मायबोली गणेशोत्सव २०२०

हस्तकला स्पर्धा - शिवणकाम(मास्क) - Sonalisl

Submitted by sonalisl on 5 September, 2020 - 17:07

कुर्त्याच्या बाह्या ज्या वापरल्या गेल्या नाहीत पण कापड चांगले आहे म्हणून टाकूनही द्याव्याशा वाटल्या नाहीत. अशाच बाह्यांचे कापड वापरून मी मास्क हातशिलाईने शिवला आहे.

विषय: 

लेखनस्पर्धा -- माझा अनुभव - कोविड-१९ लॉकडाऊन -- सीमंतिनी

Submitted by Barcelona on 2 September, 2020 - 17:33

चित्रकला स्पर्धा- गणपती चित्र - Mihira - गट ब

Submitted by Mihira on 31 August, 2020 - 11:47

शाळेनंतर खूप वर्षांनंतर गणेशोत्सवानिमित्त कलर पेन्सिल्स वापरुन बाप्पाचं चित्र काढायचा केलेला एक प्रयत्न :-
प्रेरणास्थान - माझा मुलगा Happy
IMG_7132.jpg

श्रीगणेश चित्रकला स्पर्धा- - - जाई.

Submitted by जाई. on 29 August, 2020 - 10:42

||श्री गणेशाय नम: ||

ब गट - मोठयांसाठी

जलरंगातील श्रीगणेशाचे चित्र

IMG_20200829_200157-01.jpeg

फोटो रेफरन्स : पेंट विथ डेव्हिड ट्युटोरियल

लेखनस्पर्धा -- माझा अनुभव - कोविड-१९ लॉकडाऊन -- कविन

Submitted by कविन on 29 August, 2020 - 06:18

"You-Know-Who"

सध्या त्याने थैमान घातलय
सध्या त्याने होम अरेस्टवर पाठवलय

बातम्या म्हणू नका
सोशल मिडीया म्हणू नका
त्याने सगळच हायजॅक केलय

तो म्हणजे तोच हो तो, you know who! right?

हे असं त्याच्याबद्दल लिहून काढलं त्यालाही महिना दिड महिना होऊन गेलाय आता. आधी तो तसा दूर म्हणजे परदेशगमनाची हिस्टरी असलेल्यांशी सलगी दाखवून होता. नंतर हळूहळू हात पाय पसरत माझ्या गावातही येऊन पोहोचला. अमुक ईमारत सील, तमुक भाग सील अशा बातम्या ऐकता ऐकता खरोखर आमच्या भागात याची डोळा अशी परिस्थिती बघितली आणि जवळ म्हणजे किती जवळ आलाय हा याची जाणीव झाली.

बुकमार्क स्पर्धा:ब गट

Submitted by वृषाली on 28 August, 2020 - 18:14

साहित्य: उरलेले कागद्,दोरा, मणी
बुद्धिदेवता गणपतींच्या उत्सवात पुस्तकांचा बूकमार्क योग्य वाटला म्हणून तो बनवला Happy
bookmark.jpg

विषय: 

पाककृती- फास्ट फूड स्पर्धा- "चिलीगार्लिक नुडल्स" - प्रांजल - जयु

Submitted by जयु on 28 August, 2020 - 08:50

गट- अ गट
पाल्याचे नाव - प्रांजल
वय- १३
मायबोली आयडी- जयु

लाकडाउन मधे लेकीने स्वयंस्फूर्तीने कुकींग शिकले. तुनळीवर videoबघून ती पदार्थ बनवते. पहिल्याच प्रयोगात 'पनीर टिक्का' अप्रतिम बनवल्यावर आत्मविश्वास खूपच वाढला आहे. आता ती पदार्थ बनवताना मला स्वयंपाकघरात प्रवेश बंद असतो(मी खूप सूचना देते म्हणून..). गणेश उत्सवात स्पर्धा पाहिल्यावर सर्वात आधी फास्ट फूड स्पर्धेत भाग घ्यायचाच सांगितले. संयोजकांनी परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद.

बुकमार्क स्पर्धा - सोनू. - ब गट

Submitted by सोनू. on 28 August, 2020 - 01:11

लहान मुलांना पुस्तकं वाचावीशी वाटण्यासाठी पुस्तकं छान रंगीत संगीत असतात. त्यांना अजून मजेशीर करण्यासाठी छानछान बुकमार्क वापरता येतील. घरात ठेवल्या जाणाऱ्या पुस्तकांसाठी हे 3D बुकमार्क छान दिसतात. बॅगेत घेऊन जायला तितकेसे जमणे कठीण.

विषय: 

"बुकमार्क स्पर्धा- प्रांजल-{जयु}"

Submitted by जयु on 27 August, 2020 - 12:31

गट- गट
पाल्याचे नाव - प्रांजल
वय- १३
मायबोली आयडी- जयु

क्राफ्ट पेपर वापरुन , ओरिगामीने तयार केलेले बुकमार्क.

IMG_20200827_213929.jpgIMG_20200827_213902.jpg

श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - रश्मिनतेज

Submitted by रश्मिनतेज on 27 August, 2020 - 08:17

|| गणपती बाप्पा मोरया ||

नाव - रश्मिनतेज
गट - ब
माबो आय डी - रश्मिनतेज

माझ्या आजोबांचं आराध्य दैवत असणाऱ्या वेरूळच्या श्री लक्षविनायकाचा स्कंदपुराणात असलेला उल्लेख :
दर चतुर्थीला औरंगाबाद ते वेरूळ चालत ह्या गणरायाच्या दर्शनाला ते जात.. आज अचानक आठवण झाली !
बाप्पाच्या चरणी हा छोटासा प्रयत्न ..

photo6215378501712849439.jpg

विषय: 
Subscribe to RSS - मायबोली गणेशोत्सव २०२०