सार्वजनिक गणेश उत्सव...

Submitted by प्राक्तन on 4 June, 2011 - 01:07

सार्वजनिक गणेश उत्सव...

मुंबई मधे सार्वजनिक गणेश उत्सव एक cult आहे. राजकीय पक्ष्यांना आपली पकड आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना आपले प्रिय जोखड दाखवायची सार्वजनिक संधी. तसे आपल्याकडे बरेच सार्वजनिक सण आहेत. पण गणेश बोले तो राजा ना. मग त्याचा सण पण मोठाच हवा. मग वर्गणी म्हणून कोणीही कितीही पैसे हक्काने मागतो, आणि आपण झक्कत देतो. नाही देत म्हटल की देवाच्या अद्यात कोपाची (?) भीती घालून पैसे उकऴले जातात. आणि एखादा नग भेटला की त्याला धमकावून पैसे नाही मिळाले तर परभारे देवाच्या नावावर शाप देऊन मोकळे होतात.
कालचीच गोष्ट घे. दोन इमारती सोडून तिसरया इमारतीत सार्वजनिक गणेश उत्सव असतो. आता त्यांचा आणि माझा काय संबंध? पण ते प्रत्येक घरी जाउन वर्गणी गोळा करून गेले. बर प्रसाद द्यायला तरी येतात का? तर नाही. तुम्ही या आणि प्रसाद घेऊन जा. पण वर्गणी मागायला येणार. माझ्या घरी कोणी नव्हतं म्हणून मला रस्त्यातच धरलं. " चल, वर्गणी दे, १५१ रुपये. " मी म्हटल, "कसली बाबा?" तर एखादंया वेड्याकडे पहाव तस पाहून म्हणतो," सार्वजनिक गणेश उत्सवाची" . मी म्हटल," मी काही देव मानत नाही" . तर म्हणतो," अरे गाढवा, त्याच्याच कृपेने तर दोन सुखाचे घास खातोस ना?" मी म्हटल,"आई वडिलांच्या कृपेने खातो" . तर म्हणतो, " मग त्यांना देवाच्या कृपेने मिळालेत अस समज आणि वर्गणी दे." मग मी पण अडून बसलो. पैसे काय झाडावर लागतात होय? आणि लागले तरी याच्यासारख्या फुकट्याना कशाला द्यायचे? मग म्हटल, जरा खेचुया याची. मी विचारला," १५१ कशाला रे? श्रद्धा तर मनात असते ना. मग मी १५१ दिले काय आणि ११ दिले काय देवाला दोन्ही सारखेच ना. की तुमच्या देवाला तुम्ही १५१ ची सवय लावली आहे? " तर म्हणतो, " आमचा देव म्हणजे? हा तुझा पण देव आहे." मी म्हटल," माझा देव मी ठरवणार, तू कोण मला सांगणारा? आणि तसही हिंदूंमधे ३३ कोटी आहेत. ज्याला जो हवाय त्याने तो घ्यावा. मग एखाद्या देवाची जबरदस्ती कशाला? " त्याने माझ्याकडे भूत पाहाव तस पाहिल आणि म्हणाला," ते तुझ तू ठरव. पण मी वर्गणी घेऊनच जाणार." मग मी म्हटला," पण मी नास्तिक आहे राजा. नास्तिकाचा पैसा तुमच्या देवाला कसा चालेल?" तर म्हणतो कसा," तू असशील नास्तिक, पण पैसा काही आस्तिक वा नास्तिक नसतो."

Face_with_Question_Mark.gif

अर्थात मी काही पैसे दिले नाहीतच. पण मजा सांगाविशी वाटली म्हणून हा लेखन प्रपंच.

कळावे,
प्राक्तन पाटील

गुलमोहर: