स्केचबुक - माझं नि बाप्पाचं .....

Submitted by पुरंदरे शशांक on 13 February, 2012 - 00:29

स्केचबुक - माझं नि बाप्पाचं .....

एवढंही काही नकोय याचं कौतुक करायला....
इतके का कोणी रंग करतात शाब्बासकीला ??

आकाशाला पहाल तर इथून तिथवर
एकच एक पसरलाय नुस्ता निळसर.....

मातीला काय काळा, लाल नि ब्राऊन
एकदा दिला की मग पाह्यला नको फिरुन

पाण्याला तर काही रंगच नाही !!!
तिथे काही करायचे कामंच नाही !!!

इतकी सारी फुले कशी रंगवणार ?
पेंट-ब्रशशिवाय दुसरं काय असणार ?

वेळ तरी रंगवायला लागतो कितीसा ???
कॉपीपेस्ट करायला लागतो तितकासा !!!

केवढी झालीये प्रॅक्टिस येवढं रंगवून !!!!
चुकणारंच नाही कधी, तर काय मजा त्यातून ?

जर्रा होता रंग माझे इकडेतिकडे ...
टीचरचे होते कसे तोंड वेडेवाकडे !!!

असं काही काढ म्हणून सांगा बाप्पाला ....
काही नकोय कौतुक याचे जग रंगवायला !!!

गुलमोहर: 

.

डायरेक्ट ठसन. लई भारी. बाप्पाला पण त्याच्या पेक्षा छोटा चित्रकार फार्फार आवडत असणार