गद्यलेखन
रुमाली रहस्य - श्री. गो. नी. दाण्डेकर
श्रेष्ठ कादंबरीकार गो. नी. दाण्डेकर यांनी लिहिलेली एकमेव रहस्यकथा, किंवा कादंबरिका म्हणजे 'रुमाली रहस्य'. बालवयात गोनीदांवर नाथमाधव आणि ह. ना. आपट्यांच्या कथा-कादंबर्यांचा विलक्षण प्रभाव होता. 'ह. ना आपट्यांची कळस ही रहस्यकथा वाचूनच आपणही पुढे रहस्य प्रांतात शिरलो', असं गोनीदा म्हणाले होते.
'रुमाली रहस्य'चं कथानक अठराव्या शतकातल्या पुण्यात घडतं. मराठेशाही, नाना फडणवीस - घाशीराम कोतवाल - रामशास्त्री प्रभुणे यांच्या परिसर आणि सामाजिक - राजकीय पर्यावरणात घडणारी ही कादंबरिका गेली पंचेचाळीस वर्षे उपलब्धच नव्हती. मृण्मयी प्रकाशनाने ती नुकतीच पुनर्मुद्रित केली आहे.
सण दसरा दिवाळी, येती आमच्या घरी : भाग १
मायबोली परिवाराला दिवाळीच्या शुभेच्छा !!!
भाग १ : दसरा
सण दसरा दिवाळी, येती आमच्या घरी : भाग २
मैत्र जीवाचे - श्री. विदुर महाजन
माणूस एकटा येतो, आणि एकटाच जातो, हे काही खरं नाही. जाताना तो अनेकांचं सुख, झोप असं बरंच काही घेऊन जातो. अरुणा ढेर्यांच्या त्या कवितेतल्यासारखं.
नवी गाडी
गेल्या महिन्यात आम्ही नवी गाडी घेतली. ह्या आधी आम्ही वापरत असलेली गाडी, सध्याची अर्थव्यवस्था, दोघेही investment banking मधे असल्याने आमच्या धोक्यात आलेल्या नोकर्या, पदरी एक मूल (अरेरे किती ते रंजले, गांजले) आणि गाडीचा काळा रंग अशा पार्श्वभुमीवर घरातील, बाहेरील मंडळींच्या आलेल्या प्रतिक्रीया.
आम्ही नुकतेच गाडी घेउन घरी आलो होतो. शनिवारी डील करण्यात बराच वेळ गेला म्हणून गाडी घरी आणायला सोमवार उजाडला. येईतो रात्रीचे आठ वाजून गेले होते. मी घाई-घाई इशानच्या जेवणाचे बघतच होते तर फोन वाजला. भारतातुन मोठ्या बहिणीचा होता.
मी, "हाय, मी आज फोन करणारच होते. काय म्हणतेस ?"
मंडळ - भाग ५ (अंतीम)
नेहमीसारखीच संथ पावलं टाकत तो मंडळाकडे निघाला. घनघोर युद्धात पराभूत झालेल्या नगरातल्या रस्त्यांवर उत्तररात्री पसरते तशा शापित आणि उदास छायेचा अंमल दाटल्यासारखा त्याला भासला. उत्तररात्र, जी सरताच उजाडणारी पहाट पहिल्या किरणांबरोबर घेऊन येईल रणांगणावर अचेत पडलेल्या आपल्या प्रियजनांच्या नाशाच्या अप्रिय वार्ता आणि पाठोपाठ येतील क्रूर नियतीच्या असंख्य वारांनी जागोजागी छिललेली त्यांची निष्प्राण कलेवरं. त्याला वाटले, ही आजची रात्रही तशीच आहे, अपेशी, भयाण. अशा वेळी मूक रूदन करण्यापलिकडे कुठलीही अवस्था मनाला प्राप्त होणे शक्य नाही. थरथरत्या काळजाचा टवका ऊडून आत्ताच काहीतरी निसटून दृष्टीआड झालंय.
तू...!
तू... तू आणि मी. आपलं तसं खरं तर काहीही नातं नाही. कारण मुळात तू आहेस हेच मी मानत नाही. पण, सभोवतालचे असंख्य जण जेव्हा तुझा दाखला देत राहतात, तेव्हा तुझं, आभासी का होईना, पण एक अस्तित्त्व तयार होत जातंच. या तुझ्या, भले आभासी का होईना, अस्तित्त्वानं आता इतकं घेरून टाकलं आहे की हे एक नातंही आपसूक तयार झालं आहे. आभासीच. पण नाकारता न येण्याजोगं...
इंस्टंट माहेर
गेल्या आठवड्यात अचानकच हार्टफर्डला भावाकडे जायचा योग आला. माझा अमेरिकेतला सर्वात जवळचा- अंतराने आणि मनाने- नातेवाईक. त्याने लग्नानंतर यंदा प्रथमच गणपती बसवला आहे. माझ्या वहिनीने अगदी दगडुशेठचे चित्र समोर ठेऊन घरी मूर्ती बनवली आहे. त्यांच्या गणपतीचे दर्शन घ्यायचेच होते. शिवाय माझा किडक्या दातांच्या बाईबरोबर सकाळी-सकाळी interview होता. मग आम्ही सगळेच आदल्या दिवशी हार्टफर्डला गेलो. संध्याकाळी निघतो म्हणेतो आठ वाजले निघायला. ९५ ची डागडुजी काढलीये, रात्रीचं काम सुरु होतं त्यामूळे दोन-तीन वेळा रहदारीत अडकलो. पोचायला बराच उशीर झाला. भावाला आणि वहिनीला जेऊन घ्या सांगितले होते.
मंडळ - भाग ४
लहान मुलांच्या स्पर्धा संपून आवराआवरी झाली आणि रोजच्यासारखाच सगळा ग्रूप मंडळात गप्पा मारत बसला. माणिक, अजय, रेणुका आणि विकी अजूनही सत्यनारायणाची अणि कालच्या गाण्यांच्या मैफिलीचीच चर्चा करत होते.
अजय म्हणाला, दोनदा बोलावणं पाठवूनही साठे आजोबा प्रसादाला आले नाहीत, शेवटी साठे आजींकडेच मी त्यांचा प्रसाद बांधून दिला.
विकी म्हणाला, शैलेशला पूजेला बसवण्याचा डाव त्यांच्या ध्यानात तर आला असेल ना?
माणिक म्हणाला, काही सांगता येत नाही, तब्येत बरी नाही म्हणून निरोप पाठवला होता त्यांनी, उद्या सकाळी ऑफिसला जाताना भेटून येईन मी.
Pages
