बालकविता

हत्तीदादा हत्तीदादा

Submitted by स्वस्ति on 29 May, 2012 - 01:52

लेकाला हत्ती खूप आवडतो , म्हणून असचं काहीतरी बडबडत होते
पण प्रत्येक वेळी 'हत्तीदादा हत्तीदादा'' नाही म्हटल की त्याला वाटायचं की मी दुसरचं कुठलं गाणं म्हणतेय. मग कुरकुर करायचा .
म्हणून प्रत्येक ओळीत हत्तीदादा आला.

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

हत्तीदादा हत्तीदादा दिसता किती छान
ईवले ईवले डोळे आणि सुपाएवढे कान

हत्तीदादा हत्तीदादा खांबासारखे पाय
भले मोठे पोट तुम्ही खातातरी काय

हत्तीदादा हत्तीदादा लांबलचक सोंड
दोन दात बाहेर आणि रिकामेच तोंड

हत्तीदादा हत्तीदादा डुलत डुलत चालता
छोटीशी शेपुट हळुहळु हलविता

गुलमोहर: 

पिल्ले - मनी माऊची

Submitted by पुरंदरे शशांक on 17 May, 2012 - 01:43

पिल्ले - मनी माऊची....

आली अचानक कुठुन कोण
मनी माऊची पिल्लेच दोन

दूध मिळताच आनंदली इतकी
मजेत त्यांनी घेतली गिरकी

खाऊ खावून खेळतात मस्त
कौतुक होते - मनुडी मस्त

पांढरे केशरी पट्टे छान छान
सतत असतात टवकारुन कान

खेळत असतात एकमेकांशी
भांडतातही कधी जराशी

खेळून भांडून दमतात जेव्हा
झोपतात एकमेकांच्या कुशीत तेव्हा

चिंटू - पिंटू जमतात सारे
टाळ्या पिटीत म्हणतात वा रे

पिल्लांबरोबर खेळतात खूप
रोज त्यांना नवा हुरुप....

गुलमोहर: 

माकडाचा शॉवरबाथ.....

Submitted by पुरंदरे शशांक on 16 May, 2012 - 01:09

माकडाचा शॉवरबाथ.....

एक हत्ती गेला तळ्यात
पोहत होता मजेत पाण्यात

सोंडेत घेतले पाणी भरुन
अंगावर घेतो शॉवर मारुन

शॉवर बघता असला भारी
माकडाला आली सुरसुरी

प्लीज प्लीज हत्तीदादा,
एवढे जरा ऐकता का
शॉवरने छान भिजवाल का
मलाही मज्जा येईल बघा

हत्तीदादा आपले गुणी
सोंड भरुन घेतले पाणी

माकडावर सोडता शॉवर
जरा जोरात बसली फुंकर

माकड गेले हेलपाटत
हत्तीदादा बसले हसत

माकड म्हणते नको रे बाबा
शॉवर असला काय कामाचा

मजा तर राहिली लांब
अंग सारे शेकले जाम

गुलमोहर: 

पहिला पाऊस......

Submitted by पुरंदरे शशांक on 12 May, 2012 - 00:53

पहिला पाऊस......

वार्‍याची...... धावपळ
पानांची....... सळसळ

ढगांचा ......... गडगडाट
वीजेचा ....... लखलखाट

पावसाची ...... सरसर
पाण्याची ..... खळखळ

गारांची ....... तडतड
वेचायची .... धडपड

पहिल्या पावसात भिजू चला... भिजू चला
ओंजळीत धारा झेलू चला .... झेलू चला.......

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

माझी बाग

Submitted by वैशाली अ वर्तक on 10 May, 2012 - 10:56

माझी बाग

माझ्या बागेत फुले सुरेख

सांगते तुम्हाला नांव एकेक

दारात पहा बोगन उभी

विसावा देते सर्वांना कशी

जवळच बहरला

झेंडू छान

सर्वांच्या स्वागतास

सदा असतों तयार

गुलाबाची ही ताटवी

पूजे साठी सदा राखली

जुई कशी खिडकीशी लवून

गुलमोहर: 

चांदोमामा चांदोमामा - बडबडगीत

Submitted by पुरंदरे शशांक on 7 May, 2012 - 05:46

चांदोमामा चांदोमामा ...... आभाळात आभाळात
बाळाकडे पहात पहात...... पहात पहात

हसतात कसे गालात गालात ..... गालात गालात
चांदणे सांडते इथे दारात .......इथे दारात

वाकून मामा काय बघतात..... काय बघतात
मंमं झाली का विचारतात........ विचारतात

मंमं लवकर करा चला...... करा चला
आईच्या कुशीत गाई करा.....गाई करा.....

गुलमोहर: 

लांब काने ससे भाऊ

Submitted by पुरंदरे शशांक on 5 May, 2012 - 02:32

गुब्बु गुब्बु मऊ मऊ
लांब काने ससे भाऊ

डोळे कित्ती लाले लाल
शेपूट तर छोटी छान

गाजर पाला खाती खाऊ
लुबु लुबु ससे भाऊ

किती भ्याल भित्रे भाऊ
खाऊ सांगा कुठे ठेउ

खाऊ खाऊन घ्या जरा
टुणुक टुणुक उड्या मारा
(खाऊ करा सगळा फस्त
उड्या मारा मस्त मस्त)

गुलमोहर: 

मऊ मऊ ससेभाऊ

Submitted by पुरंदरे शशांक on 4 May, 2012 - 23:46

मऊ मऊ ससेभाऊ

लांब लांब कान
गोरे गोरे पान
मऊ मऊ ससेभाऊ
कित्ती छान छान

टुण टुण उड्या
मारतात कसे
लोकरीचा बिंडा
दिस्तात तसे

लाल लाल डोळे
शेपूट इवलेसे
नाक कसे उडवतात
मधून जरासे

खातात लुबु लुबु
पाला हिरवागार
लाल लाल गाजरावर
मारतात ताव

गुब्बु गुब्बु ससेभाऊ
बसतात अंग चोरून
हात नका लाऊ
जातील दूर पळून....

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

बोल सोना लवकर बोल.....

Submitted by पुरंदरे शशांक on 24 April, 2012 - 06:27

बोल सोना लवकर बोल.....

माऊ करते म्यॉव म्यॉव
चिऊ करते चिव चिव
काव काव करतो काऊ
भू भू करुन दाखव पाहू

हम्मा हम्मा करतं कोण
में में में में करतं कोण
कुकुचकू करतं कोण
सोंड मोठी हलवी कोण

टॉक टॉक करतं कोण
डरॉव डरॉव करतं कोण
ढुम ढुम ढुमाक वाजतो ढोल
बोल सोना लवकर बोल.....

गुलमोहर: 

बडबड गाणे - आईचे

Submitted by पुरंदरे शशांक on 24 April, 2012 - 05:35

बडबड गाणे - आईचे....

ता ता ता ता गेली कुठे..... गेली कुठे
शाळेत जाऊन खाऊ खाते...... खाऊ खाते

बा बा बा बा आता कुठे.... आता कुठे
आफिश आफिश आणखी कुठे..... आणखी कुठे

आ आ आ आ अस्ते इथे .... अस्ते इथे
बाळासोबत इथे तिथे..... इथे तिथे

तो तो, मं मं बाळ करते...... बाळ करते
खुदकन गालात हस्ते कसे... हस्ते कसे

भुर्र करताच हात काढते...... हात काढते
आ आ आ आ गाणे गाते ..... गाणे गाते

गप्पा आता खूप झाल्या..... खूप झाल्या
लवकर आता गागू करा ..... गागू करा .......

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - बालकविता