Submitted by वर्षा_म on 25 January, 2011 - 01:46
आठवण झरा आनंदाचा
दु:खी मनास आधार
बंद नयनी पहाता
घाली जखमेवर फुंकर
आठवण ठेवा अमुल्य
देता उजाळा लख्ख
नाही कुणाची संपत्ती
राहीला माझाच हक्क
आठवण सडा प्राजक्ताचा
दरवळतो अंतरी गंध
अलगद गुंफते माला
जडला मलाच छंद
आठवण प्रवाही सरीता
आणते लोचनी ओल
आनंदाचे असता अश्रु
त्याला मोत्याचे मोल
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
सुंदर कविता !
सुंदर कविता !
<<आठवण झरा आनंदाचा दु:खी मनास
<<आठवण झरा आनंदाचा
दु:खी मनास आधार
बंद नयनी पहाता
घाली जखमेवर फुंकर<<
ए, छानच गं! अगदी समर्पक!
मस्त !
मस्त !
"नाही कुणाची संपत्ती राहीला
"नाही कुणाची संपत्ती
राहीला माझाच हक्क"
....छान
... हे खरं आहे की
आठवणींच्या संपत्तीवर दुसर्या कुणाचाच हक्क नसतो
आवडेश!! विडंबना व्यतिरीक्त
आवडेश!!
विडंबना व्यतिरीक्त लिहायला लागलात हे आवडले
धन्यवाद विजय
धन्यवाद
विजय
सुरेख गं
सुरेख गं
छान आहे कविता.
छान आहे कविता.
वर्षे, सुंदर जमलिये कविता
वर्षे, सुंदर जमलिये कविता
धन्स लोकहो
धन्स लोकहो
एकदम झक्कास कविता..... अंगावर
एकदम झक्कास कविता.....
अंगावर कसे शहारे येतात,
जुन्या आठवणी सजवताना.
खरी कसरत तेव्हाच होते,
डोळ्यातील आश्रु लपवताना.
------------------------------------------------०००
आठवण एक प्रवाह आहे,
हवे तसे वळवता येते.
दु:खद आठवणीसह रडता रडता,
सुखद आठवणीसह हासता येते.
------------------------------------------------००० धनेष
आठवणीने कधी कधी गुदगुल्या
आठवणीने कधी कधी गुदगुल्या होतात
अगदी एकटाच हसतो
यावरही १ कडवे टाक
४ झाले ५ वे टाक (राग नको)
तशी कविता सुंदर आहे बर
>>>>आठवण सडा
>>>>आठवण सडा प्राजक्ताचा
दरवळतो अंतरी गंध
अलगद गुंफते माला
जडला मलाच छंद<<<<<<< मस्तच ग. छान लिहीलेयस.
छान.
छान.
मस्त मस्त मस्त
मस्त मस्त मस्त
धन्यवाद लोकहो धनेष मस्तच
धन्यवाद लोकहो


धनेष मस्तच तुझी कविता
मुकु
विडंबनाचा भर ओसरत चाललाय
विडंबनाचा भर ओसरत चाललाय तसतसे हळवे शब्द जास्त उत्कटतेने उमटायला लागलेत. पण बेस्ट ऑफ वर्षा अजून बरेच बाकी आहे.
विडंबनातून बाहेर आलीस काय ?
विडंबनातून बाहेर आलीस काय ? पण ते सोडू नकोस हं.
आठवण प्रवाही सरीता आणते लोचनी
आठवण प्रवाही सरीता
आणते लोचनी ओल
आनंदाचे असता अश्रु
त्याला मोत्याचे मोल
वा! सुंदर कविता. आठवणींची वेगवेगळ्या रुपं खूप आवडली.
उमेश , रुणु , क्रांतीताई
उमेश , रुणु , क्रांतीताई धन्यवाद
आठवण सडा प्राजक्ताचा दरवळतो
आठवण सडा प्राजक्ताचा
दरवळतो अंतरी गंध
अलगद गुंफते माला
जडला मलाच छंद
छान, वर्षा.
धन्यवाद अलका
धन्यवाद अलका
छान!
छान!