काव्यलेखन

पाऊसवेळ

Submitted by अमेलिया on 31 July, 2012 - 05:53

असा येतोसच मग तू अचानक
झडझडत, सरसरत
आवरून धरणं स्वतःला फार काळ
तुलाही नाहीच जमत

तुझा आवेग मग बरसत राहतो
झाडा-पानांवर, रस्त्या-वाटांवर
सगळं, सगळं उधळून देतोस
उदार होतोस थेंबा-थेंबावर

अनावर, अविचल, अखंड...
बोलतोस न बोलता तसंही
पक्कं गारुड मनावर तुझं
कळतं थोडंसं... कळतही नाही

सैरभैर वाराही रमतो
खेळतो तुझा झिम्मड खेळ
घुमतो, झेपावतो उभा-आडवा
साजरी करतो पाऊसवेळ

अशा वेळी माझ्या मनात
मौन बोलकं होतं...
भिजत राहते मी तुझ्यात
सैल... निःशब्द...शांत !

शब्दखुणा: 

मालकांना सोसवेना रात्रपाळी

Submitted by कौतुक शिरोडकर on 31 July, 2012 - 02:53

(मूळ गझल ज्यांची आहे त्यांनी मनावर घेऊ नये. या विडंबनाचा कोणत्याही हजर व्हा ब्लॉक आयडीशी कोणताही संबंध नाही. कोणी ओढून ताणून लावल्यास त्याला तोच जबाबदार. कुणाला यात भर घालायची असेल तर सुस्वागतम. कृपया, यातले शेर आवडले नाही म्हणून ते बदलून देऊ नयेत. आम्हाला आमच्या काव्यप्रतिभेचा फाजिल अभिमान आहे.)

आयडींनो जा निजा, अन या सकाळी...
मालकांना सोसवेना रात्रपाळी !

सोबतीने अ‍ॅडमिन घेवून जा ना...
आयड्यू छळतात जे तीन्ही-त्रिकाळी !

सौम्यश्या देवू कशा शिव्या तयाना
पातळी त्यांची असे जर शीवराळी ?

भांडण्यामध्येच सारा बाफ वाही
रोज पण त्याच्यातही दिसते नव्हाळी

'थांबला तो संपला' नसते असेही..

बीचवर जाऊ या नं...

Submitted by पुरंदरे शशांक on 31 July, 2012 - 01:57

बीचवर जाऊ या नं वाळूमधे खेळायला
मज्जा येते कस्ली आई पाण्यातून चालायला

किल्ला करु वाळूमध्ये नाहीतर चिमणीचे घरटे
चला बास चा पाढा तुझा, लाऊ नको तू मधे मधे

इतकी छान नक्षी आई वाळूत या काढतं कोण
पुसून टाकते लाट तरी पुन्हा येते कुठून वर

शंख-शिंपले जमवणार मी छान छान अन् मोठाल्ले
नेताना हे म्हणू नकोस तू, बस इथेच मी घरी चाल्ले

छान छोटे घर बांधू इथेच या वाळूवर
अभ्यास, खेळ, खाणे सगळे इथेच मस्त बीचवर.........

शब्दखुणा: 

हाताची घडी म्हणे, तोंडावर बोट !

Submitted by सुचेता जोशी on 30 July, 2012 - 14:02

हाताची घडी म्हणे,
तोंडावर बोट !
डोळ्यांनी बोलण्याची
घेतोच की सूट !

डब्यात हवीय म्हणे
भाजी न पोळी !
खिशात आजी ठेवे
लिमलेटची गोळी !

रोज-रोज, तोच-तोच
शाळेचा ड्रेस..
रिबीनीत आवळले
कुरळे-कुरळे केस !

पायातल्या बुटांचे
चमचमते पॉलिश,
नव्या-नव्या शब्दांच
नाही कळत इंग्लिश !

'छ्डी लागे छम-छम,
विदया येइ घम-घम'
पाढे पाठ होता-होता
नाकी येइ दम-दम !

सांग सांग देवा
मी कधी होइन मोठी?
शाळेमधुन असल्या माझी
कधी होइल सुट्टी?

वेगळे असणे मुळीचच वेगळे नसते

Submitted by बेफ़िकीर on 30 July, 2012 - 09:51

वेगळे असणे मुळीचच वेगळे नसते
बद्धतेपासून काही मोकळे नसते

माणसे देवाप्रमाणे वाटली असती
फक्त दोघांच्यामधे जर सोवळे नसते

ओल आल्यासारखे आकाश यंदाचे
अन्यथा हे पापण्यांचे सोहळे नसते

आजही डुंबायला येतो तुझ्याकाठी
पण तुझ्या डोळ्यांत पूर्वीचे तळे नसते

आणले नाहीस ना वार्‍या तिला येथे
मग नको आणूस आता कळवळे नसते

-'बेफिकीर'!

घुम्मड घुम्मड..

Submitted by प्राजु on 30 July, 2012 - 09:35

झुकती माडे, झुलत्या तारा
बेभान वारा, हुम्मण हुम्मण

विजेची रेघ, नभाची पाटी
मेघांची दाटी, झुंबड झुंबड

गळती कौले, पन्हाळ सडे
होडीही बुडे, अल्लड अल्लड

पाऊस प्राण, तहान शमे
घुमट घुमे, घुम्मड घुम्मड

डोंगर कडे, नाचरी दरी
झेलीत सरी, झिम्मड झिम्मड

ओढाळ झरा, खळाळ भारी
डोंगर पारी, हुल्लड हुल्ल्ड

पाऊल माझे, पाण्यात नाचे
अंगणी वाजे, घुंगूर घुंगूर

पाऊस माझा, साजण होई
थेंबांचे देही, गोंदण गोंदण

देऊनी मला, ओलेती मिठी
ओलेत्या ओठी, चुंबन चुंबन

-प्राजु

मन माझे विस्कट्ते हल्ली

Submitted by वैवकु on 30 July, 2012 - 07:30

काहीबाही घडते हल्ली
मन माझे विस्कट्ते हल्ली

मी लवकर गेल्यावरसुद्धा
ती माझ्यावर रुसते हल्ली

मी ओळख दाखवतो तेंव्हा
दुनिया परकी दिसते हल्ली

माझी आनंदाची इच्छा
दुःखांसाठी झुरते हल्ली

किती टाळतो "विठ्ठल्" म्हणते
मला जीभही छळते हल्ली

श्रावण साजण....

Submitted by पुरंदरे शशांक on 30 July, 2012 - 02:20

रेशीम सरींना
गुंफतो उन्हात
श्रावण साजण
येतो गं भरात

कोवळ्या थेंबांना
सांभाळून घेत
पान पान डुले
नाजुक तालात

जाई जुई पानी
शुभ्रशी कनात
मंद मंद गंध
झुलवी मनात

शोभली सवाष्ण
गर्द हिरव्यात
नथ चमकते
मोत्यांची उन्हात

सणांचा श्रावण
झुलतो झुल्यात
गहिरी मेंदीही
खुलते हातात

कान्हाही भुलला
राधेच्या दर्शना
यमुना कल्लोळी
भेटवी चरणा

रसीला श्रावण
रंगीला साजण
धणी ती न पुरे
करीता वर्णन..

शब्दखुणा: 

आई

Submitted by प्राची दिनेश कर्वे on 30 July, 2012 - 01:53

आई आई आई
दोन अक्षर एक शब्द
व्यापून टाकी अवघे विश्व

आई शब्दात प्रेम आहे
मायेचा उत्कट झरा आहे
रणरणत्या उन्हातील सावली आहे
थंडीतील उबही आहे

आई म्हणजे हिरकणी आहे
वात्स्यल्याची मूर्ती आहे
जिथे उणे तिथे ती आहे

आई सतत देतच असते
घेण्याचे तिला भानच नसते

दुखण्यावर फुंकर तीच घालते
सुखातही साथ तीच देते

आईपण मोठे असते
त्यासाठी आईच व्हावे लागते

आला आला पाऊस आला

Submitted by पुरंदरे शशांक on 29 July, 2012 - 23:35

आला आला पाऊस आला गातो थेंबांचे गाणे
मनात माझ्या नाचत येते खमंग कणसाचे गाणे

गडगड गडगड मेघ गरजती सळसळसळ पाऊस गाणे
अंगणात या वेचायाला बर्फाचे गंमतदाणे

चिंब भिजूनी ओले होता आईचे किती ओरडणे
चहा आल्याचा मजेत घेता जराजरासे फुर्फुरणे

झाडे, पाने, फुले न्हाऊनी डोलतात किती गंमतीने
मीही गातो, उड्या मारतो, गोल गोलसे भिर्भिरणे......

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन