Submitted by सतीश देवपूरकर on 22 November, 2012 - 02:45
गझल
पाहिलेस तू करून जे तुला करायचे!
जीवना! अजून काय राहिले घडायचे?
पाज वीषही खुशाल, मी तयार प्यायला!
एवढेच जाणतो...मला अरे जगायचे!!
निर्झरामुळेच हे कळावयास लागले.....
गात यायचे तसेच गात गात जायचे!
सारखी परिस्थिती, कधीच राहणार ना;
घे शिकून की, कसे हळूहळू रुळायचे!
वृक्ष राहतो बिजात, तू तसा तुझ्यामधे!
विस्मरू नकोस तू, तुला इथे रुजायचे!!
जास्त पात्रतेहुनी, मला दिलेस ईश्वरा!
तूच सांग हे मला, पुढे कसे निभायचे?
खेळ खेळल्यासमान जिंदगी जगायची!
जीत व्हायची कधी, कधी तरी हरायचे!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गझल वाचली अनेक ओळी
गझल वाचली
अनेक ओळी आवडल्या
हल्ली असे होते आहे ..किमान अनेक ओळीतरी नक्कीच आवडतात मला तुमच्या गझलेतल्या
(पूर्वी एखाद-दुसरा शेर काय्तो अर्धामुर्धा आवडायचा ) लवकरच मला तुमची अख्खी गझल आवडू लागेल अशी आशा मला वाटते आहे ...बघूया काय होते ते!!!!
असो