Submitted by स्वरुप on 1 April, 2015 - 11:55
आयपीएल चे आठवे पर्व सुरू होत आहे .... सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच स्मित
हा धागा आयपीएल-८ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया स्मित
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ह्याले म्हण्ते पक्के क्रिकेट
ह्याले म्हण्ते पक्के क्रिकेट फेन..
हाहाहा हिम्या! आयपीएल मला
हाहाहा हिम्या!
आयपीएल मला नेहमीच आवडत आलय.... द्रवीड, तेंडल्या खेळत होते तेंव्हातर इंटरनॅशनल क्रिकेटपेक्षाही आयपीएल जास्त आवडायचे
..हा धागा आयपीएल-८ वरच्या
..हा धागा आयपीएल-८ वरच्या ..........आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आणि समजा माझ्यासारखे काही लोक असतील ज्यांना खेळातले बारकावे समजत नाहीत, पण खेळावर प्रचंड प्रेम, अश्यांनी इथे लिहीले तर चालेल का?
शिवाय क्रिकेट आवडत नाही, नि समजतहि नाही पण कुत्सितपणे मॅच फिक्सिंग चा ओरडा करणारे पण इथे लिहू लागले तर?
यावेळी आमची मुंबई
यावेळी आमची मुंबई गेल्यावेळच्या निराशाजनक कामगिरीला धुवून टाकायला उतरणार. रोहीतकडून खास दमदार इनिंग्जच्या अपेक्षा. एखादे शतक झळकावेल यंदा.
धोनीसाठी तर आयपीएल गंगा आहे, त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सारी पापे इथे धुतली जातात.
युवराजसाठी हि आयपील म्हणजे पुन्हा संघात पुनरागमन करायचा मार्ग आहे. त्याच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असणार.
मुंबई जर गळपटली तर अर्थातच माझा सपोर्ट माझ्या फेव्हरेट शाहरूखच्या कोरबो लोरबो जितबो रे ला असणार.
बिचारा विराट आणि अनुष्कावर पुन्हा व्हॉटसप मेसेज फिरू लागणार. विराटच्या बेंगलूरू संघाने आयपीएल मारली तर त्यांनी लग्न करायची हिच योग्य वेळ. हे माझे वैयक्तिक मत, बाकी त्यांची पर्सनल लाईफ तेच योग्य निर्णय घेतील.
यंदा अंतिम सामना मुंबई बेंगलूरूचा बघायला आवडेल.
झक्की, ही मायबोली आहे.... आता
झक्की, ही मायबोली आहे.... आता तुम्हाला काय वेगळे सांगायला पाहिजेल का?
इथे धाग्याच्या विषयाला धरुनच लिहले पाहिजे असा आग्रह करुन धागा चालतो का?..... आणि अमुक एक लिहु नका म्हंटल तर लोक ऐकतात का?
क्रिकेट्वर प्रेम करणार्या सगळ्यांचे स्वागतच आहे ..... "अभ्यासु" वगैरेच लिहले पाहिजे असे काही नाही
(पांशा मोड: मॅच फिक्सिंगचे म्हणाल तर धाग्याचा TRP वाढवायला अधुनमधुन अश्या खवचट आणि उचकाऊ पोस्ट मदतच करतात )
डबल पोस्ट
डबल पोस्ट
चला, आयपीएल चालू झाले. आता
चला, आयपीएल चालू झाले. आता मज्जा!!!
स्वरूप, धन्यवाद.शक्यतो(!)
स्वरूप, धन्यवाद.शक्यतो(!) वेडेवाकडे लिहीणार नाही. नुसतेच वाचीन.
भाऊ, कुठे गायब झालाय
भाऊ, कुठे गायब झालाय तुम्ही?
एक व्यंचि तो बनता है!
कुणीही कितीही फोरेन स्टार
कुणीही कितीही फोरेन स्टार प्लेयर्स घेतले तरीही ज्या संघात चांगले भारतीय खेळाडू आहेत त्याच संघाला जास्त संधी असते.... आणि त्याबाबतीत चेन्नईचे पारडे बरेच जड आहे.... धोनी, रैना, अश्विन, जडेजा, मोहीत शर्मा, इरफान पठाण, नेहरा, राहुल शर्मा इतके सारे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेले भारतीय खेळाडू इतर कुठल्याच संघात नाहीयेत.... आणि त्या जोडीला ब्राव्हो, फाफ, मॅकल्लम हे २०-२० स्पेशालिस्टही आहेत
अॅबॉट आणि हेन्रीच्या समावेशामुळे त्यांना बॉलींगमध्येही नवीन ऑप्शन मिळालेत
धोनीची कॅप्टन्सी हा सगळ्यात मोठा प्लस-पॉइंट आहे...... कागदावर तरी चेन्नईचा संघ सर्वोत्तम दिसतोय
गतविजेता कोलकत्त्याचा संघ या घडीला थोडा रस्टी वाटतोय...... गंभीर, उथाप्पा, युसुफ, मनीष पांडे गेल्या मौसमानंतर फारसे खेळताना दिसले नाहीयेत.... त्यामुळे त्यांच्या फॉर्मबद्दल स्पर्धा सुरु झाल्याशिवाय फारसा अन्दाज व्यक्त करणे धोक्याचे आहे.... नरीनची अॅक्शन अजुन क्लियर झालेली नाहीये.... पण त्यांच्याकडे स्पिनचा चांगला बॅकअप आहे..... शकीब, हॉग, चावला आणि चायनामन कुलदीपच्या जोडीला यंदा त्यांनी कर्नाटकच्या स्थानिक स्पर्धेतुन मिस्टरी स्पिनर करीअप्पाला उचलले आहे.... जो तीन बोटांची ग्रीप घेउन ग्रीप न बदलता लेगस्पिन तसेच ऑफब्रेकही टाकू शकतो म्हणे.... वेटींग टू वॉच हिम!
पण सहा सहा स्पिनर्स एका संघात हे मला तरी वेस्ट ऑफ रिसोर्सेस वाटते
बाकी गोलंदाजांमध्ये मोर्केल, उमेश यादव चांगल्या फॉर्मात आहेत.... They just need an in-form star batsman.... गंभीर किन्वा उथप्पाला फॉर्म गवसणे कोलकत्त्यासाठी फार महत्वाचे आहे!
मुंबईच्या संघात रोहीत आणि रायडू सोडले तर भरवश्याचा भारतीय फलंदाज नाहीये..... उन्मुक्त चंद अजुन आयपीएलमध्ये चमकलेला नाहीये.... पोलार्ड, कोरी अँडरसन आणि मलिंगा च्या जोडीला त्यांना चौथा फोरेनर म्हणुन फिंच किन्वा सिमन्सला (बॅटींग मजबुत करण्यासाठी) खेळवावे लागेल त्यामुळे हेझलवुड, मर्चंट दी लेंगे वगैरे मंडळींना सामावुन घेणे अवघड आहे.... विनय कुमारला कितीही फोडले तरी तो मोक्याच्या वेळी विकेट्स घेतो.... मलिंगाने एका साईडने प्रेशर बनवले तर त्याचा फायदा विनय कुमार ला होउ शकतो
बाकी स्पिनर्समध्ये भज्जी, ओझा पुरेसे आहेत
गेल्या मोसमापासुन पंजाबचा संघ आमुलाग्र बदललेला आहे आणि त्याचे बरेचसे क्रेडीट संजय बांगरला जाते... सेहवाग, मुरली विजय, मिलर, मॅक्सवेल असे दणदणीत फलंदाज आहेत.... बेली मात्र फक्त कप्तानीच्या जोरावर संघात असेल.... गोलंदाजीत जॉन्सन हा एकमेव स्टार बॉलर आहे.... पण मागच्या वर्षी अक्षर पटेल, संदीप शर्मा या दोघांनीही गोलंदाजीचा भार मस्त पेलला होता.... जोडीला आवना आणि ऋषी धवन आहेत.... चांगल्या धावसंख्येचे पाठबळ या गोलंदाजांना गरजेचे आहे आणि पंजाबची फलंदाजी ते देण्यासाठी सक्षम आहे
राजस्थानचा संघ अगदी पहील्या सीझनपासुन लो-प्रोफाइल राहीला आहे.... पण या संघाने स्पर्धेला नेहमीच चांगले खेळाडू दिले आहेत.... गेल्या काही मोसमात ऑल राउंडर ही या संघाची खरी ताकद राहीली आहे.... वॉटसन, फॉल्कनर, बिन्नी, भाटीया, ख्रिस मॉरीस, स्मिथ, अभिषेक नायर, दीपक हूडा, रस्टी थेरॉन इतके ऑल-राउंडर क्क्वचितच दुसर्या एखाद्या संघात असतील
रहाणे, करुण नायर, सॅमसन आणि प्रवीण तांबे गेल्या काही मोसमात चांगलेच नावारुपाला आलेले आहेत
फक्त स्मिथ आणि वॉटसनला बॅकअप बॅट्समन त्यांच्या संघात नाहीये..... या दोघातले कुणी इंज्युअर्ड झाले तर अवघड होइल.... केन रिचर्डसनच्या माघारीनंतर बदली खेळाडू घेताना त्यांनी याचा विचार केला पाहिजेल
ब्रॅड हॉजसारखा एखादा फिनिशर फार गरजेचा आहे तसेच त्यांची स्पिन बॉलिंग फक्त तांबेच्या भरवश्यावर आहे... पण गेल्या काही सीझनप्रमाणे या सीझनमधुन सुद्धा एखादा नवीन स्टार रॉयल्सला नक्कीच मिळावा
द्रवीड आणि पॅडी अॅप्टॉन हा थिंकटँक या संघाची एक मोठी ताकद आहे!
गेल, एबीडी, कोहली, युवराज संघात असुनही जर तुम्ही जिंकु शकत नसाल तर नक्कीच कुठेतरी काहीतरी गडबड आहे..... एकतर स्ट्रॅटेजी कुठेतरी गंडतीय किंवा कॅप्टन्सी कमी पडतीय .... यंदा युवराज दिल्लीकडे गेला असला तरी गेल, कोहली, एबीडी, दिनेश कर्तिक, रोसवु, सॅमी अशी दमदार फळी त्यांच्याकडे आहे.... जोडीला बद्रीनाथ, विजय झोल, बिसला आणि ताकवले आहेत
स्टार्क, मिल्ने, अॅबॉट असे तेजतर्रार आहेत पण स्टार्क आणि मिल्ने तंदुरुस्त होऊन स्पर्धेत दाखल होइपर्यंत अॅरॉन, दिंडा आणि चहलवरच सगळी जबाबदारी आहे
ही स्पर्धा म्हणजे कोहलीच्या कॅप्टन्सीची अजुन एक लिटमस टेस्ट असेल
स्टेन, बोल्ट, भुवी, इशांत, प्रवीणकुमार अशी धारदार बॉलींग हे हैद्राबादचे प्रमुख अस्त्र आहे पण शिखर धवन वगळता एकही नावाजलेला भारतीय फलंदाज त्यांच्याकडे नाहीये.... नमन ओझा, शुक्ला, लोकेश राहुल वगैरे मंडळीना त्यामुळे चमकदार खेळ करावा लागेल
वॉर्नर वगळता मग एकच स्लॉट उरतो जो विल्यमसनसाठी असेल त्यामुळे मॉर्गन, बोपारा, हेन्रिक्स वगैरेना फारशी संधी मिळायची शक्यता कमीच आहे
दिल्लीची र्टीम पण बॉलींग हेवी टीम आहे.... झहीर, शमी, ताहिर, कुल्टीअर, उनाडकट, मिश्रा, नदीम, गुरींदर संधू, असे सगळे बॉलर्स भरलेले आहेत आणि बाकीचे सगळे ऑल राउंडर.... ड्युमिनी, युवराज, मॅथ्युज, अॅल्बी मॉर्कल
ड्युमिनि आणि कर्स्टनचे कॉन्बीनेशन, युवराजचा समावेश व झहीरचा गोलंदाजीतला अनुभव दिल्लीला या मोसमात तरी यश देइल अशी बर्याच जणांना आशा आहे
सध्या तरी इतकेच..... बाकी बोलतच राहू या कट्ट्यावर
ज्या संघात चांगले भारतीय
ज्या संघात चांगले भारतीय खेळाडू आहेत त्याच संघाला जास्त संधी असते. >> ह्यात थोडे अॅड करून मी म्हणेन, ज्यांच्याकडे चांगल्या भारतीय खेळाडूंची बॅकप फळी असते तो संघ अधिक कन्सिस्टंट राहतो नि एव्हढ्या लेंग्थी नि हेक्टीक स्पर्धेमधे ते फार मह्त्वाचे ठरते. तसेच स्पर्धेच्या शेवटच्या सामन्यांच्या वेळी काहि कसोटी सामने सुरू होणार असल्यामूळे बरेचसे पट्टीचे परदेशी खेळाडू नसतील त्याचा पण परीणाम होईल.
MI बद्दल त्यांनी गेल्या वर्षीही हेझलवूड ला फारसे वापरले नाही. पोलार्ड फारसा खेळला नाहीये हे लक्षात घेउन, नि अँडरसन नि हेझल्वूड ह्यांचा फॉर्म बघता स्टार्टर म्हणून तरी ते हवेतच. बाकी मग कसे खेळतात ह्यावर बदल करता येईल. ओपन करायला रोहित-फिंच कि रोहित-पटेल कि रोहित-तारे हे बघायला मजा येईल. चांदसाठी मेक ऑर ब्रेक सीझन असेल हा. त्यांनी शार्दूल ठाकूर वर प्रय्त्न करायला हवे होते असे वाटते. रिशी धवनचा रोल त्याने बरोबर निभावला असता.
मागच्यावेळेस कोलकतासाठी नरेन
मागच्यावेळेस कोलकतासाठी नरेन किप्लेअर ठरला. मॅक्सवेल & कंपनीला चांगले जखडले होते. यंदाच्या स्पर्धेत बंगलोरला उत्तम चांस आहे. त्यांचे बॉलर्स फार्मात आहे.
>>यंदाच्या स्पर्धेत बंगलोरला
>>यंदाच्या स्पर्धेत बंगलोरला उत्तम चांस आहे. त्यांचे बॉलर्स फार्मात आहे.
हो... पण ते फॉर्मातले दोन बॉलर्स (स्टार्क आणि मिल्ने) किमान पहीले २ आठवडे तरी उपलब्ध नाहीयेत आणि सॅमीला खेळवायचे ठरवले तर स्टार्क आणि मिल्नेमध्ये एकावेळी एकालाच खेळवता येईल
असामी, रोहित आणि सिमन्स असाही एक ऑप्शन आहे!
बँग्लोर कडे गेल,
बँग्लोर कडे गेल, डिव्हिलिअर्स, स्टार्क, रुस्लोव ,सामी, मिल्न आहेत
४ हवे तर गेल, डिव्हिलिअर्स, सामी , स्टार्क /मिल्न्/ रुस्लोव असा ऑप्शन आहे
गल्ली चुकली
गल्ली चुकली
? आयपील मधे कॉफी आणि बरेच
? आयपील मधे कॉफी आणि बरेच काही?
कबीर, तिकडे मराठी टाइप होत
कबीर, तिकडे मराठी टाइप होत नव्हते म्हणुन इकडे टायपुन तिकडे पेस्टायचा विचार होता.... पण सवयीने इथेच डकवले!
यंदाच्या स्पर्धेत बंगलोरला
यंदाच्या स्पर्धेत बंगलोरला उत्तम चांस आहे. त्यांचे बॉलर्स फार्मात आहे. >> गेल्या वर्षीही स्टार्क आयपील च्या आधी जबरदस्त फॉर्मात होता. आय्पील मधे आल्यावर त्याचा पेस कमी झाला नि त्याचा फटका बसलेला., यंदा मिडल ऑर्डर भारतीय खेळाडूंना घेऊन बूस्ट केली आहे. बॉलिंग मधे बरेच काही भारतीय बॉलरची फळी काय करते ह्यावर ठरेल - चहल, दिंडा नि अॅरन. चहल गेल्या वर्षी बराच नीट टाकत होता. पण बाकिचे दोघे ?
रोहित आणि सिमन्स असाही एक ऑप्शन आहे! >> गेल्या वर्षीचा चाललेला फॉर्मुला. पण पाँटिग कोच असल्यामूळे फिंच असेल असे वाटतेय. माझ्या मते रोहितला कत्ले आम फॉर्म लागला तर MI टफ होईल. They will die and live by his form.
IPL संपता संपता कुठली टींम फॉर्ममधे येते ते बघणे मह्त्वाचे ठरेल.
IPL संपता संपता कुठली टींम
IPL संपता संपता कुठली टींम फॉर्ममधे येते ते बघणे मह्त्वाचे ठरेल.
>>>>
प्लस सेव्हन एटी सिक्स
नेहमी हेच महत्वाचे ठरते,
कागदावर आयपीएलची इक्वेश्नस मांडू नाही शकत. कोणाचा काय फॉर्म आहे, कुठवर टिकतो,.. तसेच टिम कॉम्बिनेशन म्हणून कसे जमते हे महत्वाचे अन्यथा मोठमोठे खेळाडू असूनही फायदा नाही.. कमजोर कडी घात करून जाते..
नारायणची अॅक्शन क्लिअर
नारायणची अॅक्शन क्लिअर झालीये..
आणि उथप्पा जबरी फॉर्ममधे आहे.. जोरात खेळलाय तो यंदा रणजी मधे.. तोच फॉर्म चालला तर मग कलकत्त्याचा बॅटींगचा प्रश्न बर्यापैकी सुटेल..
आयपीएलसाठी फॅंटसी लीग तयार
आयपीएलसाठी फॅंटसी लीग तयार क्रिकेट केली आहे
लीगनेम: maayboli
पासवर्ड: maayboli
आयपीएलसाठी फॅंटसी लीग > >दर
आयपीएलसाठी फॅंटसी लीग > >दर मॅच नंतर सारखे बदलाबदल करत राहणे कंटाळवाणे वाटते. एकदाच टीम निवडून ठेवली तर चालेल का ? शेवटी जाऊन फक्त बघायचे काय दिवे लागले ते
नरीनला विश्वच्षकात बाहेर
नरीनला विश्वच्षकात बाहेर बसवला...
आणि आता आयपीएलच्या आधी क्लीनचीट दिली..
पैश्यात खूप ताकद असते..
असामी..... त्या साईटवर
असामी..... त्या साईटवर ड्रीम११ असा पण एक प्रकार आहे
ज्यात एकदा टीम निवडुन शेवटी जाउन दिवाळी बघता येती
u can try that!
ती साईट कुठली ते पण नेमके
ती साईट कुठली ते पण नेमके सांगतोस का ? cricinfo ?
yes....cricinfo च
yes....cricinfo च
कसला बोअर मारतोय सिद्धू
कसला बोअर मारतोय सिद्धू
आज मॅच आहे ?
आज मॅच आहे ?
स्वरुप मी टीम तयार केली
स्वरुप मी टीम तयार केली पण
१. मला तुझी लीग सापडली नाही. सर्च जिथेकरतात तिथे तो invitation code मागतोय.
२. dream11 पण सापडले नाही काल. नीट बघायला हवे FAQ वगैरे वाचून.
ओपनिंग सेरेमनी आठ वाजता होता
ओपनिंग सेरेमनी आठ वाजता होता ना? हायलाईट्स दाखवत होते जुन्या मॅचेसचे.
Pages