मंडळी, आपण लहानपणी नाव गाव फळ फुल नक्कीच खेळला असाल. त्याच खेळाचे हे थोडेसे विस्तारीत रुप आहे.
नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी
झब्बू मधे एकाच अक्षराने सुरू होणार्या "नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी" ह्यांची यादी देणे अपेक्षित आहे. पुढच्या झब्बू देणार्याने आधीच्या झब्बू मधील कुठल्याही शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरून सुरू होणार्या "नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी" ह्यांची यादी द्यावी. होऊ द्या तर मग सुरू.
हे लक्षात ठेवा -
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच पोस्ट टाकावे.
३. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
४. लेखकाचे नाव, आडनाव, टोपणनाव काहिही चालेल. लेखक, कवी, नाटककार चालतील.
५. प्राणी म्हणजे पक्षी सोडून इतर कुठलीही प्रजाती (अगदी मासे सुद्धा चालतील)
नाव - अंजली
नाव - अंजली
गाव - अमरावती
फळ - आंबा
फूल - ऑर्किड
पुस्तक - आहे मनोहर तरीही
लेखक - अरुण कोलटकर
प्राणी - अजगर
अक्षर क
लता
लासलगाव
लिची
लिली
लमाण
लक्ष्मण माने
लांडगा
लाल निखार
अंजलीतला ल
अंजलीतला ल
नाव - लैला
गाव - लासलगाव
फळ - लिची
फूल लिली
पुस्तक - लमाण
लेखक - लैला महाजन
प्राणी - लांडगा
पक्षी लांडोर
अरे.. मीपण ल च घेतला भरत
अरे.. मीपण ल च घेतला भरत
जो कोणी लिहीत असेल त्याने
जो कोणी लिहीत असेल त्याने रुमाल असे लिहून प्रतिसाद विंडो बुक करावी.
लासलगाव लिची लिली लमाण आणि
लासलगाव लिची लिली लमाण आणि लांडगा यांना पाच पाच मार्कं
बाकी दहा दहा
हो . ८ पैकी ५ सेम आहेत. युनिक
हो . ८ पैकी ५ सेम आहेत. युनिक असणार ही नावं.
अक्षर- र
अक्षर- र
नाव- राम
गाव- रत्नागिरी
फळ- रातम्बा
फुल- रातराणी
पुस्तक- राऊ
लेखक- रणजित देसाई
प्राणी- रातकिडा
पक्षी- रोहित
रुमाल
राताम्ब्यातला ब
नाव- बभ्रुवाहन
गाव- बेलग्रेड
फळ- बेल
फूल - बकुळ
पुस्तक- बिढार
लेखक- बाळ सीताराम मर्ढेकर
प्राणी- बेडूक
पक्षी- बदक
बभ्रुवाहन मधला न
बभ्रुवाहन मधला न
नाव नागेश
गाव- नागपूर
फळ- नारळ
फूल - नागचाफा
पुस्तक- नागाचे रहस्य
लेखक- नारायण धारप
प्राणी- नाग
पक्षी- नीलकंठ
नीलकंठमधील क
नीलकंठमधील क (ठ वरून काही पर्याय नसल्याने )
नाव - कौस्तुभ
गाव- कणकवली
फळ- केळी
फूल - कमळ
पुस्तक- कोल्ह्यात्याच पोर
लेखक- किशोर शांताबाई काळे
प्राणी- कोल्हा
पक्षी- कावळा
जाई. - नीळकंठ म्हणजे शेवटचे
जाई. - नीळकंठ म्हणजे शेवटचे अक्षर ठ होईल ना
आधीच्या झब्बू मधील कुठल्याही शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरून सुरु करायचं आहे.
मी घेतलं होतं धारप मधले प
नाव पुष्कर
गाव- पुणे
फळ- पेरु
फूल - पारिजातक
पुस्तक- पडघवली
लेखक- पु. ल. देशपांडे
प्राणी - पाणघोडा
पक्षी- पावशा
पावशा चा श घेतला
पावशा चा श घेतला
नाव : शलाका
नाही येत
गाव- शहाड
फळ- शहाळं
फूल - शेवंती
पुस्तक- शाळा
लेखक- शं ना नवरे
प्राणी -
पक्षी- शहामृग
हर्पेंन , मी लिहिलेय की ठ
हर्पेंन , मी लिहिलेय की ठ वरून पर्याय नसल्याने क अक्षर घेतलं आहे.
अक्षर- र
अक्षर- र
नाव-रेहान
गाव-रांजणगाव
फळ-रासबेरी
फुल-रातराणी
लेखक-रणजीत देसाई
पुस्तक-राऊ
प्राणी-रानडुक्कर
पक्षी-राजहंस
हुश्श। जमलं ।
धनुडी, शेळी होऊ शकते???
धनुडी, शेळी होऊ शकते???
मी म वरून कोण एन्ट्री देतंय
मी म वरून कोण एन्ट्री देतंय का वाट पाहतोय. नाहीच दिली तर संध्याकाळी जे मिळेल ते अक्षर घेऊन लिहीन.
धनुडी, शेळी होऊ शकते???> हो
धनुडी, शेळी होऊ शकते???> हो मी अत्ता तेच लिहायला आले होते
अक्षर- स
अक्षर- स
नाव-स्मिता
गाव-सोलापूर
फळ-संत्रे
फुल-सायली
लेखक-सुमती kshetramade
पुस्तक-सांगे वडिलांची कीर्ती
प्राणी-ससा
पक्षी-साळुंकी
अक्षर - राजहंस मधील स
अक्षर - राजहंस मधील स
नाव - समीर
गाव - सोलापूर
फळ - संत्र
फुल- सदाफुली
लेखक- सुमती क्षेत्रमाडे
पुस्तक- स्वामी
प्राणी - ससा
पक्षी - साळुंकी
अक्षर- ससा मधलं स
अक्षर- ससा मधलं स
नाव- सुंदरा
गाव- सातारा
फळ- सुपारी
फुल- सोनचाफा
लेखक- सानिया
पुस्तक- सोलेदाद (विलास सारंग)
प्राणी- सायाळ साळिंदर
पक्षी- ससाणा
Are aashwini11 ani mazee बरीच
Are aashwini11 ani mazee बरीच कॉमन अलीत.
नाव माहिरा
नाव माहिरा
गाव मुम्बई
फळ मोसंबी
फुल मोगरा
लेखक मधु मंगेश कर्णिक
पुस्तक माहिमची खाडी
प्राणी मांजर
पक्षी मोर
हो देवकी
हो देवकी
मी पण राजहंस मधला स घेऊनच सुरु केले होते आणि न माझ्या यादीतही सोलापूर संत्रे आणि सायली लिहिलेले होते; तुमच्या याद्या बघितल्यावर ते बदलले
मोसंबीतला ब
मोसंबीतला ब
नाव बबन
गाव बेलापूर
फळ बेलफळ
फुल बकुळ
लेखक बाबा कदम
पुस्तक बनगरवाडी
प्राणी बैल
पक्षी बगळा
अक्षर : मोसंबीतले ब
अक्षर : बाबा कदम मधले म
नाव: मधुमती
गाव: मनमाड
फळ: मोसंबी
फूल: मधुमालती
पुस्तक: मेरा परिवार
लेखिका: महादेवी वर्मा
प्राणी: मानव
पक्षी: मोर
(हे मी सगळ्यात आधी लिहून ठेवले होते पण पोस्ट जात नव्हती.)
अक्षर - शेवंती मधील त
अक्षर - शेवंती मधील त
नाव - तनुजा
गाव - तळेगाव
फळ - तुती
फुल - तगर
लेखक - त्र्यंबक बापूजी ठोंबरे
पुस्तक- तोतोचान
प्राणी - तरस
पक्षी - तितर
देवकी , हो ना , म्हणून अजून
देवकी , हो ना , म्हणून अजून एक अक्षर घेऊन प्रयत्न केलाय परत
मी कुठले अख्तर घेऊ ?
मी कुठले अख्तर घेऊ ?
व आणि र माझे आणि अश्विनी
त, व आणि र माझे आणि अश्विनी यांच्यातील कॉमन अक्षरे आहेत, या पैकी कुठले घेता आले तर बघा नाही तर शेवटी त्यांची पोस्ट आहे, त्यांच्यातील कुठलेही घ्या.
Pages