बालकविता

सुट्टी संपली -

Submitted by विदेश on 31 October, 2011 - 15:32

सुट्टी संपली दिवाळी झाली
घण घण घंटा ऐकायची
दप्तर पाठीवरती टाकुन
तुरू तुरू घाई पळायची !

पाठांतर अभ्यास परीक्षा
वेळच गुंतुन जाण्याची

गुलमोहर: 

दोन बडबडगीते

Submitted by पाषाणभेद on 23 October, 2011 - 01:38

दोन बडबडगीते

१) ढग वाजले ढम ढम ढम
ढग वाजले ढम ढम ढम
विज चमकली चम चम चम
पाऊस पडला छम छम छम
नाच नाचूनी भिजले कोण?
भिजले कोण?

२) चिमणे चिमणे

चिमणे चिमणे हे दाणे घे हे दाणे घे
आमच्या बाळाला खेळायला ने खेळायला ने

काऊदादा काऊदादा भुर्रकन ये भुर्रकन ये
आमच्या बाळाला युक्ती दे युक्ती दे

ईकडे ये रे भु भु
बाळाशी खेळतोस का तू?

हम्मा हम्मा शेपूट हलव
आमच्या बाळाला पाळण्यात झुलव

- पाषाणभेद

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अ आ आई

Submitted by अभय आर्वीकर on 23 October, 2011 - 01:15

बालकविता

अ आ आई
ब ब बाबा
सी फॉर चाचा
अ‍ॅन्ड डी फॉर दादा

मराठी भाषा अमुची आई
हिंदी-इंग्लिश सिस्टर-ताई
शिकून घेऊ विविध भाषा
सप्त सुरांची जशी सनई

बोर, चिंच, पेरू, आंबे
पितळ, सोने, कथील, तांबे
विविधतेचे दृश्य मनोरम
ज्ञानदीपाची तशी समई

ज्ञान वेचणे कणाकणाने
एकेक पाऊल क्रमाक्रमाने
अर्जन करूया अभय प्रज्ञा
स्वत्व गुणाला करू कल्हई

गुलमोहर: 

.....केव्हा....केव्हा.....केव्हा....

Submitted by पुरंदरे शशांक on 21 October, 2011 - 13:47

....केव्हा.....केव्हा... केव्हा...

आई मी अज्जून लहानंच का गं
ओट्यावर कप ठेवणार केव्हा...

फ्रॉक छोटासा किती दिवस हा..
ओढणीचा ड्रेस घालणार केव्हा...

बांगडी ही असली जाऊन एकदा
मस्त घड्याळ येणार केव्हा....

टॉक टॉक सँडल वाजवीत सही,
स्कूटीने भुर्रSSSS जाणार केव्हा....

कापतेस माझे केस सारखे
अश्शी हेअरस्टाईल करणार केव्हा....

खेळण्यातला फोन नुसता वाजतो
टचस्क्रीन भारी मिळणार केव्हा....

दूध, कॉम्प्लान नाहीतर कोको
कॉफी शिप शिप करणार केव्हा...

रुमाल नक्कोय हा फ्रॉकवरचा
छोटीशी पर्स देणार केव्हा...

"अग्गोबाई एवढं पुरे का...

गुलमोहर: 

अंगणात एकदा हत्ती आला

Submitted by पाषाणभेद on 21 October, 2011 - 12:05

अंगणात एकदा हत्ती आला

अंगणात एकदा हत्ती आला
पाठीवरती बस मला तो म्हणाला
ऐटीत बसलो पाठीवर त्याच्या
मग झाली माझी मज्जाच मज्जा

गल्लीतली मुले बघत राहीली खुप
सगळी दिसत होती ठेंगणी ठूस
ईकडून तिकडे फिर फिर फिरलो
इतका की कंटाळ्याने मी थकलो

तेव्हढ्यात काही माणसे आली
हत्तीला सर्कशीत घेवून गेली

- पाषाणभेद
१२/१०/२०११

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

पाऊस आला...

Submitted by पुरंदरे शशांक on 20 October, 2011 - 05:30

पाऊस आला...

धाड धाड धूम... धाड धाड धूम
पाऊस आला.....आभाळ भरुन...

लख लख लख.... वीज चकमक
आवाज मोठा....गुडूड..गुडूम..

थाड थाड थाड... गारा गारेगार
खाऊ या मस्त...कुडुम कुडुम..

टप टप टप...थेंब टपोरे
ओंजळीत घेऊ...भरुन भरुन..

पावसाचे पाणी...पावसात गाणी
नाचू खेळू...उड्या मारून..

चला चला सारे...घरात या रे
चहा आल्याचा...प्या ऊन ऊन..

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

कोडे......

Submitted by पुरंदरे शशांक on 19 October, 2011 - 06:34

कोडे......

"शी बाई आई, कसली ही अळी
अंगभर केस नि किती वळवळी"

"हा तर सुरवंट दिसतो जरी कुरुप..
होईल एक गंमत, बदलेल हा रुप.."

"रुप कसे बदलेल याचे गं आई ?
नकटे माझे नाक, कधी अस्से होईल का बाई..?"

"गंमत तर पुढे पाहशील खरी....
जेव्हा हा कोषात आपले घर करी...
अंगाभोवती विणेल हा कोष
करील आराम नि लांबलचक झोप...
झोपेतून हा बाहेर येईल जेव्हा
कित्ती गोड फुलपाखरु टाळ्या पिटशील तेव्हा.."

"काही ही सांगतेस लहान मी म्हणून..
असली घाण अळी येईल फुलपाखरु होऊन ...?"

"हो गं राणू माझी, अशीच होते गंमत
सुरवंटाचे रुप टाकून फुलपाखरु येई तरंगत...

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मी किनै आई....

Submitted by पुरंदरे शशांक on 19 October, 2011 - 05:38

मी किनै आई....

मी किनै आई.... होणारे ड्रायव्हर...
झूSSSम... गाडीतून जाऊ दूर दूरवर....

मी किनै आई... होणारे पायलट..
सुंSSSई... प्लेनमधून दोघेच जाऊ सटासट...

मी किनै आई.... होणारे डॉक्टर..
घाबरु नको काही, जेम्स देईन बाटलीभर....

मी किनै आई... होणारे टीचर..
फोरचेच टेबल विचारेन फारतर...

मी किनै आई.... होणारे शेफ...
पिझ्झा बर्गर काही नको पोहे, उपमा सेफ ?

मी किनै आई..... होणारे डान्सर....
ह्रतिक, ऐश, करीना कसले येतील स्टेजवर...

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

पावसाशी मस्ती.....

Submitted by पुरंदरे शशांक on 19 October, 2011 - 01:22

पावसाशी मस्ती.....

पावसाशी मस्ती धमाल नुस्ती
शाळेला बुट्टी.... हो.. हो.. हो

गार गार वारा पावसाच्या धारा
वेचा वेचा गारा...हो..हो..हो

गड गड गुडुम वाजतात ढग
वीजेची चकमक... हो..हो..हो

अंगणात तळे नद्या नि नाले
नाचू या सारे...हो..हो..हो

भिजू या छान हरपून भान
गाऊ या गान...हो..हो..हो

मित्रांची गर्दी आईची वर्दी
होईल सर्दी... हो..हो..हो

सर्दी अन् ताप कुणाची टाप
नाचा की राव...हो..हो..हो

पावसाचा संग मस्तीचा रंग
धडाड धिक धंग...हो..हो..हो

गुलमोहर: 

टॉक्डॉक् टॉक्डॉक् आला दौडत -

Submitted by विदेश on 14 October, 2011 - 14:16

टॉक्डॉक् टॉक्डॉक् आला दौडत
अबलख माझा घोडा -
आई बाबा आजी आजोबा
सरका रस्ता सोडा !

दोनच पायांच्या घोड्याची
घरभर भरभर घाई
पटपट झुरळे दूर पांगती
खुषीत येते आई !

हातांचा हा लगाम धरुनी
वेगाला मी आवरतो
ऐटित मागे पुढे डोलुनी
घर-मैदानी वावरतो !

घोडोबा मी घरी लाडका
खेळायाला पुढे पुढे -
शंभर टक्के परीक्षेत गुण
अभ्यासातहि सदा पुढे !

तबेल्यात बेजार हा घोडा
आठवड्यातले दिवस सहा -
चंगळ घोड्याची रविवारी
हैराण हे घरदार पहा !!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - बालकविता