आठवण

Submitted by निवडुंग on 13 May, 2011 - 04:24

"एक प्रॉमिस करशील?"
"प्रॉमिस? आज काय हे अचानक?"
"सांग ना रे प्लीज.. करशील प्रॉमिस?"
"ह्मम्म्म.. तुला माहिती आहे ना, मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो.."
"माहितीये रे राजा मला, आणि म्हणूनच आज मला प्रॉमिस हवंय तुझ्याकडून.."
"अगं पण आधी सांगशील तरी नक्की काय ते.."
"आधी प्रॉमिस.."
"ओके बाबा.. प्रॉमिस.."

"ह्मम्म्म.. इथून पुढे तू कधीच माझी आठवण काढायची नाहीस.. "
"....."
"....."
"तुला कळतंय का काय मागतेयस तू? आठवण कोणी काढत नसतं, ती आपोआप येत असते आतून.."
"ह्मम्म्म.. म्हणून मग एकदा आली की परत कधीच येऊ द्यायची नाही दिवसभरात.. "
"...."
"आणि कायम लक्षात ठेव, तू प्रॉमिस केलं आहेस.. "
"...."

हं.. आता मरण्याशिवाय दुसरा पर्याय तरी उरला कुठे?
दूर शून्यात नजर लावत तो स्वत:शीच पुटपुटला..

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

!!!!!!

..!

छान.