कोविड १९ अनुभव

लेखन स्पर्धा २ - माझा अनुभव - कोविड-१९ लॉकडाऊन

Submitted by Aaradhya on 30 August, 2020 - 13:41

आपण देवाकडे सतत काहीना काही मागत असतो. बऱ्याचदा जे हवं ते मिळतंही आणि मिळत नाहीही, कधी कधी उशिरा मिळतं. कदाचित म्हणूनच भगवानके घर देर है अंधेर नही म्हण आली असेल. बरेच दिवस झाले सुट्टी नाही कुठे फिरणं नाही फक्त काम काम काम! एका पॉईंटला कंटाळा आला होता पण पर्याय नसल्याने करत होतो. असं वाटत होतं की काहीतरी व्हावं आणि जगच बंद पडावं, म्हणजे सुट्टी मिळेल. देव सगळ्या मागण्यांची एन्ट्री करून घेत असेल बहुदा आणि मग सगळ्यांच्या मागण्या कॅण्डीक्रश च्या गेम प्रमाणे सेट करत असेल.

विषय: 
शब्दखुणा: 

लेखनस्पर्धा -- माझा अनुभव - कोविड-१९ लॉकडाऊन -- कविन

Submitted by कविन on 29 August, 2020 - 06:18

"You-Know-Who"

सध्या त्याने थैमान घातलय
सध्या त्याने होम अरेस्टवर पाठवलय

बातम्या म्हणू नका
सोशल मिडीया म्हणू नका
त्याने सगळच हायजॅक केलय

तो म्हणजे तोच हो तो, you know who! right?

हे असं त्याच्याबद्दल लिहून काढलं त्यालाही महिना दिड महिना होऊन गेलाय आता. आधी तो तसा दूर म्हणजे परदेशगमनाची हिस्टरी असलेल्यांशी सलगी दाखवून होता. नंतर हळूहळू हात पाय पसरत माझ्या गावातही येऊन पोहोचला. अमुक ईमारत सील, तमुक भाग सील अशा बातम्या ऐकता ऐकता खरोखर आमच्या भागात याची डोळा अशी परिस्थिती बघितली आणि जवळ म्हणजे किती जवळ आलाय हा याची जाणीव झाली.

Subscribe to RSS - कोविड १९ अनुभव