गद्यलेखन

MH 12 AQ 6699

Submitted by बेफ़िकीर on 9 November, 2014 - 06:58

(सत्यकथा)

दैवाकडे सगळ्याची उत्तरे असतात. दैव ती काळानुसार देत असते इतकेच!

सुमारे २००१-०२ ची घटना आहे ही! मोबाईल फोन्सचा सुळसुळाट झालेला नव्हता. मी घरून काम करायचो. सकाळी सव्वा नऊ वाजता घरातला फोन खणखणला. त्यावेळी घरच्या लँडलाईनवर येणारे ९९ टक्के फोनकॉल्स माझ्यासाठी असल्याने मी उचलला आणि हॅलो म्हणायच्या आधीच कानावर आवाज पडला.

"कटॅकॅर?"

माझ्या आडनावाची अनेक भ्रष्ट रुपे आजवर ऐकत आलो आहे. हे रूप देणारा माणूस होता व्ही व्ही सत्यनारायणा! कोकाकोला अमीनपूर (हैदराबाद) चा स्टोअर इन चार्ज! कस्टमरकडील ऑपरेशनल लेव्हलपैकी दोन नंबरचा महत्वाचा माणूस!

"येस सर?"

"टँकर भेजेगा?"

शब्दखुणा: 

एक अपमृत्यू ..

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 9 November, 2014 - 05:39

तो टाकीत उतरला
टाकी साफ करायला
विशीचा तरुण पोरगा
क्षणात मरून गेला

कुणी म्हणती शॉक लागला
कुणी म्हणती गुदमरला
तर्क वितर्क गूढ करत
अर्थ कुणी काय लावला

दाढी कोवळी केस कुरळी
डोळे आत खोल ओढली
थोडी उघडी पुतळ्या थिजली
मुद्रा उदास करून गेली

होता मृत्यू त्याचा जाहीर
बाप उभा सुन्न कातळ झाला
आवळून मग पोट घट्ट आपले
मटकन असा खाली बसला

श्वास त्याचा छातीत अडकला
जणू की अंतर चिरत गेला
कसा बसा अन बाहेर पडत
एक विदीर्ण हंबरडा झाला

कुठे कुठे मरण लपते
असे कुणा का घेवून जाते
या अपघाती प्रश्नाचे
कुणाकडेच उत्तर नव्हते

विक्रांत प्रभाकर

अ-वास्तव

Submitted by बेफ़िकीर on 8 November, 2014 - 03:42

"यूअर पिझ्झा मॅम"

"ओह यॅ! इतका वेळ का लागला?"

"अ‍ॅक्चुअली......जरा धडक झाली"

"कोणाची? तुमची?"

"हो"

"मग? लागलंय का?"

"हो, म्हणजे विशेष नाही"

"पाणी वगैरे हवंय का?"

"नाही नको"

"अरे बापरे......अहो रक्त येतंय गुडघ्याजवळ"

"नाही ठीक आहे, आता संपलीच आहे ड्युटी"

"म्हणजे खाली पडला होतात का?"

"हो......पण..पार्सल नाही पडलं..ते सेफ होतं मागच्या बॉक्समध्ये.."

"नाही नाही..ते ठीक आहे..पण इतकं रक्त आलंय तर..दुसर्‍याला पाठवायला सांगायचंत ना?"

"तुमचे..फोन येत होते सारखे..आणि आधीच लेट झालो होतो.."

"हो पण..थांबा जरा..मी बँडेड देते"

"नाही असूदेत......निघतो"

शब्दखुणा: 

स्त्रीभृणहत्या - जबाबदार कोण? (पुन्हा इथे टाइप केलेले. लिंक नव्हे.)

Submitted by स्वीटर टॉकर on 7 November, 2014 - 12:43

स्त्रीभृणहत्या - जबाबदार कोण?

अय्या, हा कसला बावळट प्रश्न? उत्तर सरळ आहे. पति, कधी कधी पत्नी, त्यांच्यावर दबाव आणणारे सासू सासरे आणि याचा फायदा उठवणारे डॉक्टर !

मात्र ‘उत्तर’ आणि ‘समाधान’ यात फरक असतो. राजकीय पुढार्‍यांकडे आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं. समाधान मात्र नसतं. कारण समाधान होण्यासाठी खोलात जावं लागतं. वरवरचा विचार पुरत नाही. या हत्येत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सामील होणार्‍यांवर घणाचे घाव घातले पाहिजेत यात शंकाच नाही. त्याचबरोबर अशी परिस्थिती येणारच नाही यासाठी पावलं उचलली पाहिजेत.

आशीर्वचन - वृक्षराजाचे !!

Submitted by पुरंदरे शशांक on 7 November, 2014 - 04:05

आशीर्वचन - वृक्षराजाचे !!

खाली दोन वेगवेगळ्या लेखकांचे लिखाण उद्धृत केले आहे.

१] अ हर्मिट इन द हिमालयाज - लेखक मि. पॉल ब्रंटन - / मराठी अनुवाद - हिमालय नि एक तपस्वी - अनुवादक - श्री. गणेश नी. पुरंदरे - पान क्र. २१६ -२१९

मी अनुभवलेली प्रार्थना...

Submitted by फूल on 6 November, 2014 - 17:26

आईबाबांनी सांगितलंय म्हणून, अळम-टळम करत, पुढे-मागे हालत, मधले मधले शब्द सहजि गाळत, जेव्हढ्या लवकर संपेल तेव्हढ्या लवकर किंबहुना आटपत म्हटलेल्या अनेक प्रार्थनांपैकी एक म्हणजे प.पू. कलावती देवींनी लिहिलेली बालोपासना! "बाळगोपाळांस सूचना" इथपासून जे धावायला सुरूवात व्हायची ते अगदी शेवटचं "गोपालकृष्ण महाराज की जय"... इथेच पूर्ण श्वास घ्यायचा... संपली एकदाची...

माझे कॉफी डूआयडी

Submitted by दाद on 5 November, 2014 - 21:54

ऑस्ट्रेलियात, इथल्यांसारखं बोलायचं झालं तर भारी तोंड वेंगाडावं लागतं.
हॅय म्यॅयट... म्हणजे हाय मेट... (mate).
सॅन्ड्येय... मॅन्डॅय.. सॅट्टॅड्यॅय...
पॅरामाटा... स्पेलिंग आहे - parramatta.. अगदी डब्बल र आणि डब्बल ट जड जाईल पण म्हणून .. पॅय्मॅटॅ? असं बोबड्यात काय म्हणून शिरायचं? मी म्हटलेलं त्यांना पॅरमिटर पासून परमात्मा पर्यंत काहीही ऐकू येतं.
नको तिकडे शब्दं तोडतात ते एक... चांगलं घसघशीत 'सेन्ट लिओनार्डस' म्हणावं तर्खडकरीत तर नाही... सॅन्टलिनर्डस... मला बाजूचा नकाशा घेऊन ’इथे इथे नाच रे मोरा’ करीत ते स्टेशन दाखवावं लागलं होतं तिकिट खिडकीतल्या म्यॅयटला.

अंदाज-हवा-मानाचा

Submitted by bnlele on 5 November, 2014 - 00:17

नुकतेच आंध्र-ओरिसा तटावर एका चक्रवर्ति वादळानी भयंकर थैमान घातल.
जागतिक-राष्ट्रीय स्तरावर शास्त्रज्ञांनी पूर्वानुमान केल आणि हानिवर बचाव-नियंत्रण
शक्य तेव्हढे कराण्याचे खांबीर प्रयत्न झाले. राक्षसि थरार चित्रवाणिवर दिसला.
पावसा बरोबर मदतीचा पूर आला पण तो अपुराच ठरला- केंद्र आणि राज्यसरकार
एकजूट पण आधाशी,संधिसाधु व्यापारी बेछूट ! कमाईची पर्वणी - जीवनावश्यक- दूध,पाणी
अन्न कमि म्हणून वारेमाप महाग ! पिळवणुकीच चित्र हादरा देणार पाहून मन व्यथित.
पुनर्वसनाचे उपाय केवळ शासकीय यंत्रणेनीच करायचे असा सोइस्कर गैरसमज करून बाकी मोकळे!

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन