उत्सव

हेचि खाणे देगा बावा

Submitted by अनिंद्य on 4 July, 2022 - 03:38

प्रत्येक आस्तिक मनाला मोहिनी पडावी असेच कृष्णाचे 'मनमोहन' रूप आहे. कृष्णभक्तीची मोहक रूपे भारतभर दिसून येतात, पण त्यात कमालीचे वैविध्य आहे. तमिळ वेत्रवेणुधारी थिरुमल वेंकटेश्वर, ओडिशातील जगन्नाथपुरीचा कालिया कृष्ण, केरळचा गुरुवायुरप्पन, कर्नाटकाचा उडुपी श्रीकृष्ण, ब्रिजवासीयांचा युगलरूपातला राधारमण, गुर्जर-ओखामंडलाचा राजस द्वारकाधीश आणि राजस्थानातील नाथद्वाराचा गोवर्धनधारी श्रीनाथ! भारतातल्या जवळपास सर्व प्रमुख भाषांमध्ये बालरूपी, युगलरूपी, सखारूपी, प्रेमरूपी, गुरुरूपी किंवा परमात्मारूपी कृष्णाचे वर्णन करणारे साहित्य आहे.

विषय: 

महापूर

Submitted by दत्तात्रय साळुंके on 13 September, 2017 - 01:31

महापूर

झिरझिरत्या आठवात पाझरते मन
पाहता पाहता आभाळ येते भरुन

हळव्या स्पर्शी शहारली ओली पाने
वृक्ष वेली भोगती अजून प्रीतीची स्पंदने

पक्ष्यांचे कर्णोपकर्णी झाले कूजन
नाद पैंजणाचा गिरिकंदरी अजून

गंधाळल्या साऱ्या नागमोडी वाटा
मुक, तरीही रानभर झाला बोभाटा

चिंब चिंब भिजला कठोर प्रस्तर
सौंदर्य ओलेते लपेटी भोवती निर्झर

वाऱ्याने चोरुन ऐकले तुझे माझे गुपीत
उधळून, म्हणाला अशीच खुलावी प्रीत

माहोल अवघा असा होता नशीला
प्रीतीचा अलबेला उत्सव सजला

मकर संक्रांत आणि भारतीय विविधता

Submitted by मनी मानसी.... on 23 January, 2015 - 05:24

मकर संक्रांती हा हिंदू संस्कृतीतील एक महत्वाचा सण आहे. भारतातील जवळजवळ सर्वच भागात मकर संक्रांतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. इंडो - आर्यन (हिंदी) भाषेनुसार यांस 'मकर संक्रांथी' असे म्हंटले जाते. दक्षिणेकडील काही भागात आजही हेच नाव प्रचलित आहे. हा सण विशेषत: सुर्य देवतेशी संबंधित आहे. सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत होणारे संक्रमण यांस 'संक्रांती' असे म्हणतात तर सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो म्हणून 'मकर संक्रांती' असे नाव प्रचलित झाले, यानुसार सूर्याचा मकर राशीतील प्रवेश, वसंत ऋतूचे भारतातील आगमन अशा अनेक परंपरागत समजुती आणि प्रतीके हा सण साजरा करण्यामागे आहेत.

ब्रिटीश सायन्स फेस्टिव्हल

Submitted by सुमुक्ता on 15 August, 2014 - 10:09

दर वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये यु. के. मधील कोणत्या तरी एका शहरात साजरा होणारा ब्रिटीश सायन्स फेस्टिव्हल विज्ञानप्रेमींसाठी खूप मोठी पर्वणी असतो. हा उपक्रम ब्रिटीश सायन्स असोसिएशन तर्फे राबविला जातो. आठवडाभर चालणाऱ्या ह्या विज्ञानोत्सवाचा कार्यक्रम अतिशय भरगच्च, माहितीपूर्ण, नाविन्यपूर्ण आणि रंजक असतो. विज्ञानविषयक विविध भाषणे, प्रदर्शने, कार्यशाळा ह्यांचे आयोजन ह्या विज्ञानोत्सवात केले जाते. स्थानिक विद्यापीठे आणि शाळा ह्या आयोजनात उत्साहाने भाग घेतात. स्थानिक सरकार, तसेच अनेक उत्साही स्वयंसेवक ह्या विज्ञानोत्सवास भरभक्कम पाठींबा देतात.

शब्दखुणा: 

उत्सव जन्माचा

Submitted by sharmilaranadive on 10 May, 2013 - 00:05

utsav janmacha.pdf (59.94 KB)

उत्सव जन्माचा

उत्सव जन्माचा
उत्सव जन्माचा
उत्सव जन्माचा
उत्सव जन्माचा
उत्सव जन्माचा

विषय: 
शब्दखुणा: 

सार्वजनिक गणेश उत्सव...

Submitted by प्राक्तन on 4 June, 2011 - 01:07

सार्वजनिक गणेश उत्सव...

मुंबई मधे सार्वजनिक गणेश उत्सव एक cult आहे. राजकीय पक्ष्यांना आपली पकड आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना आपले प्रिय जोखड दाखवायची सार्वजनिक संधी. तसे आपल्याकडे बरेच सार्वजनिक सण आहेत. पण गणेश बोले तो राजा ना. मग त्याचा सण पण मोठाच हवा. मग वर्गणी म्हणून कोणीही कितीही पैसे हक्काने मागतो, आणि आपण झक्कत देतो. नाही देत म्हटल की देवाच्या अद्यात कोपाची (?) भीती घालून पैसे उकऴले जातात. आणि एखादा नग भेटला की त्याला धमकावून पैसे नाही मिळाले तर परभारे देवाच्या नावावर शाप देऊन मोकळे होतात.

गुलमोहर: 

माझी दिवाळीची तयारी झाली, तुमची?

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

यावेळी दिवाळीची तयारी थोडी लवकर सुरू केली होती.
गणपतीच्या वेळी पणत्या चाकावर करणे, त्यांना हवा तसा आकार देणे, त्या वाळवणे, वाळल्यावर भट्टीत भाजणे. भाजून आल्यावर मग घरभर रंगाचा पसारा मांडून हवी तशी मनसोक्त रंगरंगोटी करणे. असे सगळे केल्यावर मग मायबोलीच्या शोनूकडच्या गेटटुगेदरला त्या घेवून जाणे, सगळ्यांना पणत्या विकत घ्या असा आग्रह करणे, आणि त्यांनी पण काही न म्हणता प्रेमाने पणत्या घेणे हे सगळे फक्त मायबोलीमुळेच शक्य आहे.
असा सगळा द्राविडी प्राणायाम केल्यावरचे हे काही फोटो.

१. DiwaliPantyaMB10.JPG

विषय: 
Subscribe to RSS - उत्सव