मायबोली गणेशोत्सव २०१७ - बाप्पाचा नैवेद्य

Submitted by संयोजक on 23 August, 2017 - 01:32

बाप्पा तुला आमच्यावर भरोसा नाय काय

बाप्प्पाला आवडती लाडू
वळायला तयार मंडळातले भिडू
लाडवांचा आकार कसा गोल गोल
बाप्पा तू आमच्या संगे गोड गोड बोल

बाप्पाला आवडती एकवीस मोदक
साच्यातले दिसती भारी सुबक
मोदकांचे ताट कसे गोल गोल
बाप्पा तू आमच्या संगे गोड गोड बोल

बाप्पाला आसन चंदनाचा पाट
आवडत्या नैवेद्याने भरून गेलंय ताट
मध्यावर आहे बासुंदीचा बोल
बाप्पा तू आमच्या संगे गोड गोड बोल

तुमच्या बाप्पाची मनोभावे पूजा करून त्याला प्रसन्न करण्यासाठी यंदा तुम्ही कायकाय नैवेद्य अर्पण केले, पाहुण्यांसाठी काय खिरापत तयार केली याची चित्रमय झलक बघायला मायबोलीकर उत्सुक आहेत.

IMG-20170824-WA0014.jpg

नैवेद्याची प्रकाशचित्रं आणि खास आठवणी इथेच प्रतिसादात लिहा. त्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१७' या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे. पाककृती द्यायची असल्यास मात्र पाककृतींच्या धाग्यावरच लिहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

IMG_8041.JPG

बाकीचे नीट म्हणून काढलेले फोटो अपलोडच नाही झाले.
२१ मोदकांत १ सिद्धलाडू आहे. सिद्धलाडू म्हणजे गणपतीचं शुभासन मानतात. म्हणजे गणपतीच्या मांडीच्या पद्धतीचा घडवतात तो त्यामुळे २१ मोदक केले की एक तरी सिद्धलाडू आणि करंजी करतातच. सिद्धलाडू फक्त उकडीचा असतो. उकडीची नुसती वळकटी घ्यायची कडबोळ्यासाठी घेतात तशी, तळहातावर मोठी करून, आणि गाठ मारल्यासारखा पण मांडी वाटेल असा वळायचा.

घाबरत घाबरत आले इथे, आणि व्हायचं तेच झालं! तोंपासू! Happy

सिद्धलाडूंबद्दल मला सासरी आल्यावर कळलं - त्यामुळे मला वाटायचं देशावरची पद्धत आहे.
मोदकांना बहीण म्हणून एकतरी करंजी (आणि उलटही) हे मात्र दोन्ही घरी करतात. Happy

मनीमोहोर, धन्यवाद.
सिद्धलाडू कोकणातही सगळीकडे करत नाहीत. किंबहुना कोकणातल्याच अनेकांना सिद्धलाडू माहिती नाही हेही मी बघितलंय त्यामुळे हा प्रकार नक्की देशावरचा की कोकणातला काय ते नक्की समजायला मार्ग नाही! शिवाय सासर देशावरचं पण त्यांनाही सि ला माहिती नाही.
मोदक-करंजी बहीण भाऊ ही मात्र दोन्ही खरं आणि केलंही जातंच!

मंडळी, मायबोली गणेशोत्सव २०१७ ची सांगता झालेली आहे.
आपल्या भरभरून प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद!
गणपतीबाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!!