विडंबन

लाचखोर लोकांनी -

Submitted by विदेश on 23 July, 2011 - 21:24

(चाल: रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी...)

लाचखोर लोकांनी, भ्रष्ट साऱ्या मार्गांनी
स्वार्थासाठी कायदाही तोडीला
पायबंद घालू त्यांच्या खोडीला |धृ|

नवी कोरी गाडी काळ्या पैशाची
भरली ती भेसळीच्या मालाची
गुंड आले तडीपार, तडीपार जोडीला |१| पायबंद घालू..

जात येत विमानानं देशात, परदेशात
दलालीत डल्ला मारी देशात, मायदेशात
त्यांनी मायदेशाचा टॅक्स का हो बुडविला |२| पायबंद घालू..

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जा मुला जा, तिच्या घरी तू सुखी रहा...

Submitted by विदेश on 5 July, 2011 - 05:23

(चाल : गंगा जमुना डोळयात उभ्या का -)

होंडा इंडिका थाटात उभ्या का
जा मुला जा, तिच्या घरी तू सुखी रहा... |धृ |

कडकडुनी तू मिठी मारता, डोळे
माझेपण झाले ओले, चुकवित तोंड बळे
आठवले सारे सारे गहाण ते गाळे
तुज कर्जाचे भय न संगती, जा |१| जा मुला जा....

श्रीमंत उभी सासरा नि सासू जोडी
बघ धूड सासुचे हसले तोंड ती वेंगाडी
पूस रे डोळे या सदऱ्याने - आवर ती जाडी
रूप दर्पणी नसे देखणे, जा |२| जा मुला जा....

आय.टी.ची ती सून वाढत्या पगाराची
जमले तिचे रे कैसे तुजवर लव्ह - लफडे
हटू नकोस मागे मागे काम कितीही पडे

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

संथ पाडते गझला बाई ....

Submitted by विदेश on 23 June, 2011 - 13:17

(चाल : संथ वाहते कृष्णामाई ....)

संथ पाडते गझला बाई -
गझलेवरच्या प्रतिसादांची जाणिव तिजला नाही |धृ | संथ पाडते ....

कधी न कामें करी लौकर ती ,
कूर्मगतीने सदा करी ती ;
बॉसगिरीची काही पर्वा नाही तिज ठायी |१| संथ पाडते ....

कुणी पुरे ना म्हणती गझला ,
कुणी वर्णिती उच्च गेयता ;
मात्रागणाची करून जंत्री - मोजित कुणी राही |२| संथ पाडते ....

सतत चालते काव्य-टंकणी ,
होई न व्यनितुनी बाई शहाणी ;
वाचकास ही व्हावी कैशी , सांगा सुखदायी |३| संथ पाडते ....

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

एक आडवा न् तिडवा खड्डा (विडंबन )

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

तो- एक आडवा न् तिडवा खड्डा चंद्रावानी पडला गं
ती- मेला आयुक्त हसतोय कसा की पुणेकर अडला गं

तो- या आकांताचा तुला इशारा कळला गं
ती- खड्डा आडवा येतोय मला की पाय माझा मोडला गं

तो- नको बाई नको रडू, खड्ड्यामध्ये नको पडू
ती- इथनं नको, तिथनं जाऊ, रस्ता गावतोय का ते पाहू
तो- का????
ती- पडत्यात...

तो- एक आडवा न् तिडवा खड्डा चंद्रावानी पडला गं
ती- मेला आयुक्त हसतोय कसा की पुणेकर अडला गं

ती- ब्रेक सारखा, गाडीस सजना नका हो कचकन् मारू
हाडं खिळखिळी झाली समदी, पाठ लागलीया धरू

तो- कशी सांग मी हाकलू गाडी, ट्र्याफीक कसला गं

ती- खड्डा आडवा येतोय मला की पाय माझा मोडला गं ||
---

प्रकार: 
शब्दखुणा: 

"आदर्श " सुंदर हाच आमचा बंगला -

Submitted by विदेश on 19 May, 2011 - 11:33

( चाल : असावा सुंदर चॉकलेटचा बंगला -)

"आदर्श " सुंदर हाच आमचा बंगला -
सरकारी दरबारी 'कुणकुण 'ता चांगला !

ह्या आमच्या बंगल्याला संधीचं दार -
भेसळींच्या पोत्यातनं तिथून वसूल फार !

रोज रोज नोटांच्या ' पेटया ' दोन -
' आल्या आल्या ! '- म्हणायला, छोटासा फोन !

' बिस्किटां'च्या प्राप्तीवर जोर छानदार -
' परमिटां'च्या भांडणात फुल्ल हाल हाल !

खंडणी-खोरामागे बंदा हा रहातो,
मोठ्याशा फायलीशी लपाछपी खेळतो !

' उच्च उच्च डोक्यां-'चा खेळ रंगला ;

गुलमोहर: 

गातेस घरी तू जेव्हां

Submitted by विदेश on 16 May, 2011 - 01:24

( चाल: नसतेस घरी तू जेव्हां -)

गातेस घरी तू जेव्हां
जीव सुटका-सुटका म्हणतो
शांतीचे विणता धागे
संसार नेटका होतो !

छत भंगुन वीट पडावी
हल्लाच तसा ओढवतो
ही पाठ कणाहिन होते
अन् चेहरा बारका होतो !

ये घरमालक दाराशी
हळु गाण्या , तो खडसावे
खिडकीच्या उघडुन दारा
तो बोंबा मारून जातो !

वळ पाठी उमटवणाऱ्या

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

दूर नाही घरदार , आम्हाला नाही कुणाची भीती !

Submitted by विदेश on 11 May, 2011 - 07:25

( चाल : शूर आम्ही सरदार आम्हाला )

दूर नाही घरदार , आम्हाला नाही कुणाची भीती !
लाज-बीज अन् शरमहि नाही , प्याले घेतले हाती |धृ|

मस्तीच्या दर्पात उधळली, उच्च कुलाची रीत
दोस्तीशी ईमान राखलं , घडलं जरि ईपरीत
लाख झेंगटं झेलुन घेईल , अशी झिंग ती राती |१|

धिंगाणा वा गोंधळ करणं , हेच आम्हाला ठावं
सोसायटीमध्ये कसं जगावं , हे न आम्हाला ठावं
आईबाबांची सारी अब्रू - टांगू वेशीवरती |२|

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

असतेस घरी तू जेंव्हा..

Submitted by सत्यजित on 17 March, 2011 - 10:34

नसतेस घरी तू जेंव्हा ह्या अप्रतिम कलाकृतीची सहृदय क्षमा मागुन, संदीप आणि सलिल मला मोठ्या मनाने क्षमा करतील येवढीच इच्छा.

असतेस घरी तू जेंव्हा
जीव विटका विटका होतो
रागातून उठती त्रागे
बनियान फाटका होतो

छतं फाटून वीज पडावी
कल्लोळ तसा ओढवतो,
मी जरा निद्राधीन होता
हा सांड घोरका होतो.

येतात मुली दाराशी
हिरमुसून जाती मागे,
खिडकीतून पाहुन त्यांना
मी असाच अगतिक होतो.

तव मिठीत म़ळमळणाऱ्या
मज स्मरती घामट वेळा,
भासाविन भूत दिसावे
मी तसाच स्तंभित होतो

तू सांग अरे मग काय
मी तोडू या घरदारा?
विटलेला जीव उदास
कलईसम भुर्रभूर्र उडतो.

ना अजुन झालो गोटा
ना भणंग अजुनी झालो,

गुलमोहर: 

(अव)लक्षणे...

Submitted by मी मुक्ता.. on 25 January, 2011 - 07:07

विशाल कुलकर्णी यांची क्षमा मागुन... मुळ कविता फारच सुरेख आहे.. इथे वाचा.. पण विडंबन करयचा मोह आवरला नाही...
http://www.maayboli.com/node/22644

----------------------------------------------------------------------------
माझ्या वरणाच्या वाटीत
सापडायचं सोडलंय
हल्ली डाळीने...

ह्म्म्म..
फुगत नाहीत आताशा
तुझ्या पोळ्यासुद्धा
तेलाशिवाय..

निष्क्रिय होऊ लागलाय आजकाल
ओटा.. किचनचा..

अन
गायब होत चाललाय
भाजीतला कांदा..

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - विडंबन