गद्यलेखन
मायबोली रसग्रहण स्पर्धा - गावझुला - ले. श्याम पेठकर

गावझुला [दीर्घ ललितबंध]
लेखक : श्याम पेठकर
विजय प्रकाशन, नागपूर.
प्रथमावृत्ती १७-१०-२००९
किंमत :- २५० रुपये.
बर्ट्रांड रसेल वुइथ देशी फिलॉसॉफी
बर्ट्रांड रसेल वुइथ देशी फिलॉसॉफी
लेखकः बब्रुवान रुद्रकंठावार
प्रकाशकः जनशक्ती बुक्स अँड पब्लिशर्स प्रा. लि.
जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद.
प्रकाशनः १६ डिसें. २००७
रसग्रहण स्पर्धा- 'त्या वर्षी' लेखिका: शांता गोखले
त्या वर्षी
शांता गोखले
मौज प्रकाशन गृह
प्रथम आवृत्ती- ६ मार्च २००८
किंमत- एकशेपंचाहत्तर रुपये
शांता गोखलेंची ’रिटा वेलिणकर’ माझी आवडती कादंबरी. त्यानंतर १७ वर्षांनी त्यांनी लिहिलेली ही कादंबरी. दरम्यानच्या काळात त्यांचे कलासमिक्षणात्मक, बहुतांशी पत्रकारितेच्या अंगाने केलेले इंग्रजी लेखन आणि मोजक्या कथा सोडल्या तर काही वाचनात आले नव्हते.
तीन वर्षांपूर्वी मौजेची पुस्तकं ज्या शांतपणे, काहीही गाजावाजा न करता प्रसिद्ध होत असतात त्याच शांतपणे 'त्या वर्षी’ बाजारात आली. ना कुठे जाहिरात ना बोलबाला.
हॅरी पॉटर
हॅरी पॉटरवर बोलण्यासाठी हा धागा....
'स्पॉयलर अलर्ट' : ज्यांनी पुस्तके वाचली नाहियेत किंवा सगळे मूव्ही बघितले नाहियेत पण वाचायची किंवा बघायची इच्छा आहे आणि ज्यांना कोणतेही सस्पेन्स आधी कळायला नको आहेत त्यांच्यासाठी हा अलर्ट... वाचताना जरा जपुन वाचा.. कोणत्याही पोस्टला आता सस्पेन्स कळेल अशी अंधुकशीही शंका आली तर पुढे वाचु नका... ज्यांचे सगळी पुस्तके वाचुन झाली आहेत आणि मूव्हीज बघुन झाले आहेत अश्यांनी सगळ्या पोस्ट्स वाचायला हरकत नाही....
आटपाट नगरीतील जज आणि चुलबुल पांडे
आटपाट नगरीतील जज आणि चुलबुल पांडे
आटपाट नगरातील ही सत्यकहाणी.
गावातील कोर्टात एक जज मॅडम होत्या. त्यांचा नवरा गेल्यामुळे त्या एकट्याच होत्या. साधारण ४० एक वय असावं.
कोर्टाशेजारीच पोलिस स्टेशनची इमारत. तिथल्या चुलबुल पाम्डेवर त्यांचं मन फिदा झालं आणि त्या दोघानी लग्न केलं.
लग्न केलं आणि गोंधळ झाला. कारण चुलबुल आधी विवाहीत असून दोन मुलांचा बाप आहे. त्याचं म्हणणं, मी दोन्ही बायकाना व्यवस्थीत करीन.
आणखी एक तिढा. बाई मुसलमान, तर बुवा हिंदु. बाईनी हिंदु धर्मानुसार कुंकू बांगड्या वापरायला सुरुवात केली.
संस्कार १ - येतोच... आलोच...
अतिशय लगबगीने मी घर आवरत होते. आलेल्या माणसाला उगाच नस्ता पसारा दिसायला नको. सगळ्या घरात व्यक्ती फिरणार तर उगाच कुठली बाहेर पडलेली वस्तू दिसायला नको. पटपटा आवरून मग माझं आवरून तयार रहायचं होतं. सगळीकडचं जागच्याजागी करून अगदीच दिसत होती तिथली सगळी धूळ पुसून मी हुश्श केलं. घाईने अंघोळीला पळाले. सांगितल्या वेळेच्या १५ मिनिटं अगोदर माझ्यासकट माझं घर तीटपावडर लावून तयार होतं.
डॉ आयडा स्कडर या पुस्तकाविषयी..
डॉ आयडा स्कडर -(लेखिका - वीणा गवाणकर) एका उत्तुंग व्यक्तिमत्वाचा परिचय
प्रिय वीणाताई,
साधारणपणे ६ महिन्यापूर्वी आपले डॉ. आयडा स्कडर हे पुस्तक माझ्या हातात आले, आणि वाचल्यानंतर कार्व्हरनी जसं मनात घर केलं तसंच यांनी पण केलं. तुम्ही जर डॉ आयडा स्कडर यांच्याबद्दल लिहिलं नसतं तर या आभाळा एवढ्या व्यक्तिमत्वाची ओळखच झाली नसती.
डॉ आयडा स्कडर - जवळ जवळ ९० वर्षांचे दीर्घायुष्य लाभलेल्या एक सेवाव्रती डॉक्टर! ज्यांच्यामुळे सेवाव्रती या शब्दाला अर्थ लाभला.
ती आणि तो..
त्याचं नदीशी नातं खूप जुनं. म्हणजे अगदी रोज नाही, तरी नियमितपणे तो इथे नदीकिनारी येऊन तासनतास रेंगाळायचा. आपली सुख दु:ख हक्कानी या नदीशी बोलायचा. धीरगंभीरपणे नदी सगळं पहायची ऐकुन घ्यायची. कधी एखाद्या खळाळत्या लाटेनी कोपरखळी मारुन त्याला हसवायची देखील. नदीची आठवण त्याला छळायची. खूप दिवसात नाही यायला मिळालं किनार्यावर की बेचैन व्हायचा तो.
दगड - गद्य
एक होता दगड! जाता जाता एका पांडूने पान खाऊन टाकली पिंक त्यावर! दगड हिरमुसला. कारण त्याच्यावर लालसर डाग पडला. बाकीचे दगड हासले. पांडू रोजच यायचा जायचा. रोज पिंका! कारण पांडूचे घर जिथे होते तिथून बरोब्बर पान थुंकायला येईल अशा ठिकाणी हे चार पाच दगड होते. वर्षभरात त्या दगडांचा म्हसोबा झाला.
आज तिथे जत्रा भरते.
पंचक्रोशीतले दगड मिरवत येतात. बायकांच्या अंगात येतं! व्यवसाय निघतात. फुगे, साखरफुटाणे, फुलाच्या वेण्या, बिड्या इत्यादी! आता कुणाची टपरी कुठे हे ठरले आहे तरी जागेवरून भांडतात.