

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 September, 2022 - 21:50

IMG_20220911_041355.jpg

तरी निव्वळ रोमान्स म्हणजेच मोरपिशी दिवस असतील तर आमचे लांडोरपिशी गोड मानून घ्या Happy

----------------------------------

कॉलेजचे ते मोरपिशी दिवस !!

हा विषय वाचल्यापासून मनात एकच विचार. आजवर ईतके यावर लिहीले आहे. आता आणखी काय लिहीणार...

विषय: 

चित्रकला स्पर्धा - पावसाळ्यातील दृश्य २- मुग्धमानसी

Submitted by मुग्धमानसी on 10 September, 2022 - 01:37

हे माझे एक जुने पेंटींग आहे. पावसाळ्याच्याच थिमवर आहे म्हणून म्हटले इथे टाकावे.

कथाशंभरी - जन्नत - मोरोबा

Submitted by मोरोबा on 10 September, 2022 - 00:20

अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि त्या घरातून येणार्‍या मादक सुरांनी त्याला मोहिनी घातली.
"कुंडी लगाले सैंयाऽऽऽ,
तुम्हरको जन्नत दिखाती मैं”
भारून गेल्यासारखा रघू त्या घराच्या दारात जाऊन उभा राहिला.
बर्‍याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. "अरे हे काय"

विषय: 

मायबोली गणेशोत्सव २०२२ - स्पर्धा आणि उपक्रमांची मुदतवाढ >> ११ - सप्टेंबर २०२२ पर्यंत

Submitted by संयोजक on 9 September, 2022 - 14:56

आपल्या विनंतीला मान देऊन आणि ज्यांना गणेशोत्सवात धामधूम असल्यामुळे स्पर्धा आणि उपक्रमांमध्ये भाग घेता आला नसेल तर त्यांना एक संधी देण्यासाठी मायबोली गणेशोत्सव २०२२ यातील स्पर्धा आणि उपक्रमांसाठी येणाऱ्या प्रवेशिकांची मुदत रविवार ११ सप्टेंबर २०२२ रात्री १२ वाजेपर्यंत (अमेरिकेची पश्चिम किनार्‍यावरची प्रमाणवेळ) वाढवली आहे.

विषय: 

"हस्तकला उपक्रम - २ :* छोटे कुंभार ." - मोहिनी१२३ -श्रीयांस

Submitted by मोहिनी१२३ on 9 September, 2022 - 14:25

कथाशंभरी - जॉनी जॉनी

Submitted by अज्ञानी on 9 September, 2022 - 12:43

बर्‍याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पूलाखालुन बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. अरे हे काय .......

"आपल्या सोबतीला बघ कोण आलंय."

"अय्या ! कित्ती दिवसांनी बघतेय मी तर बाई या जॉनीला. नवीन रुपात किती क्यूट वाटतोय गं."

"पण जरा काळा झालाय नै."

"चालवून घेऊ."

"हा एवढा वेळ काढून आलाय म्हणजे कायतरी विशेष कारण असणारे नक्कीच."

"किती वर्षे आपण दोघी कपाटातच अडकून गेलेलो. आता मात्र पुन्हा एकवार खेळ रंगणार. तू, मी आणि जॉनी."

पाककृती स्पर्धा क्र २- फलाफल बॉम्ब-साक्षी

Submitted by साक्षी on 9 September, 2022 - 11:52
फलाफल बॉम्ब, प्रोटीन रिच
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 

कथाशंभरी - २ - साथ - पाचू

Submitted by पाचू on 9 September, 2022 - 10:55

अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि… त्याचा बांध फुटला.

काही वर्षांपूर्वी राधाचं कुटुंब शेजारी राहायला आलं, आणि हळूहळू या दोघांचं प्रेम फुलत गेलं. तिच्या अत्यंत आवडत्या पारिजातकाच्या फुलांसारखं मंद स्वर्गीय सुगंध देणारं. पण गेल्यावर्षी राधा आजारी पडली, ती हळूहळू संपतच गेली. रघू खूप दुःखी व्हायचा, तेव्हा ती म्हणायची, “रघू, काहीही झालंतरी मी नेहेमी तुझ्या सोबतच असेन. पण तू स्वतःचं आयुष्य आनंदाने जगशील असं मला वचन दे.”

विषय: 

Pages

Subscribe to RSS - मायबोली गणेशोत्सव २०२२