Submitted by पुरंदरे शशांक on 11 February, 2012 - 02:02
जंगलचा राजा...
पिवळी शाल चमकदार
काळे पट्टे बहारदार
शेपूट मोठी दिमाखदार
करडी नजर, धीमी चाल
रुबाब केवढा वाघोबांचा
उगाच का "जंगलचा राजा"
फेंदारलेल्या मोठ्या मिशा
किती दमदार पावले पाहा
फोडता एकच डरकाळी
चिडीचुप अळीमिळी.....
(कशी बसे दातखिळी)
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
ठेक्यात म्हणता येतेय ....
ठेक्यात म्हणता येतेय .... चांगली जमलेय.