"प्रेम" ― एक दंतकथा

Submitted by सेन्साय on 23 February, 2018 - 07:37

"प्रेम"
♥ !!
.
प्रेम एक वृत्ती आहे
निसर्गदत्त कृती आहे
मनुष्याचा स्वभाव आहे..
प्रेम हाच सोहंभाव आहे !

देशही दुभंगले ह्या प्रेमापोटी
धर्म पंथाची होती अटाटी
प्रेमें उभारले महाल ते किती
आणि कित्येक मनोऱ्यांची झाली माती

जीव अनेक उपजले प्रेमासाठी
आशेचे किरण वार्धक्याची काठी
काळ लोटला, ओसरले रे संचित
प्रेमासाठी बदलले येथे प्रेमाचे गणित

प्रश्न मांडला सत्यासाठी
शोध रचिला मनाकाठी
प्रेम नक्की आहे काय ?
अनाहूत दिसे हां उपाय

प्रेम आहे एक प्रतिबिंब आकृति ,
व्यक्ति सापेक्ष जी बदलते त्रिमिती
पैसा सौंदर्य आणि रूपाची आसक्ति
मी - माझा - माझ्यासाठीची भानामति !

― अंबज्ञ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर कविता, आवडली.

पण प्रेमाला दंतकथा का बरे लिहीलेय.... खरतर प्रेम हि एक खूप सुंदर भावना आहे...
जेव्हा आपण एखाद्याला त्याच्या गुण दोषांसकट स्वीकारतो न तेव्हा कळते थोडेफार कि प्रेम म्हणजे काय Happy