गणेशोत्सव २०१७

रंगरंगोटी- विराज- ४.५ वर्षे

Submitted by संपदा on 6 September, 2017 - 01:39

मायबोली गणेशोत्सवात भाग घ्यायचे विराजचे हे पहिलेच वर्षं, त्यामुळे तो गणपतीचे चित्र रंगवून देण्यासाठी उत्सुक होता. घरी १० दिवसांचा गणपती असल्याने घरच्या गणपतीकडे बघत हे चित्र रंगवण्यात आले आहे Biggrin

IMG_0622_1.jpg

विषय: 

रंगरंगोटी - रेवती - ६.५ वर्षे

Submitted by शब्दाली on 5 September, 2017 - 02:10

रंगरंगोटीचा धागा आल्याबरोबर लगेच प्रिंटआउट काढुन लेकीला दिला होता, रंगवायला मुहुर्त मात्र आज लागला.

Reva_ganapati_drawing-1.jpeg

गणपती बाप्पा मोरया !!!

शब्दखुणा: 

मायबोली गणेशोत्सव २०१७ - बाप्पाचा नैवेद्य

Submitted by संयोजक on 23 August, 2017 - 01:32

बाप्पा तुला आमच्यावर भरोसा नाय काय

बाप्प्पाला आवडती लाडू
वळायला तयार मंडळातले भिडू
लाडवांचा आकार कसा गोल गोल
बाप्पा तू आमच्या संगे गोड गोड बोल

बाप्पाला आवडती एकवीस मोदक
साच्यातले दिसती भारी सुबक
मोदकांचे ताट कसे गोल गोल
बाप्पा तू आमच्या संगे गोड गोड बोल

बाप्पाला आसन चंदनाचा पाट
आवडत्या नैवेद्याने भरून गेलंय ताट
मध्यावर आहे बासुंदीचा बोल
बाप्पा तू आमच्या संगे गोड गोड बोल

विषय: 
Subscribe to RSS - गणेशोत्सव २०१७