पाहिलेस तू करून जे तुला करायचे!

Submitted by सतीश देवपूरकर on 22 November, 2012 - 02:45

गझल
पाहिलेस तू करून जे तुला करायचे!
जीवना! अजून काय राहिले घडायचे?

पाज वीषही खुशाल, मी तयार प्यायला!
एवढेच जाणतो...मला अरे जगायचे!!

निर्झरामुळेच हे कळावयास लागले.....
गात यायचे तसेच गात गात जायचे!

सारखी परिस्थिती, कधीच राहणार ना;
घे शिकून की, कसे हळूहळू रुळायचे!

वृक्ष राहतो बिजात, तू तसा तुझ्यामधे!
विस्मरू नकोस तू, तुला इथे रुजायचे!!

जास्त पात्रतेहुनी, मला दिलेस ईश्वरा!
तूच सांग हे मला, पुढे कसे निभायचे?

खेळ खेळल्यासमान जिंदगी जगायची!
जीत व्हायची कधी, कधी तरी हरायचे!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गझल उघडा

तिथे 'संपादन' असा टॅब क्लीक करा

पानाच्या शेवटी 'इतक्यात प्रकाशन नको' असा पर्याय निवडा

गझल तुम्हाला दिसेल पण इतरांना दिसणार नाही

---------------------

इतर शेरांत खटकायचे म्हणजे आपल्या लौकीकाला/कारकिर्दीला साजेसे(दर्जात्मकदृष्ट्या) नाहीत असे मला वाटते (आता तू कोण? असे मला विचाराल तर त्याचे उत्तर नाही... मी मला सापडलो की सांगेन सावकाश!)

'इतक्यात प्रकाशन नको' <<< हा सल्ला याच गझलेसाठी आहे ना?

आता तू कोण? असे मला विचाराल तर त्याचे उत्तर नाही..<<<

Biggrin

पाहिलेस तू करून जे तुला करायचे!
जीवना! अजून काय राहिले घडायचे?

खेळ खेळल्यासमान जिंदगी जगायची!
जीत व्हायची कधी, कधी तरी हरायचे!!

<<

शेर आवडले.

हा सल्ला याच गझलेसाठी आहे ना? Biggrin

मी ह्याच गझलेसाठी दिलाय आता त्यांना हॉरीझोंटल डिप्लॉयमेंट करायची असल्यास माझे काही म्हणणे नाही Wink

धन्यवाद विजयराव! दिलेल्या सल्ल्याबद्दल.
निखळ कवितेचा/गझलेचा/शेरांचा (कवी/गझलकार निरपेक्ष) दर्जा पहावा या मताचे आम्ही तरी आहोत!
आम्ही स्वत:स पोचलेले/परिपक्व/ गंभीर शायर/समीक्षक वगैरे काय ते अजून तरी समजत नाही.
लौकिक वगैरे तर दूरची बाब आहे!
आम्ही गझल लेखन अजून शिकतच आहोत.
कोणतीही गझल ही पूर्ण झाली असे आम्ही कधीच मानत नाही (आमच्या बाबतीत म्हणतोय.)
गझल हा काव्यप्रकारच मुळी ओपन एन्डेड आहे असे आम्ही तरी मानतो.
आपला या गझलेपुरता सल्ला भावला.
आपला असाच लोभ असू द्या!
...........प्रा.सतीश देवपूरकर

पाज वीषही खुशाल, मी तयार प्यायला!
एवढेच जाणतो...मला अरे जगायचे!!

यातील अरे या शब्दावर आम्ही विचारमग्न झालो आहोत. हा शब्द भरीचा नसेलही की काय असा आम्हास संशय आहे.

कवी विजय,

गझलेत तंत्र व आशयात अचूकता आणणे हे प्रथम प्राधान्य आहे. शेर संप्रेषित होणे सर्वात महत्वाचे! तसेच गझलेत भरीच्या शब्दांना जागा नाही. कवी सतीश यांच्याशी कधी तुमची चर्चा झाली तर हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवा.

याचे कारण हे आहे अभ्यासक के गो, की एकच माणूस सांगूनसुद्धा परत परत भरीचे शब्द घेत राहील ही बाब अविश्वसनीय वाटते.

भूषणराव प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
मायबोलीवरील आतापर्यंतच्या आमच्या वावरातून ब-याच ख-या व भ्रामक व्यक्तींना/शायरांना त्यांच्या अभिरुची व सौंदर्य/काव्यबोधासकट आम्ही ओळखू लागलो आहोत.
सबब आपण/तू कोण असे आम्ही कसे विचारू?
इतकी पातळी सोडणे आमच्या स्वभावात नाही!
प्रा.सतीश देवपूरकर
अवांतर....छोट्या वृत्तातील आमची गझल पाहिलीत का?
असेच बंधनात राहू दे!
मला तुझ्या ऋणात राहू दे!!
.............प्रा.सतीश देवपूरकर

गं. स.;
भरीचा /बहारीचा/ भरीव/पोकळ/ भरतीचा/ओहोटीचा वगैरे शब्द असे लेबल शेरातील शब्दांना लावणे हे सापेक्ष आहे.
शेरातील विचारांच्या सौंदर्यालाच आम्ही तरी प्राथमिक महत्व देतो.
अशी व्यक्तीसापेक्षता जर नसती, तर सगळ्यांचीच अभिव्यक्ती ही एकसारखी झाली असती!
शेवटी प्रत्येकाची अभिव्यक्ती/शैली ही त्याच्या त्याच्या पिंडानुसार वेगळी असते.
आपण मानसिक स्तरावर कसे जगतो, आपले साहित्यिक पोषण/कुपोषण किती झाले आहे, आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन, आपली शब्दसंपत्ती/श्रीमंती, आपल्या चिंतनाची खोली/गुणवत्ता , आपली सबूरी, आपली रसिकता अशा किती तरी बाबी आहेत ज्यावर आपली शैली, आपली अभिव्यक्ती अवलंबून असते.
शेवटी समग्र शेराचा अर्थ/मतितार्थ हा महत्वाचा, त्यात मूळत: काव्य असायला हवे असे आम्हास वाटते!
भरतीचे/ओहोटीचे शब्द हे सर्व गौण आहे, शेराच्या अंतरंगापुढे.
शेवटी शब्द हे फक्त गझलकाराचे साधन आहे!
...........प्रा.सतीश देवपूरकर

शेवटी समग्र शेराचा अर्थ/मतितार्थ हा महत्वाचा,

हा शब्द मतितार्थ नसून मथितार्थ असा आहे कवी सतीश. थंड डोक्याने आमचे म्हणणे ध्यानात घेतलेत तर वर लिहीत राहिलात तितके लिहावे लागणार नाही याची हमी देतो आम्ही तुम्हास.

आज मराठी गझलकारांमध्ये 'रिसेप्टिव्हनेस' जाणवत नाही ही आणखी एक चिंतेची बाब आहे.

गं.स.
इतके लिहायचा आम्हासही सोस नाही व वेळही नाही!
आमच्यामागे असणारी कामे ( बौद्धीक) व जबाबदा-या आम्ही काय सांगू गं.स.?
कसा बसा वेळ काढून आम्ही आमचा छंदिष्टपणा जोपासतो, इतकेच!
अवांतर: एखादा कामयाब शेर का कामयाब आहे, त्यात नेमके कोणते सौंदर्य आहे, त्याला अर्थांचे किती पदर आहेत? त्यात किती व्यामिश्रता आहे हे उलगडून दाखविणे ही सोपी बाब नव्हे, हे आम्ही जाणतो.
शेर वाचून वा ऐकून नुसतेच क्या बात है, म्हणणे वेगळे व तो शेर शिकविणे, विस्तारपूर्वक उलगडून दाखविणे वेगळे!
कामयाब शेराची हीच तर खासियत असते, की त्याची शारिरीक लांबी छोटी असली तरी, त्याची खोली ही बरीच असते. कारण सर्वच गोष्टी या शब्दात, चिमटीत पकडणे शक्य नसते, कारण शायरास सांगायचा असतो आशय तो खरे तर शब्दांच्या पलीकडील, स्वर्गीय व दिव्य असा असतो, जे तो तोकड्या शब्दांच्या सहायाने अभिव्यक्त करीत असतो. म्हणूनच कामयाब शेरातील प्रत्येक शब्दास महत्व असते.
म्हणूनच एखाद्या कामयाब शेरावर पानेच्या पाने लिहिलीत तरी तो शेर पूर्णपणे गवसला, वश झाला असे होत नाही!