माझं भुंकणं!!

Submitted by खारीक on 3 October, 2011 - 07:44

बागीची क्षमा मागून.. Happy
मूळ कविता इथे आहे - http://www.maayboli.com/node/29384

आज वहाण मागायला
तू दारी आलास.... बाटाचं!

अगदी काल-परवा,
जी वहाण मी चावून
चघळून फेकून दिली,
तिचीच जोड एका पायात घालून....

जोरात कर्कश भुंकून,
उभा होतो तुला सामोरा,
भुंकण्याच्या आवाजाचा
प्रतिध्वनीही आला... चाळीच्या कानाकोपर्‍यातून
घुमत...

तू रस्त्यावर एकाच चपलेत उभा असल्याची जाणीव
होत राहिली कितीतरी वेळ....

पोटातून नाकापर्यंत आलीच
ढेकर तुझ्या वहाणेची,
मनमुराद रेंगाळू दिली चव जिभेवर....

आज मी भुंकलो होतो....
पण;
गळणार्‍या लाळेचं कारण मात्र

अनाकलनीयच!

(कदाचित तुझ्या पायातली दुसरी वहाण?)

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

खारक्या... ढंप्या! Happy

माझ्या (मूळ) कवितेला प्रसिद्धी मिळवून द्यायची
असा तुमच्या सगळ्यांचा अ‍ॅप्रोच पाहून आनंद झाला.....
Lol

पण अरे लाळ, शिंका वगैरे... च्च!!

खारक्या, दुष्टा ! Lol का रे चांगल्या हळुवार कवितेची अशी चिरफाड ! जा मी काही छान छान लिहिणार नाही तुझ्या कवितेबद्द्ल Happy मजेदार आहे.

आणि तु कॅपुला थँक्स करतोयस का? मी त्यादिवशी केलेल्या त्याच्या तक्रारीवरुन तर तुला ही सुचली नाही ना Happy पहिलीच आहे का? छान लिहिली आहेस.

मी पहिल्यांदा विडंबन वाचलं... तेव्हा फारसं काही वाटलं नाही. आत्ता मूळ कविता वाचली तेव्हा विडंबन आठवून पोट धरधरून हसलो... मूळ कविता गंभीर असतानाही ती हसत हसत वाचण्याचा अनुभवच बेक्कार मस्त होता !

जनता, खूप आभारी.. Happy
"ढंप्या", "दुष्ट", "भयानक", "महान" या नामकरणाबद्दल तर अनेक धन्यवाद.. Proud

मने,
तुझा कॅपु चपला खातो का? Proud पण लिहिताना माझ्या लक्षात आला होता तो! Happy
पहिलीच कविता आहे असं नाही म्हणता येणार, मायबोलीवर प्रथमच पोस्ट केली.

:-G:-G