पावती

Submitted by मंदार-जोशी on 14 September, 2011 - 05:11

तुझ्या फोटोंसारखीच
तुझी सगळी पत्र केव्हाच
फाडून, तुकडे करुन
फेकून दिली

तू माझ्यासाठी घेतलेल्या
पर्फ्युमची पावती मात्र
जीवापाड जपली आहे
त्या पावतीवर
इतरांना दिसते
ती किंमत, दुकानाचं नाव
इतकंच काय
खरेदीची वेळही नोंदवलेली

तुझी सगळी पत्रं
केव्हाच
इतिहासात जमा झाली आहेत
पण मी आजही
ती पावती 'वाचतो'
तुझ्या पत्रांसारखी

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
जालरंग प्रकाशनाच्या दिवाळी अंकात आणि ब्लॉगवर पूर्वप्रकाशित
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आंद्या, ती पावती ही सुद्धा प्रेमाची एक निशाणीच आहे. त्यामुळे कवितेतला "तो" ती पावती पत्र असल्यासारखी वाचतो असा अर्थ अभिप्रेत आहे. Happy

मुळात सगळ्या आठवणी पुसायला पत्रं आणि फोटो फाडलेस.... तर मग "तीच पावती" का ठेवलीस याचं सबळ कारण कुठेच दिसत नाहिये..... Sad अर्धवट वाटतेय......!!!

बाकी नजरेत येऊ शकणारा "पुरावा" नष्ट करायची कल्पना भारी आहे...!!! Rofl Biggrin Proud

मंडळी, पुढच्या गटगला आधी याचं "पाकीट" तपासायला हवं....!!! एखादी पावती सापडेल..... कदाचित..!!! Wink

मस्त कविता. अर्थ समजावल्याबद्दल धन्यवाद मालक,
भुन्गेश धन्स रे बाबा. Happy

टोके......

अगं पावती असली की त्याच्या मागच्या भावना सांगितल्याशिवाय कोणालाच कळणार नाहीत..... फोटो पत्रं ठेऊ शकत नव्हता तो....... "हे माझं आणि कवीचं वैयक्तिक पण कधी नव्हे ते जुळणारं मत" Wink Biggrin

मंदार..... हो की नै रे...!!!! Rofl Lol

.

भुंग्या Lol

छान आहे, पण परफ्युम्ची पावती.... नाही समजले.... परफ्युमच ठेवायचा न...संपला तरी... रिकामी बॉटल ठेवायची जपुन :स्मित:......... (प्रेमासाठी वाट्टेल ते)

स्मिता Rofl

हर्शल, पावती खास असल्याने त्यावरची प्रत्येक गोष्ट ही पत्रातल्या शब्दांसारखीच वाटते. असा अर्थ अभिप्रेत आहे.
आंद्या आणि तुझ्याशी काही प्रमाणात सहमत.

मंदार : हो, फक्त त्या इंटेंसिटीने तो अर्थ पोचत नाहीये म्हणून, बाकी काही नाही. नाहीतर मग त्या पावतीविषयी किंवा प्रसंगाविषयी जर अजून आलं असतं तर... आणि तुम्हाला ते काहीच अवघड नव्हतं. कदाचित छोटी कविता लिहिण्याच्या ओघात ते राहून गेलं असंही वाटतंय. चूभूदेघे Happy

>>हो, फक्त त्या इंटेंसिटीने तो अर्थ पोचत नाहीये म्हणून,

हो हर्शल. सहमत आहे Happy आधी कविता यापेक्षा मोठी होती. पण शब्दबंबाळ होण्याचा धोका वाटला म्हणून काटछाट केली. त्यात दुर्दैवाने कदाचित ती इंटेंसिटी कमी झाली असं दिसतंय.

कुछ खास जम्या नही. संदर्भासहीत स्पष्टीकरण द्यावे लागतेय म्हणजे.....
त्यातही याच्यासाठी घेतलेल्या पर्फ्युमची पावती याच्याकडेच कशी दिली (का मागून घेतली) हाही प्रश्नच. भलतीच व्यवहारी दिसतेय 'ती'. पुलेशु.

अतिशय सुंदर, संयत, गलबलवून टाकणारी युगप्रवर्तक कविता, अभिनंदन मंदार, यापुढेही आपल्या लेखणीतून असेच सुंदर व थेट भिडणारे काव्य वाचायला मिळेल अशी आशा करून हे दोन शब्द संपवतो

-'बेफिकीर'!

ती पावती ही सुद्धा प्रेमाची एक निशाणीच आहे. त्यामुळे कवितेतला "तो" ती पावती पत्र असल्यासारखी वाचतो असा अर्थ अभिप्रेत आहे.>>>>>>>>>>>
फोटु-पत्र फाडुन पावती का वाचायला ठेवलीये? कळलं नाही.

(अवांतर : पावती सकट गिफ्ट?नंतर हिशेब करायला बरं नै का? Uhoh )

काय रे काय हे?? Uhoh

लोक प्रेमाचा हिशोब मांडत बसलेत. Uhoh Wink

मंद्या, मला पण पावती दाखव रे! Happy

बाकी, हा प्रतिसाद म्हणजे ही कविता आवडल्याची "पावती" समजा बरं का! Happy

फोटो, पत्र फाडण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा तिने पर्फ्युमची पावती दाखवून पैसे घेतले की हो. मग पावती परत परत वाचायला लागणारच. काय करता?
फोटो गेले , पर्फ्युम गेलं हाती आली पावती

नन्ना, तुमने मेरे मुह की बात छिन ली...
१. जे तिने दिलंय, ते फाडून फेकायचं आणि जे तिने नाही दिलंय ते सांभाळून ठेवायचं, का का का?
२. गिफ्ट कधी कोणी पावतीसकट देत नाही, मग ही पावती शोधून काढून सांभाळून ठेवलीस का?

प्रश्न! प्रश्न!! प्रश्न !!! Lol

Lol भरत

Pages