Submitted by घुमा on 30 September, 2011 - 15:59
आम्ही दोघ लोळत पडलो होतो बिछान्यात,
डोक्याला डोक टेकवुन, हातात हात घेऊन
ऐकत होतो एकमेकांच्या हृदयाचे ठोके.
जणू त्याचे ठोके चेष्टेने मला म्हणत होते,
"लग्न मानवलेल दिसतय तुला. चांगलीच जड झालीयेस!"
आणि माझे ठोके काळजीनी म्हणत होते,
"मला तरी एक कारण आहे. तू का थकुन जडावला आहेस?"
त्यानी ते खरेच ऐकले की काय? म्हणाला,
"भार वहातो आहे तुझ्या काळज्यांचा."
किती गंमत ना?
मी थकले त्याचा भार वाहून
आणि तो थकला माझा भार वाहून.
मी आणि माझा थकलेला क्षण मग
नुसतच बोलत राहिलो मूकपणे आढ्याकडे एक टक पहात....
गुलमोहर:
शेअर करा
छान आहे.
छान आहे.
विभाग्रज, आभार!
विभाग्रज,
आभार!
ती छताकडे पाहून म्हणते की रंग
ती छताकडे पाहून म्हणते की रंग उडालाय लवकर रंग द्यायला पाहिजे अशा अर्थाचा विनोद आठवला.
मस्त. जड होणे वगैरे
मस्त.

जड होणे वगैरे स्वाभाविकच म्हटले पाहिजे.
कवितेच्या शीर्षकात मॅग्नेट आहे. अशी नावे सुचणार्यांचे मला कायमच कौतुक वाटत आले आहे.
छानैय !!
छानैय !!
मस्त !!!
मस्त !!!
आवडली
आवडली
ज्ञानेश, पाषाणभेद, आयडू,
ज्ञानेश, पाषाणभेद,
आयडू, Kiranyake, vinayak, आभार!