'मायबोली गणेशोत्सव 2022

चित्रकला स्पर्धा - पावसाळ्यातील दृश्य- jui.k- जुई

Submitted by jui.k on 10 September, 2022 - 09:06

हस्तलेखन स्पर्धा - अ गट - मित - मल्हार

Submitted by मित on 9 September, 2022 - 00:16

हस्तलेखन स्पर्धा - छोटा गट - गणेशोत्सव २०२२
चित्रपट - घरकुल
गीत रचना - गदिमा
स्वर - राणी वर्मा
संगीतकार - सी.रामचन्द्र

विषय: 

प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक १० - खेळ मांडला.

Submitted by संयोजक on 8 September, 2022 - 23:22

प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक १० - खेळ मांडला.

बालपणीचा काळ सुखाचा. शाळा सुटली आणि गृहपाठ झाला रे झाला की बाहेर खेळायला जायची कोण घाई. विटी -दांडू, लगोरी, कबड्डी, खो-खो, आंधळी कोशिंबीर ,गोट्या,लपाछपी, भोवरा या खेळांत तासनतास कसे जायचे कळायचं नाही.
घरात खेळा म्हणलं तरी उत्साह तोच असायचा.
भातुकली, पत्ते, बुद्धिबळ, सापशिडी, नवा व्यापार,बाहुलाबाहुली लग्न, साबणाचे फुगे ... खेळ काही संपायचेच नाहीत. वर्गात सुद्धा बाकावर बसल्या बसल्या फुल्ली-गोळा खेळायला धमाल यायची. मंडळी,
आजचा विषय हाच आहे. खेळ.

कॅालेजचे मोरपिशी दिवस- मोहिनी१२३

Submitted by मोहिनी१२३ on 8 September, 2022 - 14:10

नमस्कार, मायबोली गणेशोत्सव संयोजकांनी यावर्षी अतिशय जिव्हाळ्याचा विषय दिला आहे त्याबद्दल सर्वात प्रथम संयोजकांचे आभार.

मी दहावीनंतर पदवीची पाच वर्ष, पदव्युत्तर डिप्लोमा चे एक वर्ष आणि पदव्युत्तर डिग्री ची दोन वर्ष अशी सुमारे आठ वर्ष वेगवेगळ्या महाविद्यालयांत गेले. तसेच त्याबरोबर परकीय भाषा शिक्षण आणि संगणक शिक्षण मी घेतलं त्यामुळे माझ्या गाठीला विविध मोरपंखी, रोमांचकारी आणि आनंददायक असे अनेक अनुभव आहेत.

कथाशंभरी २ - घर - निकु

Submitted by निकु on 8 September, 2022 - 03:11

अंगणात येऊन रघूने गेले ६ महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि समाधानाने हसला.
गावात त्याचे मोठ्ठे घर होते तरी तो या छोट्याश्या खोलीत रोज येत असे आणि जाताना शेजारच्या बंद घराकडे पहात बसे.
आता त्या घरालाही जिवंतपणा येणार होता. थोड्याच वेळात अंगण साफ झाले. त्याचे बालपण तिथे बागडू लागले आणि तो काळाकुट्ट् दिवस..; घर, शाळा सोडावी लागली... घरच्या गरिबीने सगळेच संपवले होते. शेजारच्या वाड्यात, जिन्याखालची एक खोली घरमालकांच्या कृपेने मिळाली म्हणून नाहीतर रस्त्यावरच आलो होतो आपण.

प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक ९ - अकेले है तो क्या गम है.

Submitted by संयोजक on 7 September, 2022 - 23:34

प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक ९ - अकेले है तो क्या गम है.

डोळ्यासमोर छान हिरवंगार शेत पसरलेलं आहे . आणि मध्येच एखादं (एखादच हं) नारळाचं झाड डौलात उभं आहे. काय म्हणत असेल बरं मग ते?
अकेले है तो क्या गम है ....

ओळखलंत ना मंडळी? आजचा विषय काय आहे ते.

Subscribe to RSS - 'मायबोली गणेशोत्सव  2022