मास्क
मास्कमुक्त महाराष्ट्र ! कोरोनाचे सारे निर्बंध हटवले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पूर्ण मंत्रीमंडळाने गुढी पाडव्यापासून अर्थात २ एप्रिलपासून महाराष्ट्रातील सर्व निर्बंध उठवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांना वाटत असेल मास्क लावावा, त्यांनी तो लावावा. ज्यांना वाटत असेल मास्क लावू नये, त्यांनी लावू नये. आता कोणतंही बंधन राज्यात राहिलेलं नाही
https://www.loksatta.com/maharashtra/corona-restrictions-removed-complet...
सोपा D I Y मास्क. शिवणकाम नसलेला.
टाकाउतून उपयोगी, मास्कपट्टी.
( D I Y . बिनशिवणकामाचा)
रुमालाची किंवा त्या मापाच्या ( १८ इंच) कोणत्याही कापडाची त्रिकोणी घडी करून नाकातोंडावर बांधली की सोपा मास्क तयार होतो. शिवणकाम नको काही नको.
पण एक अडचण आहे म्हणजे नाकाच्या बाजूने पोकळ जागा राहते. रुमाल घट्ट बांधला तर नाक चेपते. तरीही थोडी हवा जातेच. चष्मा असल्यास काचांवर वाफ धरते.
त्यासाठी एक प्लास्टिकचा तुकडा बनवला. तो कोणत्याही रुमालाएवढ्या कापडात बांधून मास्क तयार होतो. फोटोत तो वरती ठेवलेला दाखवला आहे पण आत घडीमध्ये ठेवून नाकावर येईल असा धरून रुमाल बांधायचा.
हस्तकला स्पर्धा - शिवणकाम(मास्क) - Sonalisl
कुर्त्याच्या बाह्या ज्या वापरल्या गेल्या नाहीत पण कापड चांगले आहे म्हणून टाकूनही द्याव्याशा वाटल्या नाहीत. अशाच बाह्यांचे कापड वापरून मी मास्क हातशिलाईने शिवला आहे.
हस्तकला स्पर्धा - {शिवणकाम} - बाप्पांसाठी मास्क
मास्क म्हणलं की आधी ते चित्रपटातले आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही म्हणणारे हिरव्या मास्कवाले डॉक्टर आठवतात. मास्क मध्ये पण बरेच प्रकार आले. मॅचिंग मास्क, कपल मास्क, फेस प्रिंट मास्क इ.
दोन दिवसांपूर्वी एक व्हिडिओ बघितला ज्यात एक छोटी मुलगी बाप्पांची मूर्ती घेऊन लपून बसते. आई विचारते तेव्हा म्हणते आपण गणपती बाप्पांना बाहेर घेऊन गेलो तर त्यांनाही कोरोना होईल ना?