प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक १ - ऋतुरंग

Submitted by संयोजक on 30 August, 2022 - 13:28

आजचा विषय:- ऋतुरंग...

तीच खिडकी, तोच निसर्ग. पण ऋतू बदलला की निसर्गही वेगळंच रुपडं घेऊन समोर येतो. कधी पानगळ तर कधी अंकुर फुटलेली पालवी, कधी धुक्यात हरवलेली वाट तर कधी वर्षाधारांनी धो धो वाहिलेले पाट. जणू निसर्ग कात टाकतो आणि एकेक ऋतू आपल्याला त्याच्या सोहळ्यात वेडं करतो.
म्हणूच पाडगावकर म्हणतात सहा ऋतूंचे सहा सोहळे ! येथे भान हरावे !
चला तर मग. मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया आपल्या सगळ्यांचा आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांचा झब्बू !
हे लक्षात ठेवा:-
१. हा खेळ आहे. स्पर्धा नाही.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. दिलेल्या छाया/प्रकाशचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छाया/प्रकाशचित्र टाकावे.
४. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
५ . झब्बू देताना एका ऋतूच्या झब्बूनन्तर दुसऱ्या ऋतूचा झब्बू अपेक्षित आहे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/शकते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे (https://www.maayboli.com/node/47635) पाहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहेत सगळे फोटो.
हा वसंत ऋतू मधला.ठिकाणाचं नाव आठवत नाही.असंच चालत चालत शोधलं होतं.मानहाईम च्या जवळचा कोणतातरी लेक.
IMG_20220831_081501.jpg

snowday.jpg
एका मोठ्या विंटर स्नो स्टॉर्मच्या दुसर्‍या दिवशी Happy

थंडीचे दिवस होते, भर दुपारीच उन्ह कलली होती , उन्हाला ऊब नव्हतीच. रस्ता शांतपणे पहुडला होता. एखाद्याच अंगणात एखादं दुपारी न झोपलेलं बाळ बाहेर खेळत होत.
बहुतेक झाडांनी आपला पर्ण संभार त्यागल्याने ती ध्यानस्थ ऋषी मुनींसारखी दिसत होती. फक्त हे एकच झाड गोंधळून गेलं होतं आणि पूर्णपणे फुललं होतं.

ऊन्हाळा...
BE248704-6A89-4289-81CA-47CE7CC49C47.jpeg

ऐन सरत्या मे महिन्याच्या उन्हाळ्यातली संध्याकाळ. आकाशात वळवाच्या पावसाची चाहूल देणारे ढग.
थोडासा शिडकावाही झाला होता अंगावर.
मांडवी बंदरातून गेटवे ऑफ इंडियाला बोटीमधून येतानाचे दृश्य..
आणि मध्यभागी ताजचा उजळलेला घुमट..


Pages