काव्यलेखन

मानसीचा चित्रकार तो ... (एक विडंबन)

Submitted by हर्षल वैद्य on 22 November, 2012 - 04:31

मानसीचा चित्रकार तो मानसीचे चित्र काढतो

मानसीने त्याला दिधला जो मागितला तो मोबदला
चित्र स्वतःचे काढविण्याला
दो पैशाला कला आपुली, कला आपुली विकतो

कृष्ण वर्ण अन् लठ्ठ असे ती, नाकही बसके दातही पुढती
अशी मानसी चंद्रमुखी ती
लठ्ठ पगाराच्या आशेने आत्मघात पत्करतो

याद करुनी आद्य गुरुला, काण्या राजाच्या चित्राला
रंग जमवुनी आणि कुंचला
पैशासाठी चिता कलेची, चिता कलेची रचतो

चित्र काढतो ...............

पाहिलेस तू करून जे तुला करायचे!

Submitted by सतीश देवपूरकर on 22 November, 2012 - 02:45

गझल
पाहिलेस तू करून जे तुला करायचे!
जीवना! अजून काय राहिले घडायचे?

पाज वीषही खुशाल, मी तयार प्यायला!
एवढेच जाणतो...मला अरे जगायचे!!

निर्झरामुळेच हे कळावयास लागले.....
गात यायचे तसेच गात गात जायचे!

सारखी परिस्थिती, कधीच राहणार ना;
घे शिकून की, कसे हळूहळू रुळायचे!

वृक्ष राहतो बिजात, तू तसा तुझ्यामधे!
विस्मरू नकोस तू, तुला इथे रुजायचे!!

जास्त पात्रतेहुनी, मला दिलेस ईश्वरा!
तूच सांग हे मला, पुढे कसे निभायचे?

खेळ खेळल्यासमान जिंदगी जगायची!
जीत व्हायची कधी, कधी तरी हरायचे!!

-------प्रा.सतीश देवपूरकर

पाहिलेस तू करून जे तुला करायचे!

Submitted by सतीश देवपूरकर on 22 November, 2012 - 02:45

गझल
पाहिलेस तू करून जे तुला करायचे!
जीवना! अजून काय राहिले घडायचे?

पाज वीषही खुशाल, मी तयार प्यायला!
एवढेच जाणतो...मला अरे जगायचे!!

निर्झरामुळेच हे कळावयास लागले.....
गात यायचे तसेच गात गात जायचे!

सारखी परिस्थिती, कधीच राहणार ना;
घे शिकून की, कसे हळूहळू रुळायचे!

वृक्ष राहतो बिजात, तू तसा तुझ्यामधे!
विस्मरू नकोस तू, तुला इथे रुजायचे!!

जास्त पात्रतेहुनी, मला दिलेस ईश्वरा!
तूच सांग हे मला, पुढे कसे निभायचे?

खेळ खेळल्यासमान जिंदगी जगायची!
जीत व्हायची कधी, कधी तरी हरायचे!!

-------प्रा.सतीश देवपूरकर

ये ना ये ना ये ना...

Submitted by मुग्धमानसी on 22 November, 2012 - 01:38

दिवस संपला रोजसारखा सांज उगवली पुन्हा
नकळत पाऊल कापु लागले घरचा रस्ता जुना
वाट तीच, तीच मीही अन् त्याच रोजच्या खुणा
तरिही काही नवथर माझ्या मनात हलते पुन्हा...

तु मागुन पुन्हा येउन मजला हात धरुन थांबव ना
मन आतुन आतुन पुकारते रे ये ना ये ना ये ना...

मी रोज पहाटे उठते सारी कर्तव्ये उरकते
बडबडते, गुणगुणते काही, हसते अन् हसवते
रमते मी माणसांत सगळ्या सर्वांशी बोलते
पण संध्याकाळी अशी एकटी मीच मला सापडते
मन पुन्हा हटुन बसते म्हणते तुझियापाशी ने ना
मन आतुन आतुन पुकारते रे ये ना ये ना ये ना...

गुलमोहराचा लाल बहर अन् फांदीमागिल चंद्र
पहिला पाऊस गंध मातीचा हुळहुळणारा धुंद

शब्दखुणा: 

जॉगिंगचा अड्डा

Submitted by मिरिंडा on 22 November, 2012 - 00:28

आजकाल जॉगिंगच्या अड्ड्यावर
योगिच योगी दिसतात
मोठमोठे आवाज काढून
ते प्राणायाम करतात..........................धृ.

काही तर पोट हालवून
"अह्म ब्रह्म" म्हणतात
ओमकाराच्या नावाने ते
मुल्लासारखी बांग देतात

काही डोळे मिटून
ध्यान करीत बसतात
आकाशाला गवसणी घालण्याचा
प्रयत्न ते करतात

काही 'सुकट' म्हातारे
हाफ चड्ड्या घालतात
शीर्षासनात हळूच ते
कपल कडे बघतात

कधी एखाद जमाव येतो
राक्षसासारखा हासतो
हसणारे ते सारे शहाणे
आत मात्र रडत असतात

काही असेच शिष्ट येतात
कपल जवळ थांबतात
समाजस्वास्थ्य बिघडू नये
म्हणून पोलिसांना बोलावतात

पोलिस येईपर्यंत ते
जिभल्या चाटित पाहतात

हळवी कातरवेळ

Submitted by मुग्धमानसी on 22 November, 2012 - 00:11

यमुनेकाठी रोज उतरतो कृष्ण वाजवीत पावा...
यमुनेच्या धारेला छेडीत राधा घेते धावा..

श्रीरंगाला रंग अर्पूनी होई डोह सावळा
राधेचे प्रतिबिंब तयातून, मूर्तिमंत सोहळा

कृष्णाची बासरी आळवी 'राधा... राधा...' गीत
राधेच्या श्वासातून घुमते 'कृष्ण... कृष्ण..' संगीत

कुष्ण धावतो रेतीवरती, उमटतात पाऊले
राधा पळते सृष्टीवरती सांडत चांदणफुले

उष्ण श्वास अन् अधीर डोळे त्यात राधेचे बिंब
कृष्णाच्या डोळ्यात थेंब अन् तिकडे राधा चिंब

अवघ्या सृष्टिवरी पसरते मंतरलेली कळा
चंद्र जणू हो गोरी राधा गगन मुरारी निळा

कातरवेळी रोजच राधा होई अशी बावरी
नेत्र सावळे, सृष्टि सावळी, सोनेरी बासरी

शब्दखुणा: 

पराधीन

Submitted by अज्ञात on 22 November, 2012 - 00:04

चौकोनी मावेल कसे
मज सांग पिंजले असे पिसे
अवशेष विखुरल्या लाटांचे
वाटे झेलावे अलगदसे

भंगल्या तनूचे अणुरेणू
शोधिती हरवले जसे हसे
पंखात नितळ दंव सोनेरी
स्पर्शात भाव अस्पर्श असे

मोट बांधली मेघाची
पण पराधीन घरचे वासे
अंदाज न सुटल्या धाग्यांचे
क्षण जवळ न येती जराहिसे

.....................अज्ञात

भिजवून ठेव ना मूगडाळ

Submitted by rmd on 21 November, 2012 - 15:12

(मूळ कविता - भिजवून ठेव अवघी सकाळ - http://www.maayboli.com/node/39273
(बेफिकीर यांची माफी मागून हा एक उस्फूर्त विडंबनाचा प्रयत्न :))

भिजवून ठेव अवघी सकाळ

Submitted by बेफ़िकीर on 21 November, 2012 - 14:18

भिजवून ठेव अवघी सकाळ
मन आशयासमवेत तू
खळबळ करून छंदास पाळ
गंगेस ओत मदिरेत तू
मिसळत दुपार पाणी विटाळ
जे भोगशी दुनियेत तू
ओतून दे संध्येस गाळ
उधळून दे संकेत तू
सांगत मनास 'तिमिरात वाळ'
गंगेस शोध मदिरेत तू
अंधार मान सिगरेट...... जाळ
जाळत तुझी तब्येत तू
हा अन्यथा संपेल काळ
मानत जणू की प्रेत तू
हो 'बेफिकिर' चिंतेस टाळ
मन लख्ख धू कवितेत तू

-'बेफिकीर'!

''ओलसर''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 21 November, 2012 - 05:09

शमवू बघती चटक्याचे आघात खोलवर झालेले
डोळ्यांमधल्या दंवात भिजुनी शब्द ओलसर झालेले

लोकतंत्र ? की विडंबना? लोकांसाठी ,लोकांकडुनी
तेच निवडले मंत्री जे बदनाम गावभर झालेले

कुपोषीत्,दुष्काळग्रस्त्,अन्यायग्रस्त गपगार असे
ओरडती नेते ज्यांचे जेवून पोटभर झालेले

हात ठेवला काय तयाने खांद्यावरती प्रेमाने
विस्मरलो त्यांच्याकडुनी अन्याय आजवर झालेले

भडकावे ''कैलास'' लागले विना आग दुनियेमध्ये
सहन जगाचे वार-टोमणे करु कोठवर झालेले?

--डॉ.कैलास गायकवाड

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन