भिजवून ठेव ना मूगडाळ

Submitted by rmd on 21 November, 2012 - 15:12

(मूळ कविता - भिजवून ठेव अवघी सकाळ - http://www.maayboli.com/node/39273
(बेफिकीर यांची माफी मागून हा एक उस्फूर्त विडंबनाचा प्रयत्न :))

भिजवून ठेव ना मूगडाळ
दे घालुनी खिचडीत तू
बनवू नकोस ती आगजाळ
ठेवत कमी तिखटास तू
गाळू नकोस बघुनीच लाळ
कढी सोबतीस देशील तू
जेवायचीही वेळ पाळ
फुकटच उशीर करशील तू
माझ्यावरी आणशी किटाळ
मज हावरट म्हणतेस तू
पण हादडतेस तूही फराळ
जेवण शिवाय करतेस तू
मज बोलतेस तिन्हीत्रिकाळ
अन् त्रासही देतेस तू
तरी आवडतेस मज सर्वकाळ
माझीच फक्त आहेस तू!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा. मला हसू नाही आले, पण आवडले विडंबन रमड देवी

मज बोलतेस तिन्हीत्रिकाळ
अन् त्रासही देतेस तू
तरी आवडतेस मज सर्वकाळ
माझीच फक्त आहेस तू!

<<<

मस्त

मूळ रचनाच कोणी पाहात नाही. Sad Proud

छान

लै म्हज्जे लैच भारी Rofl

मूळ रचनाच कोणी पाहात नाही>>> अहो बेफि, मुळ रचना वाचल्या बिगर विडंबनाची मजा कशी येनार?? ती बी वाचलीच की.... हां आता तिथे काही प्रतिसाद नाही दिला कारण आमची ती लायकी नाही हो .... आम्ही तिथे फक्त वाचन मात्र Happy

मुळ रचना वाचली. पण जड जड वाटली. हे मस्तय. कसं हलकं फुलकं Proud

अवांतर : <<<<< मूळ रचनाच कोणी पाहात नाही.>>>>>>> बेफी तुमचं प्रत्येक लिखाण वाचलं जातं ओ. (मी वाचते. पण त्यातलं कळतं किती म्हणजे गझला, जडशीळ कविता वैगेरे ते नका विचारु.) पण प्रत्येक वेळी प्रतिसाद देतेच असं नाही.

Lol मस्तच!!

मज बोलतेस तिन्हीत्रिकाळ
अन् त्रासही देतेस तू
तरी आवडतेस मज सर्वकाळ
माझीच फक्त आहेस तू!>> हे नक्की कोणाला उद्देशून आहे? मूगडाळीला की कॉय? Proud

Happy

छान