नशिला

महापूर

Submitted by दत्तात्रय साळुंके on 13 September, 2017 - 01:31

महापूर

झिरझिरत्या आठवात पाझरते मन
पाहता पाहता आभाळ येते भरुन

हळव्या स्पर्शी शहारली ओली पाने
वृक्ष वेली भोगती अजून प्रीतीची स्पंदने

पक्ष्यांचे कर्णोपकर्णी झाले कूजन
नाद पैंजणाचा गिरिकंदरी अजून

गंधाळल्या साऱ्या नागमोडी वाटा
मुक, तरीही रानभर झाला बोभाटा

चिंब चिंब भिजला कठोर प्रस्तर
सौंदर्य ओलेते लपेटी भोवती निर्झर

वाऱ्याने चोरुन ऐकले तुझे माझे गुपीत
उधळून, म्हणाला अशीच खुलावी प्रीत

माहोल अवघा असा होता नशीला
प्रीतीचा अलबेला उत्सव सजला

Subscribe to RSS - नशिला