''ओलसर''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 21 November, 2012 - 05:09

शमवू बघती चटक्याचे आघात खोलवर झालेले
डोळ्यांमधल्या दंवात भिजुनी शब्द ओलसर झालेले

लोकतंत्र ? की विडंबना? लोकांसाठी ,लोकांकडुनी
तेच निवडले मंत्री जे बदनाम गावभर झालेले

कुपोषीत्,दुष्काळग्रस्त्,अन्यायग्रस्त गपगार असे
ओरडती नेते ज्यांचे जेवून पोटभर झालेले

हात ठेवला काय तयाने खांद्यावरती प्रेमाने
विस्मरलो त्यांच्याकडुनी अन्याय आजवर झालेले

भडकावे ''कैलास'' लागले विना आग दुनियेमध्ये
सहन जगाचे वार-टोमणे करु कोठवर झालेले?

--डॉ.कैलास गायकवाड

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शमवू बघती चटक्याचे आघात खोलवर झालेले
डोळ्यांमधल्या दंवात भिजुनी शब्द ओलसर झालेले<<< व्वा

हात ठेवला काय तयाने खांद्यावरती प्रेमाने
विस्मरलो त्यांच्याकडुनी अन्याय आजवर झालेले<<< व्वा व्वा, सुरेख

भडकावे ''कैलास'' लागले विना आग दुनियेमध्ये
सहन जगाचे वार-टोमणे करु कोठवर झालेले?<<< छान

======================================

लोकतंत्र ? की विडंबना? लोकांसाठी ,लोकांकडुनी
तेच निवडले मंत्री जे बदनाम गावभर झालेले

कुपोषीत्,दुष्काळग्रस्त्,अन्यायग्रस्त गपगार असे
ओरडती नेते ज्यांचे जेवून पोटभर झालेले<<< हे शेरही स्वतंत्रपणे आवडले.

गझल आवडली.

धन्यवाद.

मतला आणि आजवर हे शेर फार आवडले.

हा मतला आपल्या आजवरच्या सर्व गझलांच्या मतल्यांमध्ये सर्वोत्कृष्ट वाटला मला.

धन्यवाद!

हात ठेवला काय तयाने खांद्यावरती प्रेमाने
विस्मरलो त्यांच्याकडुनी अन्याय आजवर झालेले << व्वा ! >>

मतला सुंदर

गझल सुंदर

आवडली Happy

हात ठेवला काय तयाने खांद्यावरती प्रेमाने
विस्मरलो त्यांच्याकडुनी अन्याय आजवर झालेले>>> वाह! डॉक, मस्त गज़ल Happy

आजवर ह्या शेरात एक किरकोळ टायपो झाला असावा

पहिल्या ओळीत 'तयाने' ठेवायचे असल्यास दुसर्‍या ओळीत 'त्याच्याकडुनी' असे करावे लागेल किंवा पहिल्या ओळीतच 'तयांनी' असे.

सहज सांगीतले गैरसमज नसावा.

आता चौथ्या वाचनात एका शेरात थोडासाच बदल सहजच करावासा वटतो आहे .....

कुपोषीत,दुष्काळग्रस्त,अन्यायग्रस्त गपगार अम्ही
ओरडती नेते ज्यांचे जेवून पोटभर झालेले

असे हा शब्द भरीचा नक्कीच नव्हता पण आम्ही (सूट= अम्ही) असे केल्याने जरा जास्त उठावदार/परिणामकारक वाटत आहे .
बहुधा शायर अम्ही असे म्हणत आहे त्यामुळे आपबीतीचा शेर म्हणून जास्त आतवर फील देत असावा हा बदल

माझ्या वैयक्तिक वाचनापुरता असा बदल करून पहिला .तुम्हाला कसा वटतो आहे हे विचारायला म्हणून प्रतिसाद देतो आहे अगदी आपला सहजच ....कोणतीही सूचना /विनन्ती /आग्रह नाही बरका डॉ.साहेब!! Happy

कळावे , आपलाच ;
-वैवकु

धन्यवाद मित्र हो..

विजयजी सहमत आहे.

वैभवशेठ, मी''गपगार पडे'',असं लिहीणार होतो... असो.

पुनश्च धन्यवाद.

शमवू बघती चटक्याचे आघात खोलवर झालेले
डोळ्यांमधल्या दंवात भिजुनी शब्द ओलसर झालेले

हात ठेवला काय तयाने खांद्यावरती प्रेमाने
विस्मरलो त्यांच्याकडुनी अन्याय आजवर झालेले

वरील दोन्ही शेर फार आवडले.
दोन्हीत एक अदृश्य धागा जाणवला.

समीर

गझल आवडली .

विशेष्तः हा शेर

भडकावे ''कैलास'' लागले विना आग दुनियेमध्ये
सहन जगाचे वार-टोमणे करु कोठवर झालेले?

मूर्खा केलीस चुक तू, भोग त्या कर्माची फळे |
उलटुन बोलत नसतात, स्वता: चुका केलेले ||

केलेस नाहीस उपकार, खरी लायकी हीच तुझी |
परताव्याचा हक्क माझा, कीती खर्च मी केलेले ||

नाही मिळाली संधी तुला, खरे दु:ख हे तुझे |
बाहेर रहावे लागल्याने, तुझे मन जळले ||

मूर्खा केलीस चुक तू, भोग त्या कर्माची फळे |
उलटुन बोलत नसतात, स्वता: चुका केलेले ||

केलेस नाहीस उपकार, खरी लायकी हीच तुझी |
परताव्याचा हक्क माझा, कीती खर्च मी केलेले ||

??

ओहो... Happy

शमवू बघती चटक्याचे आघात खोलवर झालेले
डोळ्यांमधल्या दंवात भिजुनी शब्द ओलसर झालेले
जबरदस्त मतला..

हात ठेवला काय तयाने खांद्यावरती प्रेमाने
विस्मरलो त्यांच्याकडुनी अन्याय आजवर झालेले
क्या बात है...

सुरेख गझल..
शुभेच्छा.