मन माझे विस्कट्ते हल्ली

Submitted by वैवकु on 30 July, 2012 - 07:30

काहीबाही घडते हल्ली
मन माझे विस्कट्ते हल्ली

मी लवकर गेल्यावरसुद्धा
ती माझ्यावर रुसते हल्ली

मी ओळख दाखवतो तेंव्हा
दुनिया परकी दिसते हल्ली

माझी आनंदाची इच्छा
दुःखांसाठी झुरते हल्ली

किती टाळतो "विठ्ठल्" म्हणते
मला जीभही छळते हल्ली

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काहीबाही घडते हल्ली
मन माझे विस्कट्ते हल्ली

मी लवकर गेल्यावरसुद्धा
ती माझ्यावर रुसते हल्ली

मी ओळख दाखवतो तेंव्हा
दुनिया परकी दिसते हल्ली

माझी आनंदाची इच्छा
दुःखांसाठी झुरते हल्ली

वावा... हे सगळेच आवडले.

सहज...सुंदर!

व्वा...
सोपी सहज पण तितकीच सुंदर गझल..
जवळ जवळ सगळेच शेर आवडले..
शेरांमधली सहजता जास्त भावली..

मी ओळख दाखवतो तेंव्हा
दुनिया परकी दिसते हल्ली..
क्या बात है..
मी लवकर गेल्यावरसुद्धा
ती माझ्यावर रुसते हल्ली..
हा ही आवडला..
शुभेच्छा..

किती टाळतो "विठ्ठल"म्हणते
मला जीभही छळते हल्ली

वैभवजी , हा शेर - झालासे कळस .
काहीबाही घडते हल्ली
मन माझे विस्कट्ते हल्ली

मी लवकर गेल्यावरसुद्धा
ती माझ्यावर रुसते हल्ली

मी ओळख दाखवतो तेंव्हा
दुनिया परकी दिसते हल्ली

माझी आनंदाची इच्छा
दुःखांसाठी झुरते हल्ली

वा वा . एकाहून एक शेर सुंदर .

वैभवजी , मायबोलीवर झालेल्या नवीन बादलानुसार गझल कशी टाकावी कळत नाही . प्लीज सांगाल ?<<<

मलाही सांगा वैवकु

पामराची थट्टा करता होय.??

अहो मला माहीत असते तर परवापासून एखादीतरी गझल पाडली नसती का मी??

देवसराना विचारा....त्यान्नी २ /३ वोरीजनल अन ३/४ तरह्या पाडल्यत तिकडे