मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
नैवेद्य
मायबोली गणेशोत्सव २०१७ - बाप्पाचा नैवेद्य
बाप्पा तुला आमच्यावर भरोसा नाय काय
बाप्प्पाला आवडती लाडू
वळायला तयार मंडळातले भिडू
लाडवांचा आकार कसा गोल गोल
बाप्पा तू आमच्या संगे गोड गोड बोल
बाप्पाला आवडती एकवीस मोदक
साच्यातले दिसती भारी सुबक
मोदकांचे ताट कसे गोल गोल
बाप्पा तू आमच्या संगे गोड गोड बोल
बाप्पाला आसन चंदनाचा पाट
आवडत्या नैवेद्याने भरून गेलंय ताट
मध्यावर आहे बासुंदीचा बोल
बाप्पा तू आमच्या संगे गोड गोड बोल
मोदगम
नैवेद्यम् समर्पयामि
आपल्या धर्मात आपण अनेक उत्सव, सणवार मोठ्या उत्साहात साजरे करत असलो तरी एवढ्या उत्सवांच्या गर्दीतला 'गणेशोत्सव' हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा. आपल्यापैकी बर्याच जणांची इतर कोणत्याही देवावर श्रद्धा असली तरी गणपतीबाप्पा मात्र थोडा जास्तच जवळचा वाटतो. त्याला दरवर्षी निरोप देताना डोळ्यांचा कडा पाणावतात ते काय उगाच? बाप्पांच्या आगमनाची चाहुल लागली की मिठाईची दुकानेही कात टाकतात.. तर्हेतर्हेचे पेढे, बर्फींसोबत "येथे उकडीचे मोदक बनवून मिळतील" अशा पाट्याही दिसायला लागतात.
