हे सव्यसाची,

Submitted by अनन्त्_यात्री on 23 October, 2017 - 02:27

खुणावतील तुला जटिल गणिते-
विश्वाच्या महास्फोटी प्रसववेणांची

हाकारतील तुला कोडी-
* विस्कळखाईत क्षणोकणी होणार्‍या
विश्वाच्या अटळ अंताची#

या अपार भूतभविष्यादरम्यान
लीलया झेपावणारा तुझ्या प्रज्ञेचा झोका
कुठे खिळवलाय, हे सव्यसाची?

तो इथेय बघ,
निळ्या पाखरपंखावर
अथक थिरकणार्‍या
क्षणभंगूर वर्तमानात

(*entropic end of the universe#)

Group content visibility: 
Use group defaults

@vb,
दुटप्पी, two handed, एकाच वेळी दोन गोष्टी करणारा/सांभाळणारा.
येथे अभिप्रेत असलेला अर्थ अनंतजी अधिक विस्ताराने सांगतिलच.. Happy

*सव्यसाची (= दोन्हीपैकी कोणत्याही हाताने एखादी क्रिया सारख्याच सफाईने करणारा/री) हे धनुर्धर अर्जुनाचे एक नाव होते.
*इथे मात्र हे संबोधन "unusually skillful ,versatile"या अर्थाने उत्तुंग प्रतिभेच्या मानवाला उद्देशून मी वापरलंय.

शशांकजी, धन्यवाद!
entropy = gradual decline into disorder. यातील disorder, जी वैश्विक स्तरावर असल्यामुळे एखाद्या अथांग खाईसारखी ओलांडता न येणारी असेल, तिला उद्देशून लिहिताना हा शब्द सुचला. Happy

अनंतजी थोड्या प्रयासानंतर मला लागलेला अर्थ
Disentigration of the galaxies .
त्या दृष्टीने विस्कळखाई चपखल बसतो .
सुंदर !!!!

-दत्तात्रयजी, प्रतिसादाबद्दल आभार!
-अवांतरः विश्वांताबद्दल सध्या प्रचलित असलेल्या थिअरीजपैकी एका थिअरीनुसार वैश्विक स्तरावर औष्णिक-दृष्ट्या अनुत्पादक प्रकारच्या ऊर्जेचे (=disorder चे= विस्कळीचे) प्रमाण सतत वाढत जाणार आहे त्यामुळे सर्व वस्तुमात्राचे तापमान कमी कमी होत जाऊन ते अ‍ॅब्सोल्यूट शून्य (-२७३ सेल्सिअस) पर्यंत पोहोचेल. हाच विश्वाचा औष्णिक अंत असेल.