गणेशोत्सव २०२०

लेखनस्पर्धा -- माझा अनुभव - कोविड-१९ लॉकडाऊन -- पाचू

Submitted by पाचू on 5 September, 2020 - 10:19

१८ मार्च ला माझा मुलगा शाळा अनिश्चित काळासाठी बंद झाल्याच्या आनंदातच घरी आला. तसे आधीपासूनच कोरोनाने थैमान घालायला सुरुवात केलीच होती, पण युके सरकार लवकर लॉकडाऊन जाहीर करत नसल्यामुळे सगळीकडे काळजी वाढत चालली होती. रोज वाढत चाललेला मृत्युदर भीती वाढवत चालला होता. मग एकदाचे लॉकडाऊन जाहीर झाले आणि जीव भांड्यात पडला. कारण इकडे NHS ने स्पष्ट सूचना दिल्या होत्या की तुम्हाला कोवीडची लक्षणे वाटत असतील तर GP कडे किंवा हॉस्पिटल मध्ये येऊ नका, उलट घरीच आयसोलेट करा. त्यामुळे असे काही वाटलेच तरी डॉक्टरकडे जायचा मार्ग बंदच होता. जे काही असेल ते फोनवरच बोलायचे होते.

लेखनस्पर्धा - माझा अनुभव - कोविड -१९ - लॉकडाऊन - प्राचीन.

Submitted by प्राचीन on 3 September, 2020 - 12:18

माझा अनुभव - कोविड -१९ - लॉकडाऊन - प्राचीन.
सूर पुन्हा गवसला (तर) खरा.

विषय: 

लेखनस्पर्धा -- माझा अनुभव -- कोविड-१९ लॉकडाऊन -- राहुल बावणकुळे

Submitted by राहुल बावणकुळे on 3 September, 2020 - 10:08

२०२० हे माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचे वर्ष ठरणार होते. खूप साऱ्या अपेक्षा व स्वप्न उराशी बाळगून नवीन वर्षात प्रवेश केला. सुरुवात ही उत्तमच झाली होती. पण कॉविड-१९ नावाचा पाहुणा आला आणि संपूर्ण जगाला हादरवून हादरवून टाकलं. दरम्यान मीही अनेक बऱ्यावाईट अनुभवातून गेलोय, ते मी ह्याद्वारे मांडण्याचा प्रयत्न करतोय. मला माहिती आहे की लेख प्रचंड लांबला आहे. पण सर्वांना विनंती आहे की तो पूर्ण वाचावा. माझ्यासारख्या अबोल व्यक्तीला ह्या लेखाद्वारे व्यक्त होण्याची संधी भेटली त्यासाठी मायबोली गणेशोत्सव २०२० संयोजकांचे शतशः आभार!

बूकमार्क स्पर्धा - ऋन्मेऽऽष - अ गट - परी वय वर्षे ६ - (न्यू एंट्री - विडिओसह)

Submitted by ऋन्मेऽऽष on 2 September, 2020 - 19:23

स्पर्धेसाठी म्हणून या आधी खालील धाग्यावर प्रवेशिका दिली होती

https://www.maayboli.com/node/76386

ती आता मागे घेत आहे Happy

कारण स्पर्धेची वेळ वाढवण्यात आली असल्याने आमच्यातील किडा शांत बसणे आता शक्य नव्हते.

खरे तर आधीची वारली बूकमार्क किंवा टू ईन वन (बूकमार्क + हेअरक्लिप) कल्पना मला आवडलीच होती,

विषय: 

लेखनस्पर्धा -- माझा अनुभव - कोविड-१९ लॉकडाऊन -- सीमंतिनी

Submitted by Barcelona on 2 September, 2020 - 17:33

मुक्तहस्त चित्र स्पर्धा - ऋन्मेऽऽष - परी वय वर्षे सहा

Submitted by ऋन्मेऽऽष on 31 August, 2020 - 18:49

हे असे भेंडी बटाट्याचे काप आणि दोरी रंगात बुडवून चित्र काढणे मीच कधी लहानपणी केले नाही, तर पोरीला काय समजावणार होतो. त्यामुळे उगाच भाज्यांची नासाडी करण्यापेक्षा हाताच्या बोटांनी काहीतरी कलरफुल कर म्हणालो. जे तिचे फार आवडते आहे, फक्त कागदावर नाही तर तिला अश्या भिंती रंगवायला आवडतात Happy
तुझे साहित्य तूच ठरव म्हटले. तर तिने टूथब्रश मागितला. म्हटले छान आयड्या आहे. त्याचा तुला फवाराही ऊडवता येईल.

विषय: 

लेखनस्पर्धा -- माझा अनुभव - कोविड-१९ लॉकडाऊन -- atuldpatil

Submitted by अतुल. on 31 August, 2020 - 08:15

तो साधारणत: फेब्रुवारी २०२० मधल्या शेवटच्या आठवड्यातला एखादा दिवस असावा. "सध्या दिवस असे आहेत कि कोरोना व्हायरस च्या चर्चेशिवाय एक तास सुद्धा जात नाही" कोणत्यातरी अमेरिकन पत्रकाराने लिहिलेला लेख मी ऑफिस मध्ये बसून वाचत होतो. युरोपात कोरोनाने थैमान घातले होते. अमेरिकेत लॉकडाऊन सुरु झाला होता. तिथे कसे वातावरण असेल, लॉकडाऊन मध्ये लोक कसे जगत असतील वगैरे कल्पना मी करत होतो. चीन मध्ये तर तिथल्या प्रशासनाने अक्षरशः घरांचे दरवाजे खिळे ठोकून बंद केल्याचे ऐकायला मिळाले.

बूकमार्क स्पर्धा - ऋन्मेऽऽष - अ गट - परी वय वर्षे सहा

Submitted by ऋन्मेऽऽष on 29 August, 2020 - 18:54

बूकमार्क म्हणजे काय असते?
ज्या दिवशी हि स्पर्धा जाहीर झाली त्या दिवशीच मी हा प्रश्न फार निरागसपणे विचारला होता.
मला अ‍ॅक्चुअली बूकमार्क हा प्रकार माहीत नव्हता. किंवा कदाचित पाहिला होता, पण यालाच बूकमार्क ऐसे नाव हे माहीत नव्हते. एखाद्या ईटरनेटवरील साईटच्या लिंकला सेव्ह बूकमार्क करतात हे माहीत होते. पण ते बनवायची कशी काय स्पर्धा असू शकते याने आणखी गोंधळून गेलो होतो. मग कोणीतरी बूकमार्क काय असते हे मला समजावले. ते बघून मला ईतके साधे लक्षात आले नाही याचे स्वत:शीच हसायला आले. पण हा ऋन्मेष म्हणजे उगाच वेड पांघरूण पेडगावला जातो या ईमेजमुळे ईतर कोणी माझ्या या अज्ञानावर हसले नसावे.

विषय: 

श्री गणेशाची विविध माध्यम वापरून काढलेली चित्रे..

Submitted by अंतरा on 28 August, 2020 - 06:52

१) कॉफी पेंटींग...
रंगांऐवजी (मुख्यतः ) कॉफी वापरून काढलेले श्री गणेशाचे हे मोहक रूप
IMG_20190902_101139.jpg

२) कॅन्व्हास पेंटींग
हे कॅनवास वर अ‍ॅक्रेलिक रंग वापरून काढलेले चित्र
g1.jpg

३) एमसील पेंटींग / म्युरल
g3.jpg

शब्दखुणा: 

बुकमार्क स्पर्धा - हर्पेन (गट ब)

Submitted by हर्पेन on 27 August, 2020 - 08:10

गट ब - हर्पेन हर्षद पेंडसे

टी बॅग्स च्या बॉक्समधे जो सेपरेटएर असतो त्याचा वापर करून हा बुक मार्क बनवण्यात आला आहे.
बनवला त्या क्रमाने फोटो टाकत आहे.
डिझाईन इथून बघून कॉपी केलंय
https://www.classroomdoodles.com/bookmarks.html दोन वाढीव टिंब ही माझी भर Proud

विषय: 

Pages

Subscribe to RSS - गणेशोत्सव २०२०