विडंबन

मुक्या अप्सरेचा मुका गार होता...

Submitted by विडंबनराव on 28 January, 2013 - 12:22

सतीश साहेब धन्यवाद... आमची भूक तुम्ही बरोब्बर जाणता...

मुक्या अप्सरेचा मुका गार होता
मिठीच्या तिचा फक्त आधार होता

तिचा भाव घाऊक होता जगाशी
खुळ्या, तूच झाला निराधार होता

तिचे वजन भारी, कसे मी वदावे
तनावर कशाचा, किती भार होता

मुके का कडू, गोड वाट्यास आले
कळेना, तिथे फार अंधार होता

बरे जाहले तूच शरमून गेला....
तुझ्या मागुती चाप बसणार होता

जरी गाठ धरलीस, सुटलीच पण ती....
तसा पाहुनी तुज नमस्कार होता

मुले झोपती टाकुनी नित्य माना
अशा मास्तराचाच सत्कार होता

खुळ्याने तयाला नमस्कार केला
तया वाटले तोच झुंझार होता

कुले चोळता भ्यायले लोक याला

शब्दखुणा: 

गझलियत वाटुनी बोट खाशी...

Submitted by विडंबनराव on 28 January, 2013 - 11:28

विनायक उजळंबे यांच्या गझलेवरून सुचलेले...

गझलियत वाटुनी बोट खाशी
पेग जाईल जेंव्हा तळाशी

झेप मी घेतली उंच गगनी
काढता जाळ कोणी कुल्याशी

वास सोडीत जातो गझलचा
अत्तराची अपेक्षा जनाशी

झिंगणे हेच आयुष्य बाळा
तेच घडवे सभा अंतराशी

थंड रक्तास पाजून व्हिस्की
जोड नाते तुझे झिंगण्याशी

घोर माझ्या खिशाला कशाला?
आज गुत्त्यातला तू खलाशी

**** हे विडंबन या गझल करणार्‍यावर नाही. मी फक्त कवितांचा आधार घेतो. विडंबन मूळ कवीवर असते असे नाही. गैरसमज करून घेऊ नये. करमणुक म्हणून पहावे.

शब्दखुणा: 

इतकंच लागतं जेवायला (विडंबन)

Submitted by निंबुडा on 18 January, 2013 - 05:13

इतकंच लागतं जेवायला - प्रेरणास्थान हे आहे.

तू म्हणालास,"जपून खा गं!
पोटाची वाट, त्यात भूक दाट"

मी म्हंटलं,
"असुदे रे!
मऊ खिचडी आहे ना?
मग कसली भूक आणि कसली वाट
सोबतीने खाऊ की खिचडी आणि चाट *"

तू म्हणालास,
"जपून ग!
जेवण म्हणजे नुसती,
खा-खा आणि उपासमारीची शर्यत आहे"

मी म्हंटलं,
"असुदे रे!
लंघन करण्याचं महत्व
म्हणून ना कळत आहे?"

तू म्हणालास,
"आणि मी ओकलो तर?"

मी म्हंटलं,
"मी आहे की"

उपास-तापास, ढेकर, लंघन
कळत नाहीत रे मला

अवघड असूनही
खिचडी आणि चाट खाण्याचं वाण
मनापासून निभावतोय

शब्दखुणा: 

बहर गझलेचा उचलला, अन् हझल झाली!

Submitted by चैत रे चैत on 3 December, 2012 - 13:58

सतीश देवपूरकरांच्या गझलेतले काव्य आम्ही रिचवले, अन् हझल झाली...

हझल

बहर गझलेचा उचलला, अन् हझल झाली!
अर्थ शेरांचा बिघडला, अन् हझल झाली!!

केवढ्या सहजीच आली चाल हाताशी;
काफिया नुसता मिळवला, अन् हझल झाली!

चिंतनाची बात नाही, मौत प्रतिभेची!
कळफलक नुसता बडवला, अन् हझल झाली!!

दाद देण्या येत नाही कोणिही दर्दी!
मीच मग डंका पिटवला, अन् हझल झाली!!

ते गझलसम्राट अन् मी एक हा कवडा!
प्रत्येक शेरा फाडला, अन् हझल झाली!!

खर्चिली मी खेचण्यासाठीच ही शाई

बुरख्याआडचे वाढले वार हल्ली

Submitted by शायर पैलवान on 7 November, 2012 - 09:14

गझल विडंबनाचा हा पहिलाच प्रयत्न
----------------------------------------------

ना राहिला मोहब्बत-प्यार हल्ली
बुरख्याआडचे वाढले वार हल्ली

होती जयांची कधी मुक्त ओळख
त्यांच्यावरच करतो मी वार हल्ली

बरकतीसाठी ऊर माझा फाटतो
बघवत नाही छंदिष्ट भरभराट हल्ली

सांगण्या शहाणपणा ना कुणी उरला
कानामधे ओतती सारे विष हल्ली

चाललो लाऊन घेण्या फास मी
हाय! दोर मिळेना कुठे अस्सल हल्ली

दिल्लीत ना विचारे आज कुणी मजला
गल्ली गाजवतो शायर पैलवान हल्ली

अरे, फुलांचा सुगन्ध मी का दुरून घेतो ? (विडंबन)

Submitted by अ. अ. जोशी on 10 September, 2012 - 12:02

प्रा. सतीश (सर) यांच्या गझलेवर आधारीत विडंबन....

अरे, फुलांचा सुगन्ध मी का दुरून घेतो ?
वयापरत्वे जमेल ते ते बसून घेतो

करून इस्लाह छापले जे कधी गुरूने
कळूनही शिष्य केवढा मोहरून घेतो

असे नव्हे की, गझल भटांनीच फक्त केल्या
जमेल तेथे 'अम्ही''सुधा' पाजळून घेतो

इथे करावेच लागते वज्र काळजाचे
फुकट मिळाल्यावरी कुणीही दळून घेतो

पलीकडे जो गुरू कुणाचा कधी न झाला
अलीकडे शिष्य तो स्वतःला म्हणून घेतो

उगीच, सोन्या! करू नको तू प्रयत्न भलते
लिही तुला जे जमेल, मी चालवून घेतो

गटगचे आवताण स्वीकारू नये

Submitted by A M I T on 16 August, 2012 - 07:02

वैभवरावांचं स्वप्नभोळं मन दूपारल्यानंतर आम्हांला सुचलेलं काही...

नाही मिळाले मटण म्हणून
डाळ खावून कधी ढेकरू नये

काल पुण्यातल्या एके दुकानी
वाचले, 'येथे पत्ता विचारू नये'

जिस्म-२ पाहून उगाच वाटते
आयुष्यात कधीच सुधारू नये

गप्पांच्या धाग्यावर डू आयडीने
गटगचे आवताण स्वीकारू नये

दोन - चार कथा काय लिहल्या !
लेखक म्हणून कुणी शेफारू नये

* * *

http://kolaantudya.blogspot.in/

शब्दखुणा: 

एक कविता आणि विडंबन

Submitted by चिखलु on 5 June, 2012 - 17:30

वैधानिक इशारा
ह्या लेखात उल्लेख केलेल्या व्यक्ती तसेच इतर माबोकरानी हा लेख हलके घ्यावा.
------------------------------------------------------------------------------------------------------------------

गुलमोहर: 

डॉक्टरेट इन भ्रष्टाचारालॉजी

Submitted by दामोदरसुत on 22 April, 2012 - 07:49

डॉक्टरेट इन भ्रष्टाचारालॉजी (कोठल्याही प्रकारच्या भ्रष्ट आचाराचे शास्त्र)

भ्रष्टारालॉजी विषयात डॉक्टरेट घॆण्यासाठी एकाने विद्यापिठाकडे अर्ज करतांना जोडलेले विषयाचे सिनॉप्सिस:
कुप्रसिद्ध भ्रष्टाचारी होण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या नवोदितांसाठी गोत्यात आल्यास सुटण्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वांचा वस्तुनिष्ठ अभ्यास (सिनॉप्सिस)
(पीएच्डी च्या विषयाचे नाव लांबलचक असल्याशिवाय अर्जच घेतला जात नाही)

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

दिसला गं बाई दिसला!

Submitted by अन्नू on 17 April, 2012 - 12:35

(जगदीश खेबूडकर यांची मनस्वी क्षमा मागून.)

दिसला गं बाई दिसला महीला मुक्ती (क्रांती) सॉंग स्पेशल
प्रथम, गाण्याची चाल नीट समजण्यासाठी ते ओरिजनल गाणे येथे पहा व ऐकून घ्या.
http://www.youtube.com/watch?v=lCiUi_LKkoM

गाणे:- दिसला गं बाई दिसला (रिमेक)
चाल:- दिसला गं बाई दिसला मुख्य गाणे (पिंजरा सिनेमा)
नाईका गायकः- गावचीच एक सर्वसामान्य धाडसी बाई
कोरसः- गावातील पाच सहा शोधून काढलेल्या तोंडच्या फटकळ बाया!

अग बयोs गंsssssssssssss

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - विडंबन