कोकोनट गोलगप्पा फॉर बाप्पा !

Submitted by दीपांजली on 12 September, 2018 - 03:58
लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मोदकाचे सारण, पाणीपुरीच्या पुर्या, कोकोनट मिल्क/क्रिम , साखर.
सारणासाठी : फ्रेश नारळ (मी फ्रोजन श्रेडेड कोकोनट वापरला.), गुळाची पावडर (किंवा किसून घेतलेला) ,खसखस, इलायची पावडर , मिक्स ड्राय फ्रुट भिजवून बारीक कापून घेतलेले, भिजवलेले बेदाणे/मनुका.

क्रमवार पाककृती: 

सारणाची कृति काही वेगळी नाही, त्यामुळे अगदी सविस्तर लिहीत नाही पण नेहेमी प्रमाणेच तूपावर थोडी खसखस भाजून नारळाचा कच्चेपणा जाईपर्यन्त परतले, गुळ , ड्राय फ्युट्स घालून मिश्रण घट्ट होईपर्य्नत परतले.
हे सारण आता पुर्यांमधे भरायचे !
त्या आधी सारण थोडे रुम टेंपरेचरला येऊ द्यावे किंवा फ्रिझ मधे ठेवले तरी चालेल .
कोकोनट सॉस साठी : कॅनमधला थिक कोकोनट क्रिम सॉस नीट घोटून घेतला, त्यात साखर आणि इलायची पावडर कुटून घातली, नीट हलवला, हा झाला सारण पुरीचा सॉस तयार !
आता पाणीपुरीची पुरी वरून फोडून घ्या, त्यात प्रथम सारण घाला, बर्यापैकी भरगच्च भरलं पाहिजे, एखादा चमचा सॉसला जागा राहिल इतकं भरा.
आता त्यावर बनवलेला कोकोनट सॉस घाला, सारण पुरी तय्यार !

परवा पाणीपुरीची कोरडी पुरी खाताना साक्षात्कार झाला कि आवरणाची चव बर्यापैकी मोदकाच्या कोटींगच्या जवळ जाणारी आहे, मग काय केला प्रयोग ! माझ्या सारख्या तळण करायचा आळस असणार्या लोकांनी ही रेसिपी नक्की ट्राय करावी, घरात तळणाचा वास न येता झटपट (हो झट्पट शब्द लिहावाच ) आणि हटके (हा शब्दही लिहितेच) प्रसाद तयार !
(कॉमेंट सेक्शन मधे स्वाती आंबोळेने ‘हटके’ टायटल सजेस्ट केल्याने , आधी दिलेल ‘सारणपुरी विथ कोकोनट सॉस’ टायटल बदललय Wink )

B5EECA72-B0D9-42F4-AF5A-D124B7A0D2BE.jpegB771108D-F1A9-4A5C-99B1-C6AD9D18002E.jpeg

अधिक टिपा: 

* कोकोनट सॉस आयत्या वेळीच घाला, सारण हवं तर आधी भरून ठेऊ शकता !
* सारण भरण्या आधी पुरीचं तोंड नॉर्मल पाणीपुरीपेक्षा ब्रॉड फोडा .
* यात सॉसची खूप व्हेरीएशन्स करता येतील, कॅरॅमल सॉस , चॉकलेट सॉस , सिनॅमन क्रिम , मँगो पल्प इ.
* सारणातही गुलकन्द फ्लेवर, खवा इ. व्हरायटी करता येतील !

माहितीचा स्रोत: 
स्वप्रयोग !
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा मस्त आहे की आयडिया! पण नाव फॅन्सी हवे ब्वॉ काहीतरी. हे म्हणजे साहित्यच'नाव म्हणुन वापरल्यासारखे झाले Happy Happy

मस्त रेसिपी. उद्या थोडंसं सारण उरेल. आणि अनायसे पाणीपुरीच्या पुर्या पण आहेतच. परवा नक्की. Wink

MT,
मला काही सुचेनात फॅन्सी नावं Proud
स्वाती,
तुझं टायटल आवडलं , केलं बारसं !

भारीच! दोन आवडत्या पदार्थांचे फ्युजन Happy
चवीला कसं लागतं? थोडी कल्पना करता येते आहे पण खाऊन पाहिल्याशिवाय कळणार नाही असं वाटतंय.

छान आहे आयडिया.
घरी फिलो डो पडलाय त्याचा अशा पद्धतीने कोकोनट बकलावा करून बघायला हवा Happy

वाह! मस्तच दिसताहेत..

पण खाऊन बघितल्याशिवाय टेस्ट समजणार नाही.. I hope मला लवकरच खायला मिळतील Wink

अगं सायो, ते गरम करून, घ्यायचं. थाई स्टिकी राईस डेझर्ट करता करतात तसं. त्याने कच्चट कॅनमधली चव जाईल.

सायो,
मी डाय्स्रेक्ट कॅनमधून घेऊन त्यात इलायची, साखर घालून वापरलं टॉपिंगसाठी , अगदी १ चमचा एका पुरीत त्यामुळे कच्ची चव अजिबातच नाही लागत पण तू शिजवून घेउ शकतेस सशलने लिहिलय तसं !
मुळात मला ते कोकोनट मिल्क प्रकार पाणीपुरी फिल साठी सुचला, पहिल्यांदा केले तेंव्हा फक्त भरगच्च सारण भरून नो टॉपिंग , तरीही छानच लागलं.
नेक्स्ट टाइम कॅरॅमल सिरप वापरावं म्हणतेय किंवा सिनॅमन क्रिम चीज टॉपिंग.

सिरपच हवं असा आग्रह का? पिनाकोलाडा ओतली तर काय हरकत? बाप्पा सोशल ड्रींकर नाही काय?? Wink

परवा पाणीपुरीची कोरडी पुरी खाताना साक्षात्कार झाला कि आवरणाची चव बर्यापैकी मोदकाच्या कोटींगच्या जवळ जाणारी आहे, >>>
डिजे हे तळलेल्या मोदकांंसारख कव्हर अस का? आमच्याकडे उकडीचे कणिकेचे मोदक करतात. ते तळुन असतात तस का ? मला आयडीया खुपच आवडली . मी तेवढ क्रिस्पी आवरण नाही आवडल तर, नेहमीचे उकडीचे मोदक पण वरून तसा सॉस घालून प्रोग्रॅमला ठेवाव म्हणती आहे. किंवा चॉकोलेट्/कॅरॅमल सॉस पण मधून मधुन अ‍ॅड करुन.

Pages