धर्म इथे बेताल झाला

Submitted by सिद्धेश्वर विला... on 2 March, 2020 - 03:26

धर्म इथे बेताल झाला

उठतासुटता जहाल झाला

वापरले कैक रंग त्याने

कोथळा बाहेर येताना मात्र लालच झाला ...

किती चढले सुळावर त्याच्यानावे ,

मारणारे गनीम आणि मरणारेही ..........

पाळणारे , जाळणारे , बघणारे अन भडकवणारे

पण .........जो तो हलाल झाला

जन्नत नसीब झाली कुणा

तर कुणी स्वर्गात पोहोचले

अरे पण त्यांचे काय झाले असेल ?

ज्यांच्या जाण्याने , उभे घर पोळले

अपराध कुणाचा , कुणी भोगला

कामकऱ्याला जागेवरी ठोकला

मर्दुमकीचा झेंडा मिरवुनी

हिरवा भगवा पुढे नाचला

हिजडे हरामी धर्मवेडे

रंगबिरंगी धर्मांमध्ये

फुका पाजती विषाचा प्याला

माणूस मेला ,,, धर्म राहिला , धर्म राहिला

Group content visibility: 
Use group defaults

खरंच मनापासून राग येतो या धर्मवेड्या लोकांचा .. मग ते कुठल्याही धर्माचे का असेनात .. हे जे लोकसंख्येवर चर्चासत्र झाडते तेही थांबायला हवे .. फक्त हिंदू धर्म याबद्दल बोलायला गेलात तर तो महासागर आहे .. किती स्थित्यंतरे येऊन गेली , ना तो संपला ना संपणार .. पण या नेतेलोकानी आज कुठे नेऊन ठेवलाय बघा .. हे जे भगव्याच्या नावाखाली पोळी शेकणे चालू आहे ते कधी थांबणार देव जाणे ..
मुसलमान मग ते कुठलेही असोत , अगदी आरामात भरडले जातात , कारण शिक्षणाचा अभाव आणि बरेच जण अडाणी असल्याने , किंवा गरिबीने पछाडलेले असल्याने आरामात भडकावणाऱ्या लोकांच्या जाळ्यात अडकतात .. कुठल्याही धर्माचे उदात्तीकरण जेव्हा थांबेल तेव्हा आणि तेव्हाच देश धर्मनिरपेक्ष होईल अन्यथा नाही ...

भगवा मनात माझ्या

भगवा तनात माझ्या

सोनेरी तेज जो देई

तो सूर्यही भगवा माझा

जेव्हा धर्म लढाया आला

रंगांचा लेउनी शेला

मी मर्दमराठा होऊनि

शिवबाचा बनतो चेला

किती विष बाळगी मनात

अरे काय आहे आयुष्यात ?

जर मर्दमराठा असशील

तर घे उडी त्या वणव्यात

किती आले अन किती गेले

हिंदू तरीही तरले

भगव्यापुढे कुणीच नाही

भगव्यातच सगळे विरले

सिद्धेश्वर, तुम्ही लिहित चला. ज्याला जे आवडेल ते तो वाचत असतो. कुणाला आवडेल म्हणून लिखाण करू नका. काही आयडिंना सरळ इग्नोर मारा. त्यांना टाळून लिखाण सुरू ठेवा.

हे जे भगव्याच्या नावाखाली पोळी शेकणे चालू आहे ते कधी थांबणार देव जाणे ..
>> माझा प्रतिसाद या वाक्याला उद्देशून होता. भगव्याला पाठिंबा देणारे मुर्ख खचितच नाही.