प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक २ - मेंदी, टॅटू आणि बरंच काही ...

Submitted by संयोजक on 31 August, 2022 - 14:02

आजचा विषय:- मेंदी ,टॅटू

मनभावन हा श्रावण... श्रावणातला पहिला सण म्हणजे नागपंचमी. मागोमाग सण उत्सवांची लगबग सुरू होते आणि रोजच्या धबडग्यातून वेळ मिळताच मेंदीचा कोन मिळवला जातो. मेंदीचा तो वेडावून टाकणारा गंध आणि सुबक रेखाटनं यांनी हात सजतात. लग्न समारंभात तर मेंदीचा सोहळाच साजरा होतो. आपणही सगळ्यांनी कधी ना कधी मेंदी काढलीय तर कधी काढून घेतलीय.

आता नवीन पिढीला मेंदी इतकीच टॅटू ने ही भुरळ घातली आहे,जुन्या 'गोंदवण' चं नेक्स्ट व्हर्जन म्हणता येईल'. स्टायलिश ,सुंदर आणि आकर्षक टॅटू ची क्रेझही काही औरच. मायबोली गणेशोत्सव २०२२ घेऊन येतोय दुसरा झब्बू म्हणजेच तुम्ही काढलेल्या,काढून घेतलेल्या, अनुभवलेल्या मेंदी/टॅटू चे प्रकाशचित्र.

मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया आपल्या सगळ्यांचा आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांचा झब्बू !

हे लक्षात ठेवा:-
१. हा खेळ आहे. स्पर्धा नाही.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. दिलेल्या छाया/प्रकाशचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छाया/प्रकाशचित्र टाकावे.
४. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/शकते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
६.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे (https://www.maayboli.com/node/47635) पाहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लहानपणी जेव्हा पहिल्यांदा एका बड्डे पार्टीत टॅटू हा प्रकार समजला..
घरी आल्यावर आधी आपल्या हातावर आणि मग जो सापडेल त्याच्या हातावर..
माझे तर पोटही सोडले नव्हते Happy

IMG_20220901_101358.jpg

आणि बरंच काही ...
मुळे हिंमत करून टाकतोय.

चालणार नसेल तर उडवून टाका. हाकानाका
IMG-20140601-WA0008.jpg

हर्पेन यांच्या कॉम्पिटीशनला कोण आले असे मी फोटो स्क्रॉल करत असतानाच मनातल्या मनात म्हणत होतो.... आणि मग नाव बघून डोक्याला हात मारला.

ऋन्मेष, सिम्बा म्हणून एक ट्रायथलीट आहेत बरे माबोवर इकडे.

पोहताना ते कागदी बिब लावता येत नाही.
दुर्दैवाने काही अपघात झालाच तर कोण व्यक्ती ते कळावे म्हणून पोहोणे सुरु करायच्या आधी स्पर्धकाचा क्रमांक असा हातावर आणि / दंडावर लिहितात.

आणि बरंच काही ...

पबमधे प्रवेश करताना मारलेला ठप्पा

IMG_20180308_222325.jpg

IMG-20220902-WA0049.jpg
भाच्याच्या पहिल्या वाढदिवसाला काढलेला tatoo, माझ्या हातावर

माझ्या मुलीला बुद्धीबळं खेळायची प्रचंड आवड लागली होती तीनेक वर्षांपूर्वी. तेव्हा 'चेसचं डिझाइन हवं' हा तिच्या दादाने पुरवलेला तिचा स्त्रीबालहट्ट.
तुम्हाला कोणकोणत्या सोंगट्या ओळखता येतायत बघा :

chess_mendi.jpg

नुकताच केलेला Harry Potter theme tattoo. यात deathly hollows, Snitch आणि प्रोफेसर स्नेप ची always कोट आहे आणि एल्डर वांड मधून स्टार्स बाहेर येताहेत.

IMG_20220904_105047.jpg

Tattoos हे नुसते डिझाईन म्हणून न पाहता डिझाईन फिलॉसफी म्हणून पहावेत असे वाटते, मला वाटत असे आपण काहीतरी जबरी tattoo करावा पण काय ते कळत नव्हते, मी टीम लीड झालो तेव्हा हा खालील tattoo बनवला होता, कंपनी पॉलिसीमध्ये permanent allowed नसल्यामुळे temporary काढला, तो पण कसा काय माहिती जवळपास ५ महिने टिकला होता.

Screenshot_20220904-145232_Gallery.jpgtattoo - ओल्ड मंगोलियन स्क्रिप्ट मध्ये "खान"

प्रचलित समज म्हणतो तसे खान हा शब्द इस्लाम/ इस्लामिक संस्कृती आधारित नसून तो मूळचा एक मंगोलियन शब्द आहे, खान ह्या शब्दाचा अर्थ "सशस्त्र दस्त्याचा कप्तान" असा होतो, मी लष्करात वगैरे तर गेलो नाही पण मी माझी, माझ्या अस्तित्वाची अन माझ्या प्रियाजनांच्या आनंदाची लढाई तर लढतोच आहे आयुष्याशी, त्यामुळे

आय एम द खान (ऑफ माय ओन वर्ल्ड)

अपना हात जगन्नाथ .. Art & Artist
स्वत:च उजव्या हाताने डाव्या हातावर काढलेली मेहंदी Happy

IMG_20220909_125603.jpg