वैशाली, पुणे इथे मागच्या बागेत बसायला जागा कशी मिळवावी?

Submitted by अमा on 18 December, 2017 - 04:53

पुणे तिथे काय उणे, त्यात ते आमचे माहेर. फर्गुसन कॉलेज रोड त्रिभुवनातला भारी रस्ता. इथे वैशाली नामक उपहार
गृह आहे ते आपल्या सर्वांचेच लाडके आहे. प्रश्न तो नाही. प्रश्न जागा ं मिळवून आरामात खादाडी करण्याचा आहे.
पूर्वी रस्ता अरुंद होता. तेव्हा पुढे बसाय्ला चार टेबले होती तीही भरलेली नसत. हिवाळ्याच्या दुपारी तिथे बाहेर बसून बारकी हिरवी पिव्ळी पाने वार्‍याने गळत असताना निवांत बसून गप्पा मारणे व काही बाही खाणे किती ग्रेट. पण ते सूख गेले आता . कैक वर्षे झाली वैशाली व निवांत पणा हे समीकरण च लुप्त झाले आहे.

कधीही केव्हाही जा गर्दी आहेच. वीकांताला प्रश्नच नाही, वर्किंग डेला सकाळी आठ वाजता गेले तरी मागे जे गार्डन आहे तिथे जागा ं मिळत नाही. माझा प्रश्न असा आहे कि ह्या मागच्या जागेचा काय प्रॉब्लेम आहे. जरूरीपेक्षा जास्त टेबले छत्र्या आहेत व खुर्च्या कमी आहेत? लोक खुर्च्या आडवून गप्पा मारत राहतात? का हॉटेल वाले येणार्‍या
गिर्‍हाइकाचा कूल कोशंट बघून हायपर कूल लोकांनाच मागे पाठवतात व टेबल देतात? तिथे कायमच जागेची
अडचण का असावी?

आम्ही आपले नेहमी पुढच्या भागा त. पेन्शनरांबरोबर नाहीतर कोनपन जोडपी, तीन मैत्रीणींचे घोळ के, शाळकरी मुले व पालक, एक चहा घेउन कायतरी कामाचे बोलणारे जेंट्स ़ ह्यांच्यात कशी बशी जागा मिळवतो आणि दोशा ओरपतो. आता हे लोक कूल नाहीत असे मला आजिबात नाही म्हणायचे. वाद नको. पण मागे जागा मिळणारे लोक काहीतरी अपवादात्म क सुपर कूल आसतात का? हे कायम बाइकच्या किल्ल्या, कुठल्या तरी आयटी कंपनीचा बॅक पॅक, जॅकेट असे काही बाही घालून सरळ आत जातात व जागा पटकावतात. त्यांच्या मैत्रीणी पण गोडुल्या पुणेकरणी!

इथे टेबल कसे मिळवावे? काय स्ट्रॅटेजी आखावी.

बरे कॉलेजच्या पुढील गेट समो र भले मोठे स्टारबक्स आहे तिथे पार्किंग व आत बसायला भरपूर जागा आहे व असते. पण तिथे तो घी दोसा नाही साबुदाणा वडा नाही ती वैशालीची ग्लासातली कॉफी तर नाहीच्च.

बकेट लिस्ट वर आयटम क्रमांक एक ते दहा हेच आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेरे, माहेरच्यांचा ही अवस्था तर आम्हा पामरांचे दुःख काय वर्णावे. तीन चार वेळा जागा मिळवण्याचा प्रयत्न केला पण अजुन तरी तिथे खाण्याचा योग आलेला नाही. सध्या तरी फक्त वर्णना वर समाधान (ते ही पुणेकरांच्याच).

मला मिळालीय ती जागा.पण वैशाली बद्दल भावनिक अटॅचमेंट तयार झाली नाही.
जाम कलकल आणी गर्दी वाटली.>>> +१
तीन महिन्यापुर्वी रविवारी दुपारी तीन वाजता गेलो होतो. गार्डन मध्ये बसण्यासाठी ४५ मिनिटे उभे होतो. दोन तीन वेळा काऊंटर ला विचारल्यावर एका टेबलावर नुकतिच ऑर्डर सर्व केली होती त्याचा मागे आम्हा ४ जणाना उभे केले. त्यानंतर आमचा डोसा वडे आल्यावर आमच्या मागे ४ माणसे उभी. २५ वर्षापुर्वीच्या लग्नातला जेवणाचा फिल आला होता. त्यानंतर परत कधी गेलो नाही. लोक निवांत बसुन गप्पा मारत आहेत असे मला तरी जाणवले नाही.

वैशाली सारखी इतर हॉटेल्स असतील तर त्यांची पण नावं लिहा. चव आणि मराठी, उडपी व्हरायटी. मला टेस्टी आणि डिसेंट जागा हवी. शांत खाता आलं तर +1

आता साडेचार वर्षे होतील पुण्यात पण ते वैशाली मध्ये काही खायचा योग नाही. एक तर पार्किंग मिळत नाही लवकर आणि आत समोर/मागे कुठेच जागाही मिळत नाही. मेबी आमचा पेशन्स कमी पडत असेल ...
एकदाच गेलो होतो, ४०-४५ मिंट वाट पाहून तसूभरही गर्दी हाल्ली न्हवती. त्यात तो शन्वार दुपारचा वेळ. आमच्या समोरून वेटर गरमागरम डिशेस हुंगवून नेत होता अन इथं आम्हा दोघांचा भुकेनं जीव चाल्ला होता. कसलं काय शेवटी समोर जाऊन पिझा खाल्ला. पुन्हा काही त्या वाटेला गेलो नाही.

@ योकु >> + १ आम्ही पण ४-५ वेळा प्रयत्न केला पण............ आमचेही पेशन्स कमी पडले आणि त्यानंतर त्या वाटेला गेलो नाही.

सावेरा आहे का अजून तिथे?
चांगल्या क्रोवड साठी गार्डन ची वाट बघन्यापेक्षा सरळ fc मध्ये जावे बनवडा खायला ( मिळतो का अजून?)

Lol

लेख आवडला , समस्या आवडली Proud

जर खरंच काकूळतीने प्रश्न विचारत असाल तर , जरा घोळक्याने जाऊन तिथे बागेच्या रस्त्यातच गर्दी करावी. दोन तीन वेटर्स ना सांगून ठेवावे. वर एक मोठा टेबल रिकामा होत आला आहे हे दिसताच दोघा तिघांनी तिकडे मागे जाऊन उगीचच उभे रहावे. Wink

टेबल रिकामा होणार हे समजणे मात्र अवघड आहे. कारण पहिली कॉफी आली की तुम्ही जाऊन उभे रहाल आणि इकडे लोक अरे बरोबर जरा ब्रेड बटर मागवतील. मग ते संपले की अजून कॉफी येईल. असे करत करत आर्धा तास कसा निघून जाईल पत्ता पण लागणार नाही. Lol

खूप वर्षांपूर्वी पुण्याला गोखले इन्स्टिट्यूट मध्ये शिकायला आणि त्यातून हॉस्टेल वर असल्याने आमची सारी भिस्त रुपाली, वैशाली, आम्रपाली आणि कधी क्वचित त्याच लायनीत थोडं पुढे असणारं दीवार यावर असे. वैशाली आवडत असेच पण रुपालीतला मसाला डोसा आणि कॉफी पण मस्तच असायची. तेव्हा 85 पैशात मसाला डोसा आणि कॉफी मिळत असे.
नंतर पुणं सोडल्यावर एकदा मुलं लहान असताना मुद्दाम त्याना घेऊन वैशालीत गेले होते . डिसेंम्बरची थंडी आणि वैशाली त्यांनी पण एन्जॉय केलं होतं. तेव्हा ही गर्दी होतीच मागच्या बागेत . अलीकडे पाच सहा वर्षांपूर्वी कोथरूड हुन मुद्दाम वैशाली मध्ये गेलो होतो तेव्हा मात्र गर्दीने जीव हैराण झाला. अगदी एसटी canteen च फीलिंग आलं . आता बदललेल्या काळा नुसार मसाला डोश्याच अप्रूप ही कमी झाल्याने तो ही खूप नाही आवडला .
त्या नंतर वैशालीत अजून नाही गेलेय . मनातल्या वैशालीला तसंच जपून ठेवण्यासाठी.

वैशाली आम्रपाली वरून आठवले.पावसाळ्यात रुपालित 2 मायबोलीकर मैत्रिणींबरोबर गेले होते.आम्ही पॉट टी मागवला.मज खेडुताला पॉट टी म्हणजे स्टेशनवर मिळणारी कुलहड मसाला चाय वाटत होती.ते आल्यावर कळले की हा डीप डीप टी एका छोट्या मेटल किटली मध्ये आलाय.तो 3 माणसांचा ऐवज होता.त्याला एकच टी बॅग दिली होती.ती हजार वेळा डीप डीप करूनही खाली चहा उकळत ठेवून 20 फुटावर बांधलेल्या दुधाला त्याची धुरी दिल्यागत तो लाईट होता.म्हणून त्यांना जादा टी बॅग मागितली.नोकराने मालकाला सांगितल्यावर दोघांच्या चेहऱ्यावरचे भाव 'आज जादा टी बॅग मागतायत, उद्या लिव्हर चा तुकडा मागतील' असे होते.म्हणून मग आम्ही अजून डीप डीप करत बसलो.शेजारी बसलेल्या कुटुंबाने सहानुभूती देऊन 'ओह, पॉट टी मागवला होय?' म्हणून मेदूवडा चांगला असतो म्हणून सल्ला दिला.तो आम्ही मागवला.चांगला होता.आणि तितक्यात मालकांच्या माणुसकीला पाझर फुटून त्यांनी एक्स्ट्रा टी बॅग पण दिली.मग आम्ही अजून थोडे डीप मारून तो चा प्यायला.पण प्राईस च्या मानाने क्वांटीटी पैसे वसूल.पुढच्या वेळी खिश्यातून 2 टी बॅग घेऊन गेले तर चांगला परवडेल. ☺️☺️

अनु Happy
मी आणि बायको डेट करत असताना आम्रपाली मध्ये गेली होतो, 730-745 pm चा सुमार असेल, रिकामे होते,
आणि एक कटलेट वाढायला 3 वेटर बाजूला उभे Sad
अगदी पर्सनालिज्ड अटेन्शन.
परत त्या हॉटेल ची पायरी चढलो नाहीयोत

कोणीतरी आपलं हवं जे आपल्यासाठी जागा अडवेल. Happy
तुम्ही ज्या कूल अन रापचिक पोरापोरींना तिथे पाहता त्यांना अशीच जागा मिळत नाही, तर त्यांच्यासाठी ती कोणीतरी अडवली असते Happy

मी अनु, Lol
सिम्बा, भरवलं नाही का? Wink

सिम्बा, भरवलं नाही का?
नवीन Submitted by सायो on 18 December, 2017 - 19:42
>>
अरेरे! इतका हिन अभिरुची असलेला प्रतिसाद एका स्त्री कडून अपेक्षीत नव्हता.

टिळक रोडवरच 'न्यू रिफ्रेशमेन्ट हाऊस' कसं आहे? मला गरवारे च्या opp ला जे सकाळचे ब्रेकफास्ट जॉइन्ट्स आहेत, त्यांचे सगळे ब्रेकफास्ट items आवडतात. ते पार्सल आणावं लागतं. तिथे बसून/ उभं राहून खायला जागा नाही. गेल्या काही वर्षांत तिथला ब्रेकफास्ट पण खाल्ला नाही.
कांचन लेनमधील कृष्णा dining भंकस आहे.आमचं एक केळवण पुणेकरांनी तिथे केले होते. एवढी लाइन का होती कळलंच नाही.

सिंबा, मि-अनू Lol

अक्कलशून्य, अभिरुची च्या व्याख्या स्त्री आणि पुरूषांकरता वेगळ्या असतात काय?

सायोने ते पोस्ट जसं लिहीलं आहे त्यावरून तुम्ही उगीच कांगावा करू शकता पण किमान ह्या ठिकाणी मला तरी ती फक्त अतिशयोक्ती अलंकार वापरत आहे अभिरूचीहीन पणे ऑफर करत असेलेल्या "ओव्हर"सर्व्हिस करता असं दिसतंय मला.

वैशाली गार्डन बद्दल चर्चा का ? (आमच्या वेळचे पुणे मोड जावं लागणार)
तर गर्दीच आवडत नसेल तर वैशाली मधे जाऊ नये कारण तिथली गर्दी प्रिमेन्यु सारखी ट्रिट केली जायची , खाणं आणि चहा येत नाही तोवर डोळे शेकून घ्यायचे , जमलं तर २-४ फिल्डींग लाऊन घ्ययाच्या , कोण सध्या कोणा बरोबर आहे इ. अपडेट्स मिळवायचे.
गार्डन मधे जागा कशी मिळवावी :
तर यासाठी लिटरली जे हादडतायेत त्यांच्या खुर्चीच्या मागे जाऊन निर्लज्जपणे उभं रहायची पध्दत होती एके काळी !
जनरली मुलींचा गृप मुलांच्या टेबल पाशी आणि मुलांचा मुलींपाशी !
त्यात एखाद्या स्मार्ट हँडसम मुलाला बोलायचे स्किल्स सुध्दा असतील तर तो कॉन्व्हर्सेशन सुरु करायचा अनोळखी मुलींशी त्यांच्या टेबलवर , आमच्या सारख्या दयाळु मुली मग जागा करून द्यायच्या !
एकदा तर एका अनोळखी गबरु जवान मुलानी बिंधास्त “ २ दोस्त १ प्यालीमे चाय पियेंगे, इस्से दोस्ती बढती है क्या“ डॉयलॉग फेकून बाजुची खुर्ची आणि अर्धा कप कॉफी (चहा नव्हता ) दोन्ही मिळवलं होतं Proud
ट्रॅडीशनल डे, रोझ डे ची मज्जा कॉलेजपेक्षा वैशालीत जास्तं दर्शनीय असायची.
तर खाण्यापेक्षा अशा डोळ्यातले बदाम आठवणी जास्तं.
.
.
.
.
.
.
असो, तर यु. एस. ला आल्यानंतर पाहिल्या इंडीया ट्रिप मधे रिलिजसली फर्ग्युसन आणि वैशालीत गेले तर लक्षात आलं कि गेल्या पजामा छाप गर्दी वाढली आहे.
थोड्क्यात जो जीता च्या झेवियर्स टाइप क्राउडची जागा मॉडेल कॉलेज क्राउडने घेतलीये Wink
.
.
.
.
.
लेटेस्ट अपडेट
२०१२ इंडीया ट्रिप नंतर वैशालीवर ऑलमोस्ट बहिष्कार टाकलाय.
गार्डनमधे जागा मिळाली, बिझी डे वगैरे होता ठिक आहे पण ४५ मिन वेट नंतर वेटर चुकीची ऑर्डर घेउन आला, अजुन २० मिनिटांनी पुन्हा चुकीची ऑर्डर, फुड असतं तर खाल्लं असतं पण चहा फक्त. मी चहा पित नाही.
त्या नंतर जे घडलं त्यामुळे बहिष्कार.. तर चुकीचा चहा परत नेताना तो उकळता चहा वेटरनी माझ्या अंगावर उकळता चहा सांडला आणि कप फोडला, त्या जाडच्या जाड कपाच्या असंख्य बारीक बारीक तुकडे माझ्या कोपरापासून बोटापर्यंत बोटात घुसले.
आसपासच्या टेबल्स वरचे लोक धावत मदतीला आले , वेटरला फस्ट एड बॉक्स बद्दल विचारलं तर नाही सापडत म्ह्स्णाला, काहींनी जाऊन मॅनॅजरकडे कंप्लेंट केली आणि निदान बर्फ पाठवा म्हणून सांगितलं , बर्फ शेकला फक्तं आणि तडक डॉक्टरकडे जावं लागलं .
I am sure server had hard day , he’s a human being too पण त्याच्याकडे किंवा मॅनेजमेन्टकडे कोणाला एक सॉरी म्हणायला वेळ नवह्ता, सो टाटा बाय बाय वैशाली .
अशा प्रकारे वैशालीशी लिगली डिव्होर्स झाला नसला तरी सेपरेशन मोड मधे आहे, आता इंडीयात गेले कि आणि फर्ग्युसन रोडला थांबावसं वाटलं कि वाडेश्वरच्या रिलेशन्शिपम्धे लॉयल रहायचा प्रयत्न असतो.

आमच्यावेळचं पुणं डॉयलॉग राहिलाच..
तर आमच्या कॉलेजलाइफच्या वेळी वैशालीचे वेटर्स असे नव्हते.. २० लोकांच्या गृपनी कितीही काहीही काँप्लिकेटेड ऑर्डर्स दिल्या तरी बरोबर ज्याच्या त्याच्यासमोर त्याची ऑर्डर ठेवायचे.. तिथल्या फुड सारखे वेटर्स फेमस होते एकदम चुणचुणीत आणि क्राउड मॅनॅजमेंट स्किल्स असलेले.
कितीतरी स्टुडंट्स नॉस्टॅलजिआ आला कि वेटर्सशी सुध्दा गप्पा मारायला जायचे.

आजच वैशालीत जाऊन SPDP खाल्ली :-). अर्थात गार्डनमध्ये नाहीच. लेकासाठी प्लेन डोसा. आता दक्षिण भारतात डोसे खायची सवय झालेली असल्याने हा डोसा आम्हाला काही फार आवडला नाही Happy .
मुळात माझं काही वैशालीशी भावनिक कनेक्शन नाही. नवर्याचं आहे, म्हणून जातो पुण्यात आलो की कधीकधी.
मी_ अनू, <<'आज जादा टी बॅग मागतायत, उद्या लिव्हर चा तुकडा मागतील' >> :- D

डिजे! अगदिच बेकार अनुभव
मला पुण्यात शिकुन वैशाली,वाडेश्वर या कशाचच कवतिक नाही... ओव्हरहाइप आहेत ते सगळ , पैसे देवुन खाण्यासाठी (आणी पन्गतित ही) टेबलाच्या मागे उभ राहाव लागण यासारखा ऑकवर्ड प्रकार नाही.
बाकी डिजे म्हणते तशा क्राउड मधे असाल तर चलता है पण त्या एज मधे सबकुछ चलता है च असतय.

CTR, MTR किंवा गेलाबाजार कुठल्याही ' सागर' चा डोसा या आजच्या वैशालीच्या डोशापेक्षा किती तरी चांगला असतो Happy
म्हैसूरला मैलारी की काहीतरी नावाची एक डोसा मिळण्याची जागा आहे. तिथला डोसा कुरकुरीत नाही, तर मऊ असतो. अहाहा! काय सुंदर होता तो डोसा! Happy
तुम्हाला नाही आवडत बंगलोरचा डोसा?

कित्येक वर्षात गेले नाहीये वैशालीला!
तिथल्या फुड सारखे वेटर्स फेमस होते एकदम चुणचुणीत आणि क्राउड मॅनॅजमेंट स्किल्स असलेले. >>> हे आठवतंय मात्र.
चहा सांडला, कप फुटला अनुभव भयंकरच. वाडेश्वर ला मात्र दर ट्रिप मधे जाणं होतंच.
मेहेंदळे गॅरेज रोडवरचं ' अभिषेक' >> अगदी अगदी. आमचंही अगदी फेवरेट होतं ते.

वैशाली हे एक कल्चर होतं, कॉलेज लाइफ कल्ट्स पैकी एक.
फक्तं खादाडी किंवा ऑथेटिक साउथ इंडीयन फुड साठी नव्हतच वैशाली, कॉलेज लाइफ एंजॉय करायचा अड्डा हा मेन युएस्पी.
त्यामुळे खव्वय्यांसाठी नाहीच.
साउथ इंडीयन स्नॅक्स देणारी असंख्य रेस्टॉरंट्स गल्लीबोळात आहेत अर्थातच आणि वैशालीच्या एस्पीडीपी पेक्षा बेटर चाट ऑप्शन्स देणार्या असंख्य गाड्या /चाटहाउसेस .

वैशाली हे एक कल्चर होतं, कॉलेज लाइफ कल्ट्स पैकी एक.
फक्तं खादाडी किंवा ऑथेटिक साउथ इंडीयन फुड साठी नव्हतच वैशाली, कॉलेज लाइफ एंजॉय करायचा अड्डा हा मेन युएस्पी.
त्यामुळे खव्वय्यांसाठी नाहीच.>>>अगदी अगदी
कॉलेजच्या दिवसात आमचा १०-१२ जणांचा ग्रुप सकाळच्या न्याहरीसाठी कमी पण धमाल करायलाच तिथे जायचा Happy

वैशाली ऐकून माहीतेय, त्यामुळे रिलेट नाही करु शकत.

मी अनु पॉट टी अनुभव Lol

सिम्बा कटलेट अनुभव Lol

दीपांजलीचा अनुभव Sad , मदत केली नाहीच आणि दिलगिरी पण व्यक्त केली नाही कोणी संबंधितानी हे फार चुकीचं धोरण वैशालीचं.

वैशाली हे टोटल नॉस्टॅल्जिया प्रकरण आहे. तिथे जाऊन कम्पलसरी भावुक होणार्‍या मंडळींना ह्या वरच्या (एक्सेप्ट डीजे) पोस्टीतले प्रॉब्लेम्स जाणवणार नाहीत.. (ह्यात मी पण आले.)

पण तरीही वैशालीपेक्षा वाडेश्वरचे फुड आवडले हा प्रामाणिक फीडबॅक. ते सुद्धा कल्याणीनगरचे (की कोरेगाव पार्क?) वाडेश्वर. बसायला निवांत जागा मिळते. (आता हे लिहून तिकडची पण जागा कमी होण्याची सोय केली मी! :))

यस, फुड एनीटाइम बेटर इन वाडेश्वएर !
Btw वैशालीच्या बीबीवर वाडेश्वरची इतक्यांदा आठवण निघतेय, आता आप्पे रस्सम करावं लागणार Happy

आमच्या वेळच्या वैशालीतले वेटर्स प्रेमातल्या जोडप्यांच्या चिठ्ठ्या पण पोचवायचे. काही वेटर्स तर नंतर पार पडलेल्या त्या प्रेमी जोडप्याच्या विवाहाला व नुकत्याच पार पडलेल्या त्यांच्या लग्नाच्या रौप्यमहोत्सवालाही आले होते.

CTR, MTR किंवा गेलाबाजार कुठल्याही ' सागर' चा डोसा या आजच्या वैशालीच्या डोशापेक्षा किती तरी चांगला असतो ---- ओके.
मी खूप वर्षांत गेलेले नाही वैशालीत. त्यापूर्वी पण दोन-तीन वेळेसच गेले आहे. मला वाटलंच होतं तुम्ही CTR, विद्यार्थी भवन असा विचार करत असणार. मला इथले जाड डोसे आवडत नाहीत. इडली, मेदूवडा पण नाही आवडतं. तरी खाते ते सोडा Happy

अरे इतक्या पोस्ट्सनंतरही तो व्हॉअ‍ॅ फेमस जोक नाही टाकला का कोणी? Happy

एक बाई वैशालीत मागच्या बागेत गेली. सर्व टेबल्स फुल्ल होती आणी बरंच वेटींग होतं. तर ती मोबाईलवरुन कोणालातरी फोन लावून मोठ्ठ्या आवाजात बोलते - "अगं तुझा नवरा इथे वैशालीत कुठल्यातरी मैत्रीणीसोबत बसलाय बघ, लवक्कर ये!"
५ मिनीटांत ७-८ टेबले रिकामी झाली.

एके काळी वैशालीत रोज पडुन असायचो ९६-९९ साली. समोरच OFFICE होते (Kirloskar Consultant, opp British Library, Those were the days ) मधे एकदा मुलाला घेवुन गेलो तर बाबा कसल्या फालतू होटेलात घेवुन आला आहे असे भाव. तो गुरगावातल्या pirates of grills, Pind Baluchi, starbucks etc ला सरावलेला मुलगा त्याला ती तुफान गर्दी काही झेपेना. परत काही गेलो नाही.

वैशाली कल्चर आणि वैशालीतले जुने वेटर्स याबद्दल डीजे आणि मेधावि ला एकदम अनुमोदन...
गर्दीमुळे मीही गेल्या चारेक वर्षांत वैशालीत गेले नाहीये. त्यापेक्षा रूपाली आणि वाडेश्वर सोयीचं पडतं.

कुणीतरी वरती लिहिलंय त्यामुळे आयएमडीआर च्या कॅन्टीनचा बनवडा आठवला.. स्लर्र्प.

व्याडेश्वर काय च्या कै महाग आहे आणि चव अगदी खराब.काही महीन्यांपुर्वी लॉ कॉलेज रोडवर गेलो होतो तेव्हा तिथे गेलो होतो.आप्पे मागवले ,८० रुपयात ६ पिटुकले आप्पे आले.ज्या डीशमधे आणले होते त्याचे आणि पदार्थाचे गुणोत्तर १०:१ होते.मोजून दोन मिनीटात ते संपले देखील.

रूपाली आम्रपाली का आहेत मला माहीत नाही. काहीच कनेक्षन नाही. वाडेश्वर माझ्यालेखी इमिग्रंट स्टेटस. वैशालीत खाणे मस्तच मिळते पण स्वाद घेउन खाता येत नाही. परवा मी माफक मजा केली. पुढच्याच पण डिवायडर च्या गार्डनच्या साइड ला जागा मिळाली. बरोबर नारायण धारपांचे पुस्तक होते. क्रिस्प मेदू वडा व साधा डोसा खाल्ला. सांबार चटणी लै भारी बेस्ट. एक डेटिंग टाइप कपल वाट बघत उभे होते. त्यांना वर्स्ट पॉसिबल टेबल म्हणजे ह्या भागात एक टू सीटर व एक खुर्ची असे आहे. त्या चौथ्य खुर्चिच्या जागी वेटर लोकांचे सामान ठेवण्याचे कपाट आहे सारखे डिस्टर्ब होते. पण त्यातला मुलगा मैत्रिणीला म्हणालाच जागा मिळाली हेच भाग्य समज. तिचा चेहरा काही दिसला नाही.

शेजारच्या टेबलाशी एक बाई, एक बाप्या व एक पोरगा ह्यांच्या बिल देउनही आयु ष्य वगैरे गप्पा चालू होता. हॉटेलची एक अधिकृत व्यक्ती आली व पॉईटेडली ते बिल पे केलेले काळे फोल्डर चेक करून गेली. पुढच्या क्षणाला गप्पा बंद करून ते निघाले तिथून. नशिबाने मला पुस्तक वाचू नका असे कोणी सांगितले नाही.

मी ह्याव र दोन उपाय काल शोधले. एक तर पार्सल घेउन कमलानेहरू पार्क किंवा संभाजी पार्कात जाउन निवांत बसून खायचे. पण ह्यात दोन्ही कडच्या भेळेवर अन्याय आहे. नाहीतर वैशालीतून खालून भुयार खणूण ते स्टारबक्स मध्ये निघावे. इथली ऑर्डर तिथे सर्व्ह व्हावी आपण स्टारब स्कात आरामात नेट सर्फ करत बसावे. एकदम तो पोरगा ओर्डेल मस्साला दोशा अँड साबुदाणा वडा फॉर अ‍ॅश. मग ते पार्सल घेउन यावे. व खावे. मज्जानु लैफ.

पण सीरीअसली ते ओनर कोण आहेत ते ती जगा रिडिझाइन करून रीडेव्हलप करून टू स्टोरी का बांधत नाहीत. मुंबईत बांद्र्याला कँडीज आहे तसे करता येइल. अनदर लव्हली प्लेस टु व्हिजीट अँड इट. नव्या वर्शात गेले पाहिजे.

आता गं बया!!
वैशाली रिडेव्हलप??? नही!!!! (मला काय फरक पडत नाय, वैशाली शी भावनिक अटॅच असणार्‍यांची रिअ‍ॅक्शन कोट केली. Happy )

वैशाली त गेल्या गेल्या थेट मागे जाउन त्यान्च्या माणसाला सान्गायचे आपण किती जण आहोत ते आणि मग वाट बघत बसायची. जर २ ते ३ जण असतील तर फार वेळ नाही लागत. पण खूप जास्त लोक असतील तर नाही सान्गता येत किती वेळ लागेल. नेहमी जाणार्याना तो ओळखायला लागतो. रविवारी सन्ध्याकाळी अजिबात जाउ नये. प्रचन्ड गर्दी असते. त्या मानाने working days ना सन्ध्याकाळी गर्दी कमी असते.
वैशालीत ला Mysore masaalaa Dosaa खाण्यासाठी काय पण!!

वैशाली कल्चर आणि वैशालीतले जुने वेटर्स याबद्दल डीजे आणि मेधावि ला एकदम अनुमोदन...>>=१००
अन वरदाच्या आय एम डीआर बनवडा आठवनीला देखील !! Happy
कॉलेजात असताना ६ तासाचा डिझाइन चा पेपर असायचा सलग ३ दिवस . मधे १-२ लन्च ब्रेक !१ वाजताच टेबल बूकिंग अन ऑर्डर द्यायचो आम्ही अन आमच्यासाठी राखून ठेवलेल असायच टेबल . निदान ९-१० जणांसाठी. पण दिज वर द डेज! एका जुन्या वेटर ( अन मग मॅनेजर नी जंगली महाराज रोड वर ( पूर्वी न्युयॉर्कर होतं तिथे )स्वतःच रेस्टॉरंट सूरू केलय. चव सेम ! बसायला जागा हीअसते.
पण वैशाली हे खाण्यापेक्षा तिथल्या वातावरणासाठी जाण्याच ठिकाण आहे ( होत! ) आमच्या ग्रुप मधील अनेकांच्या चिठ्ठ्यांच आदान्प्रदान तिथल्या अण्णांनी केलय !

बागेत अमा! पायर्‍या उतरल्या की समोर जे मोठ टेबल आहे तिथे!>>> ये अँ ड द अवार्ड सॉरी द बेस्ट टेबल गोज टू इन्ना.

Pages