बालकविता

अ आ इ ई उ ऊ ऊ

Submitted by सुसुकु on 7 March, 2012 - 13:31

अ आ इ ई उ ऊ ऊ - आई मी लवकर शाळेत जाऊ?
ए ऐ ओ औ अं अः अः - माझा सुंदर गणवेश पहा

क ख ग घ ग घ ङ - आई मी अभ्यास करणारं
च छ ज झ ज झ ञ - मी खूप शहाणा होणारं

ट ठ ड ढ ड ढ ण - आई घंटा वाजे घणघणं
त थ द ध द ध न - माझी शाळा खूप छानं

प फ ब भ ब भ म - आई मला आहे खूप कामं
य र ल व ल व श - करायचा आहे अभ्यासं

ष स ह ळ क्ष ज्ञ ज्ञ - आई मी मोठ्ठा होणार हं

_______________________
चाल - english A B C D ... प्रमाणे.

गुलमोहर: 

बाप्पा, बाप्पा ऐकतोस ना ?

Submitted by पुरंदरे शशांक on 25 February, 2012 - 02:28

बाप्पा, बाप्पा ऐकतोस ना ?

रोज करते नमस्कार
अग्दी वाकून वाकून तुला
चुकून सुद्धा देत नाहीस
सुट्टी कध्धी शाळेला ........

कित्ती बाई सांगते याला
मोठ्ठा मोठ्ठा पाऊस पाड
ग्राऊंड बागा सोडून सार्‍या
शाळा तेवढ्या बंद पाड

कित्ती माझे हात दुखतात
एव्ढाss होमवर्क लिहिताना
उमटू दे की आपोआप
नुसती वही उघडताना

कसलं भारी दिस्तं
फुलपाखरु भिर्भिरताना
एक्दा तरी पंख दे ना
मज्जा येईल उडताना.......

एकदाच अस्सा कोन बनव
आईस्क्रीम मस्त खाताना
संपणारच नाही तो
यम्मी यम्मी म्हणताना.......

बाकी काही नाही केलेस
तरी म्हणेन जाऊं दे
आज्जी मात्र पुन्हा माझी

गुलमोहर: 

माझ्झंच स्केचबुक एकदम भारी...

Submitted by पुरंदरे शशांक on 13 February, 2012 - 01:20

माझ्झंच स्केचबुक एकदम भारी
छान छान चित्रं काढलीत कितीतरी

लाल निळा हिरवा केवढे ते रंग
रंगवताना स्केचबुकमधे होते मी गुंग

यात सारखं बघून हस्तोस का असा
स्टुपिडेस का तू, तुझा स्क्रू ढिलासा

एवढा का माझा हत्ती झालाय हडकुळा ??
फुल कस्लं तुझे.... दिस्तोय खुळखुळा.....

कित्ती कित्ती काढायचेत फुले नी प्राणी
तुला काय चिडवायला मिळाले नाही कुणी ??

नसू दे माझा फुगा गोल जराही.....
तू त्याला चिडवायचे कारणच नाही.......

हसू नको काही या चिमणीला बघून
असेल मोठी झाडापेक्षा..... तू निघ आधी इथून....

गुलमोहर: 

स्केचबुक - माझं नि बाप्पाचं .....

Submitted by पुरंदरे शशांक on 13 February, 2012 - 00:29

स्केचबुक - माझं नि बाप्पाचं .....

एवढंही काही नकोय याचं कौतुक करायला....
इतके का कोणी रंग करतात शाब्बासकीला ??

आकाशाला पहाल तर इथून तिथवर
एकच एक पसरलाय नुस्ता निळसर.....

मातीला काय काळा, लाल नि ब्राऊन
एकदा दिला की मग पाह्यला नको फिरुन

पाण्याला तर काही रंगच नाही !!!
तिथे काही करायचे कामंच नाही !!!

इतकी सारी फुले कशी रंगवणार ?
पेंट-ब्रशशिवाय दुसरं काय असणार ?

वेळ तरी रंगवायला लागतो कितीसा ???
कॉपीपेस्ट करायला लागतो तितकासा !!!

केवढी झालीये प्रॅक्टिस येवढं रंगवून !!!!
चुकणारंच नाही कधी, तर काय मजा त्यातून ?

जर्रा होता रंग माझे इकडेतिकडे ...

गुलमोहर: 

जंगलचा राजा.....

Submitted by पुरंदरे शशांक on 11 February, 2012 - 02:02

जंगलचा राजा...

पिवळी शाल चमकदार
काळे पट्टे बहारदार

शेपूट मोठी दिमाखदार
करडी नजर, धीमी चाल

रुबाब केवढा वाघोबांचा
उगाच का "जंगलचा राजा"

फेंदारलेल्या मोठ्या मिशा
किती दमदार पावले पाहा

फोडता एकच डरकाळी
चिडीचुप अळीमिळी.....
(कशी बसे दातखिळी)

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

वाघाची मावशी

Submitted by पुरंदरे शशांक on 8 February, 2012 - 01:46

वाघाची मावशी......

वाघाची मावशी मनीमाऊ छान
सिप स्पिप करताच टवकारी कान

शांपूबिंपू काही नको, तरी किती स्वच्छ
चाटून चाटून स्वतःला ठेवते अगदी लख्ख

म्याँव म्याँव करत घोटाळते पायात
लाड करुन घेते मावशी ही अचाट

टॉमी समोर येताच गुरकते केवढी
केस फुलवून म्हणते मी तर तुझ्याएवढी.......

(संस्कारीत) वाघाची मावशी - दादाश्रींकडून

वाघाची मावशी मनीमाऊ छोटीशी
सिप सिप करताच उडी मारी इवलीशी

गुलमोहर: 

फुगा फुटला

Submitted by pradyumnasantu on 27 January, 2012 - 14:40

बाळूकडे होता
एक रंगीत फुगा
मस्तीत त्याने टोकले
"काय रे ए ढगा"
ढग ओरडला,
"जमिनीवर काय रांगतो
इथे ये मग सांगतो"
फुगा जायला सुटला
अचानकच फुटला
साराच तिढा सुटला

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

बनू बंटीचा अल्टिमेटम

Submitted by एम.कर्णिक on 23 January, 2012 - 11:26

आबा, तुम्ही आम्च्यावर पाळत ठेवता का हो ?
सग्ळी आम्ची बिंगं माय्बोलीवर फोड्ता ना हो ?

काका काकी, मामा मामी, आत्या तश्या मावश्या
जेव्हा भेटतात तेव्हा कर्तात सग्ळ्याच चौऽकशा

म्हण्तात, "आता दुसरी कसली नौटंकी सांगा ना"
सिक्रेट म्हणून सांगित्लेलं कळलं कसं त्याना ?

बंटी किती चिड्ला होता माइताय नं तुम्हाला?
नंतर मग त्यानं गुग्ली टाक्ला होता क्कस्स्ला !

नको म्हटलं तरी तुम्ही लगेच सग्ळं ल्हीता
आणि गुल्मोहरच्या पाराकडं धाव घेता

तेव्हा कशी नाई हो मऽ दुखत तुम्ची कंबर ?
चुगलखोरीत आम्ही कस्ले? तुम्चाच पैला नंबर

आता आमच्या दोघात दोस्ती झाली आहे बर् का

गुलमोहर: 

बंटीबाबाची गझल........

Submitted by वैवकु on 13 January, 2012 - 04:31

*******************************************
कर्णिक काका बंटीबरोबार संगनमत केल्याबद्दल आधी माफी मागतो ......

गुलमोहर: 

केक, गिफ़्ट, आणि कॅन्डी

Submitted by pradyumnasantu on 10 January, 2012 - 19:42

अकरा-बारा वर्षांच्या पुढील बालांना थोडी दु:ख सह्नशीलता व अनुकंपा यांचीही ओळख करुन देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणूनच ही कविता रचली आहे. ती येथे योग्य नसल्यास क्षमस्व!

केक, गिफ़्ट, आणि कॆन्डी

लांब दिसणारा तो तारा
म्हणजे म्हणे माझा डॅडी प्यारा
माझ्या डोळ्यात तो आणतो
एक आसू खारा
पण असतील का ते खरेच माझे डॅडी?
आणतील का माझ्या बर्थडेपार्टीला
केक, गिफ़्ट, आणि कॅन्डी?
**
डॅडी बहुतेक विसरला
पण का?
आजपर्यंत माझा बर्थडे त्यांनी कधीच नाही चुकवला
पार्टी संपत आली
तारा तर अजून तिथंच लुकलुकतोय
बहुतेक डॅडींना रजा नाही मिळाली
**
थकून शेवटी डोळे मी मिटले

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - बालकविता