Submitted by मिलन टोपकर on 21 November, 2011 - 06:13
पुन्हा, पुन्हा ही तुझी आठवण
अपरिहार्य ही तुझी आठवण
आताशा मी जगतो ज्यावर
श्वास म्हणू, की तुझी आठवण ...?
---------------------
हट्टी असते तुझी आठवण
कधी शहाणी तुझी आठवण
डोळ्यामध्ये कधी थबकते
कधी बरसते तुझी आठवण ...!
-----------------------
सलते काटे तुझी आठवण
मोरपिसांची तुझी आठवण
तु केलेल्या जखमांवरती
हळवी फुंकर तुझी आठवण ...!
----------------------
दिवसा रात्री तुझी आठवण
कुठे, कशीही तुझी आठवण
सावरतो मी कसाबसा, पण
कशी आवरू तुझी आठवण ...?
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
पुन्हा, पुन्हा ही तुझी
पुन्हा, पुन्हा ही तुझी आठवण
अपरिहार्य ही तुझी आठवण
आताशा मी जगतो ज्यावर
श्वास म्हणू, की तुझी आठवण ...?>>>...
पुन्हा, पुन्हा तुझी आठवण
अपरिहार्य तुझी आठवण
आतासा मी जगतो ज्यावर
श्वास म्हणू, की तुझी आठवण ...?हि ची गरज आहे का?
छान आहे,वकिल साहेब.